tag:blogger.com,1999:blog-7141382703646306303.post6259138096759018886..comments2023-07-06T08:29:20.353-07:00Comments on ۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: पुन्हा तिळगुळ गोड लागलेच नाहीAbhishekhttp://www.blogger.com/profile/13589739564766130417noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-7141382703646306303.post-18365613542703179672014-09-15T01:51:28.448-07:002014-09-15T01:51:28.448-07:00कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मरा...कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पनिपति॥

- १४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकि झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला. उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांचा भावी पेशवा मारला गेला. पुण्यातल्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात, रुपयोंकी गिनती नही|"
पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभव नाही. कारण १८व्या शतकाच्या शेवटि तब्बल १४ वर्ष लाल किल्यावरती "भगवा" फडकत होता हा इतिहास आहे. मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे जर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे. महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे, "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास वर्षभर लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता ..... मराठ्यांनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे. नजिबाचा नातू "गुलाम कादिर" याने "अली गोहर" बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे. पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर मराठ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली हा खरा इतिहास आहे..
म्हणूनच म्हणतोय खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय. दुसर्या महायुध्दातील दोस्तांच्या डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे पराभूत झाले असं म्हणतात तेव्हा त्यांची किव येते.
आज अडिचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे "पानिपत".
- सौरभ वैशंपायन.
saurabh Vhttps://www.blogger.com/profile/10196983221933677221noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7141382703646306303.post-85895967133151575802014-09-15T01:41:31.718-07:002014-09-15T01:41:31.718-07:00१० जानेवारी १७६० .... महाराष्ट्रात मकरसंक्रांतीचा ...१० जानेवारी १७६० .... महाराष्ट्रात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या आनंदानं साजरा केला जात होता. तिळगुळ वाटले जात होते, गुळाच्या पोळ्यांच्या पंक्ती उठत होत्या. त्याचवेळि तिथे उत्तरेत, दिल्ली वाचवताना कामी आलेला दत्ताजी बहाद्दराचा बिन मुंडक्याचा मुडदा, बुराडि घाटावर यमुनेच्या वाळवंटात भडाग्नि घेत होता. जव्हेरगंजाच्या पाठीवर सोन्या-चांदिच्या अंबारीत मिरवणार्या "शिंदे स्वारीच्या" नशिबी साधा मंत्राग्नी सुध्दा नसावा ह्याहुन दुर्दैव ते काय???

वाट्टेल त्या किंमतीवर दिल्ली शत्रुच्या ताब्यात पडू देणार नाही ह्या चिरडिने, स्वकियांनीच निमंत्रणांच्या अक्षता धाडुन बोलावलेल्या अब्दालीच्या परचक्राची पहीली लाट शिंद्यांच्या लष्कराने आपल्या छातीवर झेलली होती. अफगाणिस्थान आणि महाराष्ट्र दिल्लीसाठी समोरासमोर उभे ठाकले होते.

राष्ट्रावर अघोरी संकट आलं होतं, युध्दातील पहिली आहुती पडली होती. इतिहासपुरुषाची पाऊले पानिपताकडे पडायला सुरुवात झाली होती. इतिहासाचा प्रवास युध्दाकडून युध्दाकडे सुरु झाला होता.

- सौरभ वैशंपायन saurabh Vhttps://www.blogger.com/profile/10196983221933677221noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7141382703646306303.post-22675938156297790012012-08-25T00:49:29.499-07:002012-08-25T00:49:29.499-07:00Very Nice blog very well written , I have also wri...Very Nice blog very well written , I have also written a book on Panipat this is the facebook page of the book
https://www.facebook.com/pages/Third-Battle-of-Panipat/265170066922810

U can find many marathi articles on these topic on this page Abhas Vermahttps://www.blogger.com/profile/02001823277655560077noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7141382703646306303.post-23128478075487426132011-02-02T17:44:31.705-08:002011-02-02T17:44:31.705-08:00हृदय भरून आले एकदम असेच स्वराज्यासाठी लढलेले काही ...हृदय भरून आले एकदम असेच स्वराज्यासाठी लढलेले काही मावळे ..त्यांचे योगदान अमूल्य आहे हे विसरून चालणार नाही .....जगदंब !!जगदंब !! ..जय भवानी !!!!!vinnyhttps://www.blogger.com/profile/01102060324447393410noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7141382703646306303.post-87937844303750181142011-01-26T05:03:18.026-08:002011-01-26T05:03:18.026-08:00Good too see you all had read 'Panipat' .....Good too see you all had read 'Panipat' ... brave history of maratha :)

Santosh, tase jar vhayche aste tar jar Malhararao holkarani velich najeeb khanala paathishi ghatle naste tar hi vel aalich nasti aani raghunath peshwayani yogya veli Najeeb khanala maarle aste aani Panipat kadhi ghadlech naste ... but point to be noted ... Panipat jar ghadle naste tar Marathyanchi Shaurya Gatha kadhi gaayli geli nasti ... aapan harlo nakki but haarun pan jinklo :)MMhttps://www.blogger.com/profile/14372947462333252607noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7141382703646306303.post-5777755216555668682011-01-14T08:27:31.728-08:002011-01-14T08:27:31.728-08:00Mahadji Shinde aani Vinchurkar yanni jar Ibrahim K...Mahadji Shinde aani Vinchurkar yanni jar Ibrahim Khan Gardyache aikun Golachi Ladhai Khelali Asti tar Aapan Panipat kadhich harlo nasto. Aajche chitr kahi vegalech aste.Unknownhttps://www.blogger.com/profile/09407443200785777884noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7141382703646306303.post-5698969741977085902011-01-14T06:26:38.607-08:002011-01-14T06:26:38.607-08:00Mitra.. Buradi ghatachi ladhai 14 jan 1761 la zali...Mitra.. Buradi ghatachi ladhai 14 jan 1761 la zali nahi.. ti 10 jan 1760 la zali.. ethe dattaji shindyanna virmaran ale.. jankoji shinde ghayal zale.. tyanantar mahinabharane hi khabar punyaparyant geli.. mag bhau nighale.. ani panipat chi tisri ani mukhyahat chi ladhai ji 'panipat chi ladhai' mhanun samajli jate ti 14 jan 1761 la zali.. tya adhi shukratal chi ani buradi ghatchi ladhai barobar ek varsh pahile zali.. ya ek varshat dilli ne khup kahi sosle ahe.. pan panipat chya ladhai ne afganyancha kana modla.. :)Omkarhttps://www.blogger.com/profile/05908098118907355901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7141382703646306303.post-69328408178407687952011-01-14T00:23:11.888-08:002011-01-14T00:23:11.888-08:00"कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती,
तस..."कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती,
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"Anonymousnoreply@blogger.com