Posts

ऑपरेशन ट्रायडंटल

Image
रोजच्या पोटापाण्याची भ्रांत असणाऱ्यांना कसले आलय कुठल्या गोष्टीचं सोयरं सुतक, रोजचा गाडा ओढण्यातच नशिबाला घामाच्या धारा लागतात. पण आजचा प्रसंग काहीसा वेगळा होता. साऱ्या दिल्लीमध्ये सायरन मोठमोठ्यान खणखणत होते. रस्त्यावरून पोलीस व्हॅन सतत सूचना देत होत्या. घरातून बाहेर उजेड येणार नाही एवढ्या खबरदारीनं राहण्याचे ते सांगत होते. ३ डिसेंबर १९७१ ची ती रात्र. सबंध उत्तर भारतात आगपाखड करत पाकिस्तानी विमानं घोंगावत होती. अंबाला, श्रीनगर, अवंतपूर, पठाणकोट, उत्तरलाईन, जोधपुर पार आग्र्यापर्यंत ही विमानं आत शिरली. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आपले सर्व कार्यक्रम स्थगित सर्वत्र होणाऱ्या हल्ल्याची माहिती घेतली. देश कि धडकन असणाऱ्या नव्या दिल्लीत खलबतांना उत आला. इंदिरा बाईंनी तिन्ही दलांच्या सेनापतींना बोलावून घेतले. बराच खल झाला. शेवटी रात्री उशिरा बाईंनी फोन उचलला पलीकडल्या "येस मॅमला" अलीकडून "संसार" एवढेच उत्तर दिले गेले. आता सुरवात झाली होती ती एक, भविष्यासाठी दैदिप्यमान ठरणाऱ्या ऐतिहासिक घटनेला.  # ऑपरेशन_ट्रायडंटला  सुरुवात झाली. भारतीय नौकांचा काफिला कराचीच्य...

अपरिचित क्रांतीपर्व महाराज चीमासाहेब

Image
 भाऊबंदकी आम्हाला कधी सुटली नाही, आणि या गोष्टीला इतिहास देखील आहे, ही गोष्ट वेगळी, पण तरीही स्वातंत्रतेचा बाणा मनाशी बाळगून असणाऱ्यांनी कधीही या गोष्टीचा तसूभरही आपल्या ध्येयावर प्रभाव पडून दिला नाही ही देखील महत्वाची बाब. कंपनी सरकारची कोल्हापूर राज्याच्या कारभारातील अवाजवजी  लुडबुड आता सहन होण्यासारखी नव्हती, पण पर्याय नव्हता, आपल्या बंधूचे कंपनी सरकारकडे कललेले मत चिमासाहेबांना डाचत असे आणि या गोष्टी त्यांनी उघड उघड बोलूनही दाखवल्या होत्या. त्यामुळे दोन भावंडांमध्ये असणाऱ्या या वैचारिक भिन्नातेतून ते दोन्ही ध्रुव एकमेकांपासून दुरावू लागले. चिमासाहेबांचा प्रस्थापितांच्या विरोधातील आवाजावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली, पण "हातावर तुरी देणे" हा वाक्प्रचारचं जणू या घराण्याने मराठी भाषेला दिला असावा अशीच करामत घडत असत. इंग्रजी रेसिडेंटला - त्यांच्या बंधूंना अपयश येत असे. हे वारे  काहीतरी वेगळ्या दिशेने वाहणारे आहे,या गोष्टीची मात्र त्यांना निश्चित कल्पना आली होती. चिमासाहेब शूर, सशक्त, व  देखणे, त्यात त्यांना जात्याचा शिकारीचा नाद, भाला...

इतिहासकर्ते

Image
या देशात फार कमी ठिकाणं अशी आहेत जिथे मराठयांचं रक्त सांडले नाही मग ते १६ व्या शतकातील मराठे असोत वा इंग्रजांच्या जुलमी राजवटीतील क्रांतिकारक असोत वा आजच्या घडीला देखील देशाच्या रक्षणासाठी खडे ठाकलेले आमचे जवान असोत एकप्रकारे या मुलखाची, देशाची रक्षण करण्याची जवाबदारी हि मराठ्यांवरचं येऊन पडलेली. अखंड लढत-झुंजत राहणाऱ्या मराठ्यांच्या तलवारीचे खणखणीत आवाज पार दिल्लीश्वराच्या कानी आदळले आणि ज्या तख्ताविरुद्ध मराठे लढत होते त्याचं तख्ताच्या रक्षणासाठीची जवाबदारी यांच्या खांद्यावर येऊन पडली. हा काळ होता १७६४ सर्वत्र धुमाकूळ, सत्ता गाजवत मराठे सारा हिंदोस्ता हाकत होते. गुजरातचा विचार करता, गुजरातच्या राजकीय सत्ता या सतत बदली होत राहिल्या, तसेच एकाच वेळेस मराठे, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज इत्यादींच्या सत्ता होत्या. मराठ्यांमध्येही पेशवे, गायकवाड, शिंदे इत्यादींची सत्ता गुजरातवर होते. तसेच काही भाग हा स्वतंत्र संस्थानिकांकडे होता. यापैकी काही संस्थाने मांडलिक तर काही स्वतंत्र होती, त्यामुळे राजकीय परिस्थिती थोडी अस्थिर व कायम लढाई राहिली, अशावेळी कायमस्वरुपी सैन्य, तोफखाना इत्यादींची गरज गुजरात...

उंबरखिंड

Image
शास्ताखान पुण्यात ठाण मांडून बसला याच काळात आजूबाजूच्या परिसरात हातपाय पसरण्याचा त्याचा मनसुबा तडीस नेण्याच्या उद्देशाने त्याने सुरवात केली. विश्वासू सरदारांना एकांतात भेटून चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे हा भाग हस्तगत करण्याची कामगिरी सोपविली गेली. कारतालाबखानसोबत कछ्प, चव्हाण, अमरसिंह, सर्जेराव गाढे, कोकाटे, जाधवराव यांची या मोहीमी साठी नियुक्ती केली गेली. विशेष म्हणजे यात या सरदारांशिवाय माहुरची रायबाघनदेखील या मोहिमेत सामील होणार होती. बरेच मोठे सैन्य घेऊन कारतालाब खान लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गाने पुढे सरकू लागला. वाट मोठी बिकट निरुंद गहन अरण्य ओलांडून पुन्हा सह्याद्रीची बिकट चढण चढून उतरायची व मग उंबरखिंडीतून खाली उतरायचे होते. इकडे कारतलबखानाच्या सर्व बातम्या महाराजांपातूर पोचतच हुत्या. राजांनी उंबरखिंडीच्या झाडीत सैन्य दाबून ठेवले. मोठी चढण चढून उतरून खानाचे सैन्य खिंडीत उतरले आणि रणभेरी निनादू लागल्या शत्रूने घेरल्याचे एव्हाना खानास समजले होते. बाणांचा बंदुकांचा मारा परस्परांवर होऊ लागला. प्रारंभी अमरसिंहाने व मित्रसेनाने मराठ्यांना चांगलेच तोंड दिले. रानोरान पळत...

वांदीवॉशला मुघलांची दाणादान

Image
जिंजीपासून वांदीवॉश हे ठिकाण २५ मैल येथे मोगलांची अन्नधान्य सामग्री. ती आणण्याचा झुल्फिकारखानाचा प्रयत्न चालू होता. दोन अयशस्वी प्रयत्नानंतर तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झला. मोगली लष्करात एवढी बेशिस्त माजली होती कि उपाशी सैनिकांनी रात्री तांड्यावर हल्ला करून ते लुटले. या हल्ल्यातून वाचलेले सैन्य घेऊन तो वांदीवॉशहून तळाकडे निघाला मार्गात देसुर या ठिकाणी संताजी घोरपडे यांनी आपल्या २० हजार सैन्यासह त्याचावर हल्ला चढविला तो दिवस ५ जानेवारी १६९३ इतिहासकार भीमसेन सक्सेना यावेळी हजर होता त्याने लिहलेला प्रसंगातून हे कळते कि जुल्फिकार खान परत येण्यास निघाला. मराठ्यांनी चोहीकडून हल्ले चढविले, मराठे देसुर मुक्कामी गोळा झाले होते. मोगली सैन्याची अशीकाही दाणादाण उडाली होती कि तिथे असणार्या भाताच्या शेतीत मोगली उंट, बैलगाड्या, हत्ती रुतून बसले चिखलातून मार्ग काढत उरल्यासुरल्या सैन्याने जीव वाचवून पळ काढला

छत्रपती राजाराम महाराज भोसले द्वितीय

Image
१८व्या शतकाच्या उत्तरार्धात देशात, महाराष्ट्रात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडून गेल्या परंतु इंग्रज अधिपत्याखाली असणाऱ्या जनतेमध्ये असणारा असंतोष आणि स्वातंत्र्यासाठी चाललेली धडपड यामध्ये काही गोष्टी, काही व्यक्ती, काही इतिहास हा समाजापुढे आलाच नाही. आणि त्यामुळे आज एकविसाव्या शतकात जगताना पुराव्याअभावी अशा घटना, वास्तू वा व्यक्ती यांविषयी जास्त काही माहिती मिळतचं नाही. त्यातीलच एक आघाडीचे नाव म्हणायला गेले तर छत्रपती राजाराम महाराज द्वितीय. लोकराजा ही पदवी मिळालेल्या कर्तुत्ववान पित्याचे हे पुत्र. म्हणजेचं राजर्षी शाहू महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती राजाराम आज्याचेच, पंज्याचे नाव नातू पणतू यांना देण्याच्या परंपरेमुळे छत्रपती घराण्यातील या दुसऱ्या राजाराम महाराजांची दखल तशी जास्त कुणी घेतलीच नाही, कोल्हापूर मधली अत्ता शेवटच्या अवस्थेत असलेल्या पिढीचा जर अपवाद सोडला तर यांच्याविषयी जर समाजात माहिती असली तरच नवल समजाव. ३१ जुलै १८९७ च्या हा द्वितीय छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्मदिवस, वडिलांच्याच पावलावर पाउल टाकत समाज हिताची कामे करणारया या राजांनी अनेक मोठमोठी कार्य पार पाड...

राणोजी शिंदे

Image
१७२७-२८ पासून राणोजी शिंदेचा कार्यकाळ सुरु होतो. माळवा प्रांतातून, चौथ व सरदेशमुखी वसूल करण्यासाठी मल्हारराव होळकर यांच्या जोडीला राणोजी शिंदे यांची नेमणूक होती. माळवा प्रांताचा मोगल सुभेदार गिरीधर बहाद्दर याचा जो निर्णायक पराभव मराठ्यांनी केला त्यात उदाजी पवार, मल्हारराव होळकर यांच्या जोडीला राणोजी शिंदे देखील आपल्या पथकासोबत उपस्थित होते. १७३५ पासून राणोजी शिंदे यांनी आपले लष्करी मुख्यालय उज्जैन येथेच ठेवले. जुलै १७३६ च्या दरम्यान महादेव भट्ट हिंगणे यास पाठविलेल्या एका पत्राद्वारे राणोजी शिंदे यांची स्वराज्यनिष्ठा आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व विशेष खुलून दिसते. असे हे राणोजी शिंदे १७३५ ते १७४५ मराठ्यांचे बस्तान बसविण्याच्या कामगिरीत सतत आघाडीवरचं होते. जयपूरचा शासक सवाई जयसिंह याच्या मृत्यूनंतर त्याच्या गादीवरुन चाललेल्या वारसाहक्कात राणोजी शिंदे यांना ईश्वरसिंहाने विशेष पत्र लिहून मदतीस बोलाविले यावरून त्यांचे त्याकाळचा दरारा देखील लक्षात येतो. या केलेल्या मदतीखातर ६६ लाख रुपये राणोजी शिंदेंना मिळाले छत्रपती शाहू राजांच्या पदरी असणाऱ्या अशा या रणमर्द सेनानायकाचा १९ जुलै १७४५ रोजी ...

समुद्रावरचा शिवाजी कान्होजी आंग्रे.

Image
आपल्या कर्तुत्वाच्या बळावर आंग्रे इतके मोठे आणि इतके प्रभावशाली झाले की दर्यावर बेपान्हा हुकुमत गाजवत.  छत्रपती शिवरायांनी दूरदृष्टीने उभारलेल्या आरमाराचा सुवर्णकाळ म्हणजे आंग्रे घराण्याचा काळ परंतु पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेचं महाराष्ट्राच्या, देशाच्या एका कडेचे संरक्षण करता करता त्यांनी घडविलेला इतिहास देखील कडेलाच राहिला. अरबी समुद्रात त्यांनी उभारलेले, राखलेले, आणि उध्वस्त केलेले किल्ले अजाही याची साक्ष देतात. आपल्या कर्तबगारीने, जहाजांशी जवळीक जोडणाऱ्या सागरावर सत्ता सांगणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी साऱ्यांना धाकात ठेवण्याचे कार्य आंग्रे घराण्याने मोठ्या धाडसाने पार पाडीत भारताच्या आरमारी इतिहासाचे पानच लिहिले असे म्हणायला हरकत नाही. सन १७१०-१२ सुमारास आंग्रे समुद्रावर अशाप्रकारे प्रबळ झाले होते की हिंदुस्थानातीलचं नव्हे तर युरोपियन सत्तांना देखील भारी होऊन राहिले आहेत असे गोव्याचा व्हाईसरॉय पोर्तुगालला आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रात म्हणतो -  'महाराज, आन्र्यांनी सांप्रत उत्तर समुद्र किनाऱ्यावर लुटालूटीची मोहीम सुरु केली आहे. त्यांना ते शक्य आहे, कारण काही बं...

बारगीर

Image
बंगाली भाषिकांचा इतिहास, सेनगुप्ता यांनी असे लिहिले आहे कि, "बर्गी हा शब्द बारगीर या शब्दाचा अपभ्रंश आहे, तसेच ते खास करून हटकर लोक असत जे घोडेस्वार आणि शस्त्र घेऊन मराठा साम्राज्यात शिलेदार या पदावर असत.हटकर या समाजाला बर्गे हे एक उपनाव देखील आहे. त्यात बर्गे,बारगळ अशी आडनावे आहेत. थोरले सुभेदार मल्हारराव वीरकर- होळकर यांचे मामा सुद्धा सरदार कदमबांडे यांच्याकडे बारगीळ होते. त्या काळात हे सर्वच जण 'मराठा धनगर' म्हणून ओळखले जात असत. त्यानंतरच्या काळात यापैकी रघुजी कारंडे.. ते नागपूरकर भोसले यांचे विश्वासू आणि सेनापती होते. 'Captain Fitzgerald' या इंग्रज अधिकाऱ्याने बेरर (सध्याचा मराठवाड्यातील काही भाग) या भागात सह्हायक आयुक्त असताना काही माहिती गोळा केली त्यात असे म्हटले आहे कि. " हटकर असे म्हणतात कि जेव्हा दिल्लीच्या बादशहातर्फे निजामाला दक्खनचा सुभेदार म्हणून नेमले गेले त्याच काळात आम्ही इथे आले आहोत, सर्व हटकर हे मेंढपाळ (धनगर) ,भाला घेऊन मेंढपाळ करणारे आहेत. हटकर असे म्हणतात कि, ते जेव्हा कधी कुठल्या मोहिमेसाठी बाहेर निघतात तेव्हा फक्त सात हात लांब घों...

दुसरा राज्याभिषेक

Image
अजून रायगडाच्या महादरवाज्या वरील तोरणं काढली सुद्धा नव्हती तोच. मातोश्री जिजाऊसाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. गडावर सुतककाळ येऊन पडला, तरी कर्तव्यपारायण राजे स्वराज्याची चिंता सदैव हाकत होते. सुतकातच त्यांनी अधिकाऱ्यांसाठी कानुजाबता तयार केला. कवी भूषणचा शिवराज-भूषण ग्रंथही लिहून बाळाजी आवाजी चिटणीस याजकडे दाभोळ वगैरे गावांच्या खोतीसुद्धा मोकासा दिल्याचे व त्या कामावर हुसेन याकुब दळवी याला ठेवल्याचे कळवून त्याचेकडून काम घेण्याची आज्ञा केली.   राज्याभिषेकाला प्रचंड खर्च झाला होता. आता राजे तो भरून काढण्याच्या मागे लागले तेही याचकाळात बऱ्याच मोहिमा काढण्यात आल्या त्याचपैकी एक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आण्णाजीपंतांना महाराजांनी फोंड्यावर अचानक छापा घालण्यासाठी रवाना केले. अण्णाजीपंत त्याप्रमाणे कुडाळपर्यंत आले. पण महमदखानाला ही बातमी कळली व तो सावध राहिला. त्यामुळे आण्णाजीपंतांना डाव साधता आला नाही. त्यांना अपयश आले. जिजाऊ साहेबांच्या मृत्यूमुळे आधीच रायगडावर अपशकुनाची भावना बळावत चाललेली होती. त्यातच प्रतापगडावरील घोड्याच्या पागेला आग लागून महाराजांचे मौल्यवान घोडे जळाले. एक हत्त...

दिपाजी राऊत

Image
शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतल्यामुळे हडबडलेल्या विजापुरी सल्तनतीने राजांवर बहलोलखान सारखा खासा पठाण धाडला होता परंतु अष्टावधानी असणाऱ्या बहीर्जींच्या खबरी मंडळींनी ही बातमी वाऱ्याच्या वेगाने महाराजां पावेतो पोहचवली. आणि त्यांच्या बंदोबास्तालाच प्रतापरावांसोबत १५ हजार फौज फाटा धाडला होता प्रतापरावांनी साऱ्या सैन्यासमवेत जिवाच्या बाजीने घोडी हाकली अन् बहलोल खानच्या तळालाचं वेढा दिला. अचानक कोसळलेल्या संकटामुळे खानाची फौज थोडी घाबरली. परंतू लगेचच त्यांनी लढाईची सिद्धता दाखविली. लवकरच दोन्ही कडचे घोडदळ पायदळ एकमेकांवर आदळू लागले. एकच कापाकापी सुरु झाली. सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलदेव, विसोजी बल्लाळ, व आनंदराव असे मराठी रियासतीचे अनुभवी सरदार अंगावर येणाऱ्या प्रत्येक गनिमास आपल्या तरवारीने पाणी पाजत होते. यात तरणे वीर तरी मागे राहतीलच कसे रुपाजी भोसले, सोमाजी मोहिते, सिधोजी निंबाळकर यांसारख्या त्यातल्यात्यात अनुभवी तरुणांमध्ये दिपाजी राऊत हे अगदी तलवारीच नवखं पातं पण हेदेखील तिखट हत्यार चालवीत होते. बेहलोलखान व त्याचे सरदारही जबर युद्ध खेळू लागले. त्याच...

आंग्र्यांनी फिरंग्यांची केलेली दाणादाण १३ सप्टेंबर १७२०

Image
काळ बदलला होता जिकडे तिकडे मराठी सत्ता आपले शौर्याचे भगवे प्रतिक फडकवत दौडत होती. महराजसाहेबांनी स्थापन आरमाराची रेलचेल  देखील मोठ्या तोऱ्यातचं चालू होती समुद्रावरील शिवाजी समुद्रावर निर्विवाद वर्चस्व गाजवत होते. इंग्रजांच्या नाकी दम आणत होते. दि. १३ सप्टेंबर १७२० मंगळवार रोजी कॅप्टन ब्राऊन याच्या अधिपत्याखाली मुंबईकर इंग्रजांची लंडन, व्हिक्टोरिया आणि रिव्हेंज ही लढाऊ जहाजे घेरीयाच्या स्वारीवर निघाली. मिस्टर वॉल्टर ब्राऊनला सर्व कमांडर-इन-चीफची पदवी घेऊन त्याला अ‍ॅडमिरलचा हुद्दा दिला होता. लंडन हे ४० तोफांचे, चांडोस हे ४० तोफांचे, व्हिक्टोरिया २६ तोफांचे, रिव्हेंज १८ तोफांचे, डिफायन्स हे १६ तोफांचे आणि पेल्हाम हे १६ तोफांचे अशी लढाऊ जहाजे या आरमारात होती. याशिवाय हंटर या नावाचे एक दुकाठी जहाज, प्रिन्स या नावाचे एक एकाच डोलकाठीचे जहाज या आरमारात होते. 'टेरिबल बॉम्ब' या नावाचे एक बॉम्बफेक करणारे जहाज होते. ह्या जहाजांखेरीज दोन गलबते होती. एक अग्निक्षेपक जहाज होते आणि शिवाय किनाऱ्याला लावण्यास सोयीची अशी अनेक मच्छीमारी होडकी होती. किनाऱ्यावर उतरणाऱ्या तुकडीत ३५० इंग्रज शि...

तिरसट आणि अस्वस्थ औरंगजेब

Image
१६८३ च्या मार्च महिन्यात अकबराच्या विरुद्ध ज्या मोगल फौजा पाठविण्यात आल्या होत्या त्या बादशहाने परत बोलाविल्या. २३ मार्च रोजी रहुल्ला खान आणि रणमस्तखान यांनी कल्याणचा ताबा सोडला परंतू ताबा सोडतांना त्यांनी शहराभोवती संरक्षणाकरिता जी तटबंदी बांधली होती. ती त्यांनी पाडली आणी जाळून टाकली. मोगल सैन्य माघार घेत असतांना रुपाजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील मराठा संयाने तीतवाला ह्याठिकाणी (कल्याणच्या ईशान्येला सात मैलावर) मोगलांवर अकस्मात हल्ला चढविला. त्या हल्ल्यात अनेक सैनिक ठार मारले गेले आणि मराठ्यांनी अनेक घोडी पळवून नेली.   अशा रीतीने दक्षिणेत आल्यानंतर एकवर्षापेक्षा म्हणजे नोव्हेबर १६८१ ते एप्रिल १६८३ पासूनचा कालखंड लोटून गेला तरी बादशहाला, त्याच्याजवळ इतकी अफाट साधनसामग्री असताना सुद्धा, कोणतीही भरीव कामगिरी साध्य करता आली नाही. खरी परिस्थिती अशी होती की बादशहाला ह्यावेळी घरगुती आणि मानसिक पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागत होते, स्वतःच्या कुटुंबावरचा त्याचा विश्वास उडून गेला होता. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेवू नये आणि आपण कुठे रहावे म्हणजे सुरक्षित राहू हेही त्याला कळेनासे ...

स्वातंत्र्य.....

Image
तुम्हीच दाखविले महत्व स्वातंत्र्याचे तुम्हीच फोडिले तख्त मदांध पारतंत्र्याचे तुमचीच प्रेरणा सदैव शहीदांना लाभली हे स्वातंत्र्यसूर्या मान तुम्हापुढे करोडोंची लवली . कडाडला शिव, हा तर गोरा डाग स्वराज्यावर, मधात बुडवूनि दिली आम्हाला जहरी खडीसाखर गोड बोलुनी चाल चालती, निमित्तास व्यापार मराठमोळ्या कुदळी खणती ढोंगी, धूर्त वखार . छत्रपती शिवाजी महाराज यांनी या गोऱ्या लोकांचे डाव आधीच ओळखले होते. राजे स्वतः जातीने यांच्या मुसक्या अवळत आणि त्यांच्याच देखरेखीखाली घडणाऱ्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांना देखील अखंड सावधानतेचा इशारा देत. इंग्रजांनी केलेली छोटीशी हालचाल देखील त्यांना सहन होत नसे ते लगेचच त्यांच्या विरुद्ध आघाडी उघडत. संभाजी राजेंनी देखील शिवाजी महाराजांच्या पावलावर पाउल ठेवतच हे कार्य पुढे चालविले इंग्रज १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबई सुरत अशा बंदरावर होते त्यात मुंबईवर त्यांची हुकुमत बऱ्याप्रमणात चालायची संभाजी राजांनी त्यांच्या काळात इंग्रजांची दखल अगदी बारकाईने घेतली. संभाजी राजेंना पुढे उत्पन्न होणाऱ्या धोक्याची चाहूल जणु आधीच लागावी म्हणूनच की काय, आधी या ...

मावळच्या मराठ्यांची माळव्यातील आक्रमणे (सुरवात)

Image
इ. स. १६९९ च्या नोव्हेंबर महिन्यात कृष्णा सावंत यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने पहिल्या प्रथम नर्मदा नदी ओलांडली आणि त्यांनी धामुणीच्या परिसरापर्यंत माळव्यावर आक्रमण केले. माळव्याचा मार्ग अशा रीतीने खुला झाल्यानंतर तो कधीही बंद झाला नाही. आणि याचाच परिणाम म्हणून शेवटी अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत माळवा हा पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात गेला. जानेवारी १७०३ मध्ये मराठ्यांनी नर्मदा नदी पुन्हा ओलांडली आणि त्यांनी उज्जैनच्या परिसरात मोठा उपद्रव निर्माण केला. ऑक्टोबर १७०३ मध्ये नेमाजी शिंदे हे एखाद्या लाटेप्रमाणे वऱ्हाडवर जाऊन कोसळले. त्यांनी (फिरोजजंगच्या वतीने नेमल्या गेलेला) वऱ्हाडचा नायाब सुभेदार रुस्तुमखान याचा पराभव केला आणि त्याला युद्धाकैदी म्हणून पकडले, त्यानंतर हुशंगाबाद जिल्ह्यावर हल्ला चढवून नेमाजी शिंदे छत्रसालाच्या विनंतीवरून नर्मदा ओलांडून माळव्यात आला. अनेक खेडी आणि गावे लुटल्यानंतर त्याने सिरोंजला वेढा दिला. परंतु यावेळी दुसऱ्या एका मराठा सैन्याचा पाठलाग करीत फिरोजजंगाने वऱ्हाडात प्रवेश केलेला होता त्याने निवडक सैनिकांनीशी बातमी मिळताच हल्लेखोरांचा (मराठ्यांचा) पाठला...

पोर्तुगीजांचा समाचार

Image
मोगलांशी व सिद्दीशी संघर्ष चालू असतानाच संभाजी महाराजांच्या पोर्तुगीज या तिसऱ्या सत्तेशी संघर्ष सुरू झाला. युरोपियन सत्तांचे मराठ्यांविषयीचे धोरण हे कायमच दुटप्पी राहिले होते. पोर्तुगीजाचे पश्चिम किनाऱ्यावर दोन ठिकाणी राज्य होते. पहिले गोव्याचे तर दुसरे उत्तर कोकणातील चौल, वसई, दमण इ. भागाचे. संभाजी महाराजांशी मैत्रीची बोलणी सुरु असतानाच पोर्तुगीज व्हाईसरॉयने स. १६८२ च्या डिसेंबरमध्ये मराठ्यांच्या मुलखांवर हल्ले करावयास आलेल्या मोगली फौजांना आपल्या प्रदेशातून जायला वाट दिली. यासंबंधीचे पत्र देखील पोर्तुगीज व्हाईसरॉय ने औरंगजेबास पाठविले. परंतू आक्रमणास तितक्याच तीव्रतेने किंबहूना अधिक तीव्रतेने प्रतिकार हे संभाजी महाराजांच्या युद्धनीतीचे सूत्र होते. पोर्तुगीजांच्या कुरापातीचा बदला त्यांनी ६ हजार पायदळ व २ हजार घोडदळ यासह त्यांच्या उत्तरेकडील राज्यावर स्वारी करून घेतला (जून १६८३) ही स्वारी ६ महिने चालू होते. डॉ. व्ही. टी. गुणे यांनी म्हटले आहे की, ''उत्तर फिरंगणातील दमण ते चेऊन (चौल) पर्यंतचा सर्व प्रांत निळोपंत पेशव्याने ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८३ पर्यंत काबीज केला. तेव्हा ४...

शहाजीराजांस कैद

Image
रणदुल्लाखानच्या मृत्युनंतर खानखानान, वजीर मुस्तफाखान हे सेनापती कर्नाटकात धुमाकूळ घालीत होते. शहाजीराजे बंगळूरास वास्तव्यास होते. त्यांना या सेनापतीच्या हाताखाली कामे करवी लागे. निजामशाहीची सूत्रे सहजरीत्या खेळवलेल्या शहाजीराजांचा कर्नाटकाशी आतापर्यंत १२ वर्षे घनिष्ट संघर्ष आला होता. विजापूरकरांचा सेनापती वारंवार बदले, पण शहाजीराजे मात्र जिंकलेल्या भागाच्या व्यवस्थेसाठी तिकडेच कायम स्थायिक झालेले होते. तेथील संस्थानिकांवर शहाजी महाराजांचा प्रभाव होता एकप्रकारे, संपूर्ण कर्नाटक, हस्त्गर केल्यासारखेच झाले! नेमक्या याच गोष्टीचे मुस्तफाखानसारख्या वजीरांना व सरदारांना वैषम्य वाटत होते.  पहिला सेनापती रणदुल्लाखान शहाजीराजांच्या सल्ल्यानेच वागत असल्याने तोच प्रघात खानखानाने पाळला. परंतू वजीर मुस्तफाखान हा शहाजीविरोधी पक्षाचा असल्याने शहाजीविरोधी आघाडी प्रबळ झाली.  या आघाडीत  अफजलखान, बाजी घोरपडे, यशवंतराव वाडवे इत्यादी प्रभावी सरदार मुस्तफाखानाला सामील झाले. मुस्तफाखान खान कर्नाटकस्वारीवर गेला पुन्हा विजापुरी आला परंतू कर्नाटक प्रांती विजापूर दरबारावविषयी घातपाती कट रचण्यात...

जेव्हा आमचे राजे वेढ्यात अडकला होते

Image
वास्तविक तरवार गाजविणे मराठ्यांसाठी नित्यनियमाचेचं झाले होते. राजे पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले, विजापूरी सरदाराने पन्हाळ्यास वेढा दिला नाव सिद्दी जोहर. विजापूरवर दबाव आणून आदिलशहाला सिद्दीच्या सैन्यातील काही सैन्य परत बोलावून घ्यावे लागेल या महत्वकांक्षी हेतूने सरसेनापती नेतोजी पालकर यांनी द्रुत गतीने घौडदौड करून विजापूरच्या आसमंतातील शहापूरवर हल्ला केला. ही वेळ रात्रीची होती. मराठ्यांनी शहापूर बेचिराख केले, लुट घडवून उद्धवस्त केले. मराठ्यांना रोखण्यासाठी आदिलशाही सेनापती मुल्ला महंमद, बाबुलखान व अजापा नायक या दोन सरदारांसह धौव्न आला.पण मराठ्यांच्या रोष एवढा विलक्षण होता की, शहाचा दारुण पराभव झाला.  त्यांचे २००० घोडेस्वार मराठ्यांनी कैद केले, इकडे मराठ्यांची दुसरी तुकडी यावेळी कोकणात दाभोळ ते कुडाळ हा आदिलशाही मुलुख लुटून फस्त करीत होती. महाराजांचे ३-४ हजार लोक किनारपट्टीवर निर्भयपणे वावरत होते व खानदानी वसूल करीत होते. विपरीत परिस्थितीतही मराठ्यांनी शके १५८२ च्या जेष्ठ शु. ८ ला म्हणजे दि. ६ जून १६६० रोजी विजापूरकरांकडील वासोटा गड जिंकून घेतलाच!  प्रतापगडाकडील जेधे - बांदाल...

गुजरात लढा ४/३/१७०६

Image
सतरावे शतक उजाडले होते तरी मराठ्यांची तरवार वावटळं घुमावी तशी घुमतच होती. दख्खन जिंकण्याचे बादशहाचे मनसुबे केव्हाचेच मातीमोल झाले होते. स्वतःच्या(मराठ्यांच्या) घरात अजगर लोळतचं होता (औरंगजेब) पण आता त्याची फिक्र न करता. त्याचाच मुलुख मारत मराठा सरदार घुमत होते. बादशहा अहमदनगरा स्थाईक झाल्यानंतर मराठ्यांनी सेनापती धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली गुजरातवर एक जंगी मोहीम काढली. मराठ्यांच्या विजयाने बादशहा हादरला. मार्च १७०६ मढे मराठ्यांनी भडोच, सुरत व गणदेवी परिसर लुटला. सुरतेचा काझी मराठ्यांचा कैदी बनला गुजरातचा सुभेदार शहजादा अज्जमच्या जागी काश्मीरचा सुभेदार इब्राहीम खान याची नियुक्ती झाली. यावेळी गुजरातमध्ये हजर असणारा काफिखान म्हणतो "मोगल सैन्याचे आधिपत्य महंमद बेग खान, नजर अली खान व इल्तीफारखान यांच्याकडे होते. सोबत १०/१२ सरदार, १३/१४ हजार स्वा आणि ७/८ हजार पायदळ शिपाई होते. उभ्य पक्षात ४ मार्च ला मारामारी झाली. मराठे पळून गेले. मोगल सैन्य आराम करीत होते. याच वेळी मराठे ७/८ हजार स्वरांनिशी गाफील मोगल सैन्यावर तुटून पडले. मोगलांची दाणादाण झाली. सफदरअलीखान बाबी कैद झाला. तर नजर अल...

आज लढला सिंह कोंडाण्यासाठी ४/२/१६७०

Image
त्या दिवशी वारे बरेच वाहत होते. देवासामोरील वात फरफरत तेवत होती, जिजाऊ आपल्या बिछान्यावर पहुडलेल्या. शिवबा त्यांचे पाय रगडित होते . जिजाऊंची नजर आपल्या खिडकीतून समोर गेली . आणी त्या ताडकन उठून खिडकीजवळ उभ्या ठाकल्या मागोमाग राजे होतेच " काय झाले आऊ साहेब" "शिवबा, शिवबा मोघली ध्वज मिरवणारा कोंडाणा आमच्या डोळ्यात खूप दिवस सलत आहे शिवबा शिवबा राजेंना हुकुमच भेटला होता आईची आज्ञा शिरसावंद्य मानणारा राजा इतक्यात महालाचे पडदे बाजूला सारून एक धिप्पाड देहाचा माणूस आईसाब, राजं करीत आत आला. तो होता तान्हाजी मालुसरे. आपल्या मुलाच्या लग्नाच्या अक्षदा घेऊन तो आला होता. तान्हाजी आले त्यांनी आऊसाहेबांचे पाय शिवले महाराजांना मुजरा करीत गळाभेट घेतली. " राजं आपली पायधूळ झाडायची पोराला सुनं ला आशीर्वाद द्याया यायचे राजं बरका आऊसाहेब" पण दरवेळी तेजपुंज दिसणाऱ्या राजांच्या चेहऱ्याचे तेज इतरवेळी सारखे नव्हतं. आणि तान्हाजीला हे लगेच जाणवलं. अहो जाणवणारच की बालपनाचं मैतर त्ये. " राज काय झालं सगळी खैरीयत तर हाय न्हव.मी आल्या पासून बघतोय काय तरी लपवतायीसा ह्या ता...