Posts

Showing posts with the label छत्रपती

छत्रपती राजाराम महाराज भोसले द्वितीय

Image
१८व्या शतकाच्या उत्तरार्धात देशात, महाराष्ट्रात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडून गेल्या परंतु इंग्रज अधिपत्याखाली असणाऱ्या जनतेमध्ये असणारा असंतोष आणि स्वातंत्र्यासाठी चाललेली धडपड यामध्ये काही गोष्टी, काही व्यक्ती, काही इतिहास हा समाजापुढे आलाच नाही. आणि त्यामुळे आज एकविसाव्या शतकात जगताना पुराव्याअभावी अशा घटना, वास्तू वा व्यक्ती यांविषयी जास्त काही माहिती मिळतचं नाही. त्यातीलच एक आघाडीचे नाव म्हणायला गेले तर छत्रपती राजाराम महाराज द्वितीय. लोकराजा ही पदवी मिळालेल्या कर्तुत्ववान पित्याचे हे पुत्र. म्हणजेचं राजर्षी शाहू महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती राजाराम आज्याचेच, पंज्याचे नाव नातू पणतू यांना देण्याच्या परंपरेमुळे छत्रपती घराण्यातील या दुसऱ्या राजाराम महाराजांची दखल तशी जास्त कुणी घेतलीच नाही, कोल्हापूर मधली अत्ता शेवटच्या अवस्थेत असलेल्या पिढीचा जर अपवाद सोडला तर यांच्याविषयी जर समाजात माहिती असली तरच नवल समजाव. ३१ जुलै १८९७ च्या हा द्वितीय छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्मदिवस, वडिलांच्याच पावलावर पाउल टाकत समाज हिताची कामे करणारया या राजांनी अनेक मोठमोठी कार्य पार पाड...

दुसरा राज्याभिषेक

Image
अजून रायगडाच्या महादरवाज्या वरील तोरणं काढली सुद्धा नव्हती तोच. मातोश्री जिजाऊसाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. गडावर सुतककाळ येऊन पडला, तरी कर्तव्यपारायण राजे स्वराज्याची चिंता सदैव हाकत होते. सुतकातच त्यांनी अधिकाऱ्यांसाठी कानुजाबता तयार केला. कवी भूषणचा शिवराज-भूषण ग्रंथही लिहून बाळाजी आवाजी चिटणीस याजकडे दाभोळ वगैरे गावांच्या खोतीसुद्धा मोकासा दिल्याचे व त्या कामावर हुसेन याकुब दळवी याला ठेवल्याचे कळवून त्याचेकडून काम घेण्याची आज्ञा केली.   राज्याभिषेकाला प्रचंड खर्च झाला होता. आता राजे तो भरून काढण्याच्या मागे लागले तेही याचकाळात बऱ्याच मोहिमा काढण्यात आल्या त्याचपैकी एक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आण्णाजीपंतांना महाराजांनी फोंड्यावर अचानक छापा घालण्यासाठी रवाना केले. अण्णाजीपंत त्याप्रमाणे कुडाळपर्यंत आले. पण महमदखानाला ही बातमी कळली व तो सावध राहिला. त्यामुळे आण्णाजीपंतांना डाव साधता आला नाही. त्यांना अपयश आले. जिजाऊ साहेबांच्या मृत्यूमुळे आधीच रायगडावर अपशकुनाची भावना बळावत चाललेली होती. त्यातच प्रतापगडावरील घोड्याच्या पागेला आग लागून महाराजांचे मौल्यवान घोडे जळाले. एक हत्त...

शिवराज्याभिषेक

Image
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा अधीर मनाच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला देव देश आणि धर्म रक्षणासाठी खर्ची पडलेले असंख्य ज्ञात अज्ञात मावळे. कित्येक माता भगिनींचे रिते कपाळ या सगळ्यांच्या जखमा आज रायगडावर बुजणार होत्या रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून पिकवलेल्या शेतीचे आज सोने होणार होते आज शिवाजी राजे छत्रपती होणार होते, रायगडावर धामधुमिचे काळ चालू होता. मावळे, नोकरचाकर, राणीवसा, सगळ्यांची धावपळ चालू होती, लोकं आनंदान दमत होते. रायगडावरती राज्याभिषेकाची पूर्व तयारी पूर्ण झाली. धार्मिक विधीला प्रारंभ झाले.ऐशानयाग विधी,मुंज,ग्रह-यज्ञ,प्रतीमादान, सोयराबाई साहेबांसोबत पुनश्च लग्न, सुवर्ण तुला, पुण्यहवाचन असें सर्व धार्मिक विधी यथासांग पार पडले.रायगड दुमदुमत होता हा आनंद होता सार्वभौमत्वाचा हां आनंद होता स्वातंत्र्याचा. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट झाली, राजवाड्यामध्ये तीन पाट ठेवण्यात आले मधोमध महाराज बसले होते डाव्या बाजूला राणी सोयराबाई बसल्या होत्या आणि उजवीकडे संभाजी महाराज बसले होत...

फर्जंद शहाजी राजे

Image
पराक्रम , युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व! जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ 3 वर्षे टिकला होता. या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची भावना, चारित्र्य याप्रमाणेच स्वराज्यसंकल्पना हे सर्व घटक आनुवंशिकतेने शहाजीराजांकडून त्यांच्या अंगी आले होते असे निश्र्चितपणे म्हणता येते. फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळे...

शिवजन्माची घटका

Image
शास्त्रीबुवांनी बोटे मोजली घटकापाळांचे गणित मोजले . कुंडलीची घरे ग्रह धरू लागली . कुंडली मांडून होताच शास्त्रीबुवांनी जिजाबाईंकडे पाहिले . जिजाऊ म्हणाल्या - "शास्त्रीबुवा संकोच न करता स्पष्टपणे सांगा या पोराच्या वेळी दिवस गेले आणी घरादाराचा थारा उडाला कुणाचा कुणाला मेळ लागेना. रक्ताच्या नात्याने वैर पत्करलं, जहागिरीवर सोन्याचे नांगर फिरले, आजोबांचे छत्र हरले (लखुजी जाधव ज्यांचा विजापुरी दरबारात खून करण्यात आला), या मितीला या पोराचे वडील शत्रूमागे धावत आहेत. याचा थोरला भाऊ लहान त्याची ही या वणवणीतून सुटका नाही. सा-या मुलखाची अन्नान दशा झाली आहे. परमुलखात परठिकाणी ना माहेरी ना सासरी मी या मुलाला जन्म देत आहे. पोटात असता ही त-हा आता त्याच्या पायगुणाने आणखी काय धिंडवडे निघणार आहेत. तेवढे सांगून टाका" हे ऐकून सा - यांचे चेहेरे व्यथित झाले . शास्त्रीबुवा मात्र शांतच होते व त्यांच्या चेह - यावरील लवलेश बदलला नाही व त्यांनी भविष्य सांगण्यास सुरवात केली , राणीसाहेब असे अभद्र मनात आणू नये , अशुभाचा मनाला स्पर्श ही होऊ देऊ नका . दुर्भाग्य ...

किमॉंशहरण

Image
औरंगजेबाला पूर्ण हिंदुस्थान वर एक छत्री अमल प्रस्थापित करावयाचे होते उत्तरेकडील भागात ते निर्विवाद सत्ता गाजवत होते परंतु दक्षिणेतील उठावांमुळे त्याचा मनसुबा पुरा होत नव्हता दक्षिणेकडील विजापुर , गोवळकॊंडा आणि मराठे यांचा नायनाट करण्याची आपली दीर्घकाळाची महत्वाकांक्षा पुर्ण करण्याच्या हेतुनेच तो दक्षिणेत उतरला होता. त्याचा सेनासंभार मराठ्यांच्या सामर्थ्यापेक्षा किती तरी पटींनी अधिक समृद्ध आणि संपन्न होता. पण शंभूमहाराजही काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. कडवी झुंज हे जणू मराठ्यांच्या रक्तातच निपजले होते आपल्या मुठभर संभाजीराजांच्या सेनेनी त्याच्या सेनेला इतके सळो कि पळो करुन सोडले होते . प्रत्येक ठिकाणी अपयश येत होते आणि ते पचवणे ही फार कठीण होते . अपयश येत असल्याने आपल्या अधिकाऱ्यांच्या सतत बदल्या कराव्या लागत होत्या. मुघलांचे अवाढव्य सैन्य आणि त्यांचा बादशाही सरंजाम कोठेही स्थीर होऊ दिला नाही. माणसे, घोडे, मालवाहू जनावरे, धान्य यांचा मराठ्यांनी गनिमीकाव्याने नाश केला. कल्याण , भिवंडी, रायगड, पुरंदर वगैरे सर्वच मराठी मुलखात औरंगजेबाला ...

जिजाऊसाहेब जयंती (Mothers Day) १२ जानेवारी

Image
आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता! जि वंतपणा, जा गेपणा, बा णेदारपणा, ई श्वरार्पणवृत्ती याच गुणसमुच्चयाचं सगुणरूप असलेल्या जिजाबाईसाहेबांचे पोटी जन्म घेऊन असं एक हिंदवी- स्वराज्य आपण आम्हाला दिलत की, बैराग्याची छाटी हाच जिथला झेंडा होता ! हर हर महादेव हाच जिथला महामंत्र होता ! सह्याद्रीच्या कुशीतील गोरगरीब मावळे हेच जिथलं बळ होतं ! हे राज्य श्रींचे हाच जिथला अढळ विश्वास होता ! - आणि, महाराष्ट्रधर्म वाढविण हाच जिथला कर्मयोग होता ! जगदंबकृपेने झाली मुलगी म्हाळसाराणीला ! तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वाला. फसली सन १००७ ला, पौष पौर्णिमा सूर्योदयाला ! राणी म्हाळसा महालाला चौकाचे नैऋत्य कोनाला ! या उल्लेखानुसार जीजामातेचा जन्म सिंदखेड येथे फसली सन १००७ च्या पौषी पौर्णिमेला सूर्योदय समयी, म्हणजे गुरुवार दिनांक १२ जानेवारी १५९८ रोजी सकाळी झाला त्या दिवशी पुष्यनक्षत्र होते म्हणजे गुरुपुष्याचे सुमुहूर्...

शिवप्रताप दिवस

Image
"मासाहेब, उद्या आम्ही खान भेटीला जाऊ. जगदंबा आमच्या पाठीशी आहेच पण काही बरं वाईट झाले तर आपले राज्य ..." "शिवबा........... "तुम्ही काळजी करू नका. जर तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर आम्ही समजून जाऊ कि आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्या चिंतेने तुमचा धीर खचून जाता काम नये " जिथे पोरं मरणासाठी उभी केली जातात तिथे पोरं मेल्यावर सुद्धा जिवंत राहतात. महाराजांनी जावळी मारली आणि विजापूरची आदिलशाही पार थरारून गेली. सह्याद्रीचा हा वाघ आता डोईजड झाला होता. ह्याचा बंदोबस्त करणे म्हणजे काळाची गरज झाली होती. म्हणून बड्या बेगमने भर दरबारात आवाहन केले - ''कोण? कोण? कोण जाईल सह्याद्रीच्या त्या गुहेत? कोण पकडेल त्या वाघाला?'' सगळ्यांची जुबान बंद, डोळे जमिनीचे वेध घेत, मुंड्या खाली झुकल्या होत्या. बडी बेगम आग ओकत होती, " ऐसा कोई मायका लाल नही, ऐसा एक भी मर्द नही इस बिजापुर दरबार में?" उत्तर काही येत नव्हते. पानाचे विडे जसे होते तसे तबकात निपचित पडले होते. "हम जायेंगे बेगम साहिबा" कोण? कोण? कोण? सगळ्यांच्या माना मागे...

महाराजांचे महानिर्वाण

Image
राजीयांचे देहवसान झाले ते दिवशी पृथ्विकंप जाहला. गगनी धूमकेतू उदेला. उल्कापात आकाशाहून जाला. रात्री जोड-इंद्रधनुष्ये निघाली. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्री शंभूमहादेवी तळ्यांचे उदक रक्तांबर जाले. पाण्यातील मत्स्य बाहेर पडून अमासवणी उदक जाहले.माझ्या राजाच्या जाण्याने हा तर केवळ सृष्टवर झालेला परिणाम काय अवस्था झाली असेल गडकऱ्यांची.आप्तइष्ठांची रायगड पूर्ण काळवंडला होता, गगनाला भिडलेले टकमक टोक आज ठेंगणे दिसू लागले होते.तेजस्वी सूर्याचा प्रकाश देखील आज मंद झाला होता. वरंधा घाटाच्या पलीकडून उंच आकाशात मान असलेला राजगड जणू तिथूनच राजेंचे अंतिम दर्शन घेत होता तो राजगड ज्याने पाहिले महाराजांचे तरुणपण, ज्याने पाहिले महाराजांचे जाणतेपण, करतेपण ते शौर्य तो पराक्रम ते धाडस ते अतिउच्च साहस वयाची २५ वर्षे आपल्या डोक्यावर महाराजांचा असणारा हात. राजाराम महारजांचा जन्म, सईबाईंचे निधन, तो त्या कित्येक वादळे धैर्याने सहन करणारा त्या राजगडाचा आज धीर खचला त्याच्या तिन्ही माच्या राजंना शेवटचा मुजरा करत होत्या,बालेकील्ल्याने टाहो फोडला होता २५ वर्ष माझ्या डोक्यावरचा मुकुट असणारा माझा राजा आज मला स...

दुष्मनाने दुष्मनाची केलेली तारीफ

Image
मराठ्यांना इतिहास घडवायचे माहीत होता. पण आपण घडवलेला इतिहास आपला पराक्रम लिहिणे त्यांना कधी जमले नाही पण ज्यांना मराठ्यंनी सळो की पळो करून सोडले त्या विजापूर दरबाराचा कवी असतो की फिरंग्यांचा एखादा लेखक. मराठ्यांचा इतिहास अतिशय समर्पक वाक्यात वर्णन करतात. स्वतः औरंगजेब आपल्या राजाचे गुणगान गातो मग हे तर ........... दुश्मनाने दुष्मनाची केलेली तारीफ जरूर ऐका विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष...

झडप बहिरी ससाण्याची

Image
विजापूरचा आदिलशाही सरदार फत्तेखान हा मोठ्या फौजेनिशी कऱ्हेपठारात (पुरंदर तालुका) शिरला. त्याचा तळ जेजुरीजवळच्या बेलसर गावाजवळ पडला. त्याला खात्रीच होती की , शिवाजीराजांचं बंड आपण लौकरात लौकर साफ मोडून काढू. त्यांनी आपल्या सैन्याचा एक विभाग शिरवळवर पाठविला. नीरा नदीच्या काठी शिरवळला एक भुईकोट किल्ला नव्या स्वराज्यात राजांनी कब्जा केलेला होता. त्याचं नाव ' सुभानमंगळ '. शाही फौज मोठी होती. तिने सुभानमंगळ एका घावातच जिंकला. मराठ्याचा हा स्वराज्यातील पहिला पराभव. शहाजीराजे विजापुरात कैदेत पडलेले. कोणत्याही क्षणी बादशहा शहाजीराजांना ठार मारू शकतो अशी परिस्थिती. पूवीर् असे सगळ्याच बादशहांनी अनेक लोक मारून टाकल्याच्या आठवणी ताज्या होत्या. कोणाचाही पाठिंबा नाही. अशा परिस्थितीत शिवाजीराजांची आणि जिजाऊसाहेबांची मन:स्थिती कशी झाली असेल ? लक्षात येते ती एकच गोष्ट की , इतक्या भयंकर आणि भीषण मृत्युचे तांडव दिसत असूनही ही मायलेकरं थोडीसुद्धा कचरली नाहीत. त्यांचा आत्मविश्वास जबर होता. राजे राजगडावर आपला डाव आखीत होते. त्यांनी फार-फार तर हजारभर मावळी सैन्यानिशी पुरंदरचा किल्ला गाठला. तो दिवस होत...

शब्दांविना गर्जे आमुचा दरारा!

Image
चाकणसारख्या भुईकोटाने शाहिस्तेखानाला आणि त्याच्या फौजेला चांगले पाणी पाजले होते, तिथे डोंगरी किल्ल्यांकडे वाकडी नजर करुन बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती, पण औरंगजेबाचा खलिता वाचुन त्याच्या तोंडचे पाणी पळाले होते. शिवाजीचे स्वराज्य कसे संपवावे यावर पुण्याच्या लालमहालात बसुन आराखडे बनवले जात होते, आधी डोंगरी किल्ले घ्यावे की आधी कोकण किनारपट्टी जिंकुन घ्यावी. चाकणच्या किल्ल्याने शहाणा झालेल्या खानाने ठरवले, आधी कोकण किनारपट्टीवर आपला अंमल बसवावा. एकदा का कोकण किनारपट्टी मुघलांच्या ताब्यात आली की शिवाजीचे आरमार आपोआप संपुष्टात येईल. बेत ठरला, आधी कोकण. खान अगदी एकांतात जाऊन बसला आणि त्याने आपला खास सरदार उझबेग कारतलबखान याला याद फर्मावले. कारतलबखानास त्याने चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल आणि नागोठणे हस्तगत करण्यास फर्मावले. आपल्या पराक्रमाने परिंडा किल्ला हस्तगत केलेल्या कारतलबखानाने हसत हसत ही मोहीम स्वीकारली. त्याच्याबरोबर कुमकेला खानाने मित्रसेन, कछप, सर्जेराव गाडे, जादोराव, अमरसिंह चौहान, जसवंतराव वगैरेंबरोबरच रायबाघनलापण कुच होण्यास सांगितले. रायबाघन, एक ब्राह्मण स्त्री मोघल फौजेत सामिल...

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब

Image
दरबार भरलेला सगळे सरदार अचानक बोलावलेल्या दरबारामुळे गोंधळलेले आणि घाबरलेले कारण ही काही असेच . कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाची खबर बादशाहाच्या कानावर आलेली असते . इतक्यात हुजऱ्या - आदब बिलामुलायजा होशियार सुलताने शेहंशाहे हिंदुस्तान हजरत मुहंमद मुहीबदिन आलमगीर बादशाह गाजी तशरिफ फर्मायन आणि त्याच्या नावाचा जयजयकार होतो आपला जयजयकार शून्य किमतीने वाटतो आणि औरंगजेब आपल्या मुलाकडे संतापाने पाहतो आणि बोलतो "ये सब फिजूल है शहजादे चंगे जोतैमुरखान ने कभी शिकस्त नही देखी लेकिन आज कंधार से लेकर तंजावरतक सारे हिंदुस्तान को मोघलीय सल्तनत मे शामिल करनेका ख्वाब देखने वाली मा बदोलत ये क्या देख रहा है सिवाजी ने हमारी आखोके सामने हमारी सल्तनत के तामीन कर दि ये हमारे मामुजान मिर्जा अमीर उलुब्रा नवाबे आजम अबू अलीद शायीस्तेखान साहब सब से शरमनाक बात है शेहजादे शिवाजीने उनकी लालमहलपर छापेमारकर उनके छक्के छुडा दिये ये तो तकदीर के सिकंदर थे जान बच गयी सिर्फ तीन उंगलिया गीर पडी ये जसवंत सिंग राठोड जोधपूर का राजा मारठोके जखम के वार छाती पर नही पीठ पर खाये ये हे सुरत के खुबसुरत इनाद्खान बह...

छत्रपती राजाराम

प्रस्तुत लेखात आपण छत्रपती संभाजी नंतरच्या मराठा राज्याची वाटचाल पाहानार आहोत. थोरल्या राजांनी जे कामावले ते राखन्याची जबाबदारी छत्रपती संभाजींवर आली ते त्यांनी राखले पण त्यांचा अकाली घरपकडी व नंतर हत्ये मुळे मराठेशाहीचा पार कणा मोडुन गेला. स्वराज्यास छत्रपती म्हणुन राजारामाला मंचकावर बसवीले. हा कालावधी या छोट्या हिंदु राज्याला फारच धामधुमीचा, दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला. छत्रपती राजाराम व नंतर त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्य पाहीले व तो काळ गाजविला व राज्य (थोडेसे का होइना जिंवत ठेवले) त्या कालावधीस आपण थोडक्यात भेट देऊ. छत्रपती राजाराम हा सन १६७० च्या २४ फेब्रुवारीला जन्मला. जन्मताना तो पायाकडुन जन्मला म्हणुन सर्वजन चिंतीत झाले असता शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तवीले. (ही कथा) जरी राजारामाने पातशीही पालथी घातली नाही तरी त्याने पातशाहाला मात्र झुंजवत ठेवुन यश मिळु दिले नाही, पातशाही खिळखिळी केली. राजारामास लिहीता वाचता येत होते. मोठ्या भावाप्रमाने तो कवि नव्हता. राजाराम हा शांत धीरगंभीर प्रकृतीचा होता. राजाराम महाराजांचे लक्ष्...

गुढीपाडवा

Image
लक्ष द्या हिंदूंनो,गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी.पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्या राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. ...

घडविला महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!! महाराष्ट्र घडविला तो महाराजांनी, शेताच्या बांध्यावर उभे राहून गोफणीने पाखरे हाकणाऱ्या शेतकऱ्याला उभे केले गोफण हातात घेऊन पण पाखरे हाकलायला नाही तर मराठी मातीवर अन्याय करणाऱ्या सैतानांना हाकलायला तेव्हा कुठे रयतेचे राज्य उभे राहिले. महाराज गेले संभाजी महाराजांनी हे स्वराज्याचे स्वप्न आपल्या अंगावर पेलले, त्यानंतर राजाराम, पेशवे शाहू असे अनेकांनी... राजेशाही संपली नंतर ब्रिटीश आले जवळ-जवळ १५० वर्षे सत्ता गाजवत तेही निघून गेले, भारत स्वतंत्र झाला, पण महाराष्ट्र मात्र धुमसत होता महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले, पण मराठ्यांनी असे होऊ दिले नाही संयुक्त महाराष्ट्रासाठी "१०६" बळी गेले चिंतामणराव देशमुख याच एकमेव माणसाने दिल्लीत स्वाभिमानी मराठी बाणा दाखविला बाकी सारे मराठे पळ्कुटे व लाचार निघाले संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरु असताना स.का.पाटील नावाचं व्यक्तीमत्व आडवे आले मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही असी वल्गना करणारे तेच ते पाटील म्हणे सूर्यचंद्र असे पर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, मग काय झाले मुं...