Posts

Showing posts with the label Shivaji Maharaj

फोंडा काबीज

Image
सन १६७५ कुडाळवरून महाराज फोंड्यावर चालून गेले. रुस्तुमेजमानचा पुत्र महमदखान हा फोंड्यावरून अटीतटीने झुंजू लागला. युद्धाच्या धुमश्चक्रीत दोन्ही बाजूंची बरीच प्राणहानी होऊ लागली. महाराजांनी चार वेळा फोंड्याला सुरुंग लावले. पण महमदखानने तेवढेच सुरुंग लावून त्यांना प्रत्युत्तर दिले. अखेर महाराजांनी तटापासून बारा फुटांवर सैनिकांसाठी संरक्षक भिंत बांधली व फोंडा घेण्याचा निर्धार करून दि. ८ एप्रिल रोजी २००० घोडदळ व ७००० पायदळानिशी फोंड्याला वेढा दिला. पावसात देखील वेढा सुरु ठेवण्याचे महाराजांनी ठरविले. राजेश्री स्वतः फोंड्यालाच तळ ठोकून बसले होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या करून त्यांना आदिलशाही हद्दीतील एटगेरी व गोवळकोंड्याच्या हद्दीतील दोन शहरांकडे लुट करण्यासाठी रवाना केले. मराठ्यांनी सर्व ठिकाणी प्रचंड लुट करून ती सर्व संपत्ती व काही कैद केलेले सावकार फोंड्याला महाराजांजवळ आणले. पोर्तुगीज गुप्तपणे महमदखानला मदत करत होते. त्यांची कुकली व वरुडे हि गावेही मराठ्यांनी लुटली. महमद खानाजवळ फक्त चार महिने पुरेल एवढीच रसद होती. त्याच्या कुमकेस रुस्तमेजमान १५०० घोडदळ व काही पायदळ घ...

शास्ताखानास शास्त

Image
शास्ताखानास स्वराज्यात घुसून दोन वर्षे होऊन गेली होती. डुकराप्रमाणे स्वराज्याची नासधूस त्याने चालविली होती. बंदोबस्त आवश्यकचं होता. राजेंचा लालमहाल त्याने कब्ज्यात घेतला होता. त्यामुळे शास्ताखानाचा बंदोबस्त म्हणजे काळाची गरज झाली होती. राजगडी विचारचक्रे सुरु झाली. त्यातच शास्ताखानावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा बेत राजेंनी सांगितला. त्याप्रमाणे एकाअद्भूत धाडसाची अत्यंत काळजीपूर्वक आणखी राजगडावर होऊ लागली. सर्वप्रथम दिवस ठरवला गेला . शोभान नाम संवत्सर शके १५८५ ची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी हल्ल्यासाठी निवडली गेली . हल्ला प्रथम अर्थातच मध्यरात्रीनंतर व्हायचा होता . त्या दिवशी रविवार असून इंग्रजी तारीख होती . ५ एप्रिल १६६३ ( रात्री १२ नंतर ६ एप्रिल ) मुसलमान कालगणनेप्रमाणे हा रमजानचा महिना असून त्या दिवशी सहावा चंद्र होता. या शिवाय या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हां दिवस बादशहाच्या राज्यरोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या दिवसांपैकी एक दिवस. चैत्रशुद्ध अष्टमी उजाडली. सर्व योजना आखली गेली होती. हुजुरपागेतून महाराजांनी १००० निवडक धारकरी माणूस...

स्वराज्य तोरण औरंग्याच्या हाती

Image
११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी राजगड जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला . औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही . राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे . रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी , बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले . पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून यावे लागले . २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ पोहचला . किल्ल्यास मोर्चे लावले . किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करु लागले . तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले . पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता . शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला . इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ‘ नाबिशहागड ’ असे ठेवले . औरंगजेब बादशहाने राजगड जिंकल्यानंतर त्याने ...

रयतेवर जीवापाड प्रेम करणारा राजा

Image
छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी कष्टकऱ्यांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या निर्दालनासाठी शस्त्रे हातात घेतली. छत्रपती श्री. शिवाजी राजेंनी अनेक लढाया जिंकल्या अनेक किल्ले जिंकले नवनवीन प्रदेश काबीज केले. हे आपण अनेक पुस्तकांतून वाचले आणि आपण स्वतः लिहिली सुद्धा. पण ह्याचं चक्रवर्ती राजाचे आपल्या प्रजेच्या प्रती असणारे प्रेम, तळमळ फार कमी लेखात वर्णन केलेली दिसते. सदैव रायेतेची काळजी वाहणारा हा राजा जगाच्या पाठीवर असा कोणी राजा असणे क्वचितच. राजेंच्या उपलब्ध असणाऱ्या पत्रांवरूनच त्यांची रयतेप्रतीची तळमळ दिसून येते. ऑक्टोबर १६६२ साली शाहिस्तेखान पुण्यात धुमाकूळ घालत असता. रयतेची कशा प्रकारे काळजी घ्यावी ह्या विषयीचे २३ ऑक्टोबर रोजी सर्जेराव जेधे यांना एक पत्र लिहीले होते. त्यातील मजकूर - " मोगल प्रस्तुत तुमच्या तापियात धावणीस येताती म्हणौन जासुदानी समाचार आणिला आहे. तरी तुम्हास रोखा अहडताच तुम्ही तमाम आपले तपियात गावाचा गाव ताकिदी करून माणसे, लेकरेवाळे समतर तमाम रयेती लोकास घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठविणे. ये कामात हैगै न करणे... गावचा गांव हिंडोनी रातीचा दिवस करून लोकाची माण...

पाटलांची मोगलाई उतरवली

Image
राजे १५ वर्षांचे झाले होते. फर्जंद महाराज साहेबांनी दिलेल्या विश्वासू, कर्तबगार, हरहुन्नरी लोकांच्या सानिध्यात आणि आईसाहेब जिजाऊ यांच्या कडक शिस्तीच्या आणि तितक्याच मायेच्या सानिध्यात शिवाबराजे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे वाढत होते. हळू हळू मुलुख बदलत होता, पण माणसांची मानसिकता अजून बदलत नव्हती मुलखातील मोघलाई संपता संपत नव्हती. काही लोक अजून जुन्याच वळणाचे होते. गावचे पुढारी पाटील म्हणजेच रयतेचे मायबाप असे नसून मालकी हक्कच गाजवत होते. शिवशाहीच्या सूर्याने आसमंतात उगविण्यापूर्वीची जणू लाली धरली होती परंतु . पाटलांच्या , वतनदारांच्या मनात खोलवर चिखलात रुतून पडलेल्या जनावराप्रमाणे घर करून बसलेली मोगलाई मात्र उतरायचे नावच घेत नव्हती . उगवत्या सूर्याकडे आशेने पहाताना रयत राजरोज हुंदक्या मागून हुंदके देत होती . कुंपणानेच शेत खाल्लं तर न्याय मागायचा कुणाला आणि आपलं दुःख सांगायचे कुणाला . आणि एके दिवशी असाच एक प्रकार मासाहेबांच्या कानी आला पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या रांझे या गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने बदअमल केला. रांझे,रांझे गावचा...

महाराज शहाजीराजे

Image
शहाजीराजेंना हद्दपारी झाली आणि ते बंगळूरास राहू लागले. स्वराज्यसंकल्पक शहाजीराजेंना आपल्या मायभूमीपासून दूर ठेवण्यात आले. इकडे महाराष्ट्रात त्यांच्या मनी असलेला स्वराज्याचा ध्यास त्यांचा पोर जिवाच्या बाजीने पुरा करीत होता. शिवाजी राजे ५ फेब्रुवारीला सुरत जिंकून राजगडी आले येताना त्यांना वाटेतच खबर मिळाली की महाराजसाहेब शहाजीराजे देवलोकी गेले. शके १५८५ च्या माघ शुद्ध पंचमीस (दि. २३ जानेवारी १६६४) शहाजीराजे घोड्यावर स्वार होऊन शिकारीसाठी निघाले. त्यांच्यासोबत नेहमीची मंडळी होतीच. जंगलात शिरताच राजांनी एक श्वापद हेरले. पण शिकार द्रुतगतीने निसटून जावू लागले. तेव्हा राजांनी तिचा घोड्यावरून पाठलाग केला. घोडा बेहनिहाय दौडत सुटला. दुर्दैवाने, थोडे पुढे जात नाही तोच, घोड्याच्या समोरचा एक पाय एका खळम्यात अडकला. घोडा अकस्मात अडखळला आणि राजे घोड्यावरून खाली फेकले गेले. त्यातच त्यांचा एक पाय रिकिबीत पक्का अडकून पडलेला होता. एरवी राजांची इमाने इतबारे राखण करणारा त्यांचा घोडा आज मात्र नेमका पक्का बेफाम झाला होता. त्याच्यासोबत शहाजीराजे सुमारे एक फर्लांगभर फरफटत ओढले गेले. राजांचे वय यावेळी सत्तरीचे...

संताजी नावाचे वादळ

Image
हा काळ होता १६९६ मोगल सरदार हिंमतखान बहादूर हा खरोखरच नावाप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी होता. त्याच्याजवळ सैन्य थोडे असल्याने आतापर्यंत त्याने संताजींवर आक्रमण केले नव्हते. पण आता खुद्द संताजीच त्याच्यावर चालून गेले. मोठ्या धैर्याने त्याने संताजींशी लढायचे ठरविले. आपले सैन्य घेऊन तो बसावापट्टणच्या गढीतून बाहेर पडला आणि त्याने संताजींवर चाल केली. संताजींनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या होत्या. एक तुकडी त्याने बसावापट्टणजवळच्या जंगली प्रदेशात लपवून ठेवली होती आणि दुसऱ्या तुकडीचे स्वतः संताजी नेतृत्व करून लढत होते. लढाई घनघोर सुरु झाली. खान शौर्याने लढत होता. उभय पक्षी अनेक सैनिक रणांगणी पडले. एवढ्यात संताजींनी माघार घेतली. रण टाकून संताजी पाठमोरे पळायला लागले. हिंमतखानला काही सुचेना त्याला त्याचाच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता हाच तो संताजी ज्याने बादशहाच्या शामियान्यावरील सोन्याचे कळस मारिले . हाच तो संताजी ज्याने दस्तूरखुद्द संभाजी राजेंना कैद करणाऱ्या त्या मुक्करबखानास जायबंदी केलं . हाच तो संताजी ज्याचा भीम पराक्रमाने महाराष्ट्रच काय तर अवघे ...

संभाजी राजेंचा राज्याभिषेक वास्तवता आणि रंगवणूक

Image
बुधवार २९ जुलै १६८० ला ललितापंचमीचे औचित्य साधून संभाजी महाराजांनी आपणास मंचकारोहण सविध करून घेतले. परंतू त्याकाळी असलेल्या अस्थिर वातावरणात झालेल्या राजाभिषेकात त्यांना व त्यांच्या सहकारी मंत्र्याधीकाऱ्यांना तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही. त्यामुळे संभाजीराजांवर ऐंदऱ्याभिषेक करवून हिंदवी राजसिहासानाची कायम प्रतिष्ठा करणे इष्ट वाटले आणि त्यांनी तो महाराजाभिषेक नंतर माघ शुद्ध ७ रविवार १६ जानेवारी १६८१ रोजी केला संभाजी राजे या मराठी रियासतीचे दुसरे धाकले धनी झाले. याच काळात स्वराज्यावर आदिलशहा, मोगल व सिद्दी यांचे जोराचे अपघात चालू झाले होते. अशा गडबडीत राजाभिषेक उरकून घेण्याची निकड त्यांनी केली नसती. परंतू शिवाजीराजांचे क्रियाकर्म दोनदा करावे लागल्याने व "प्रथमाभिषेक" ही विष्णुसुप्तीतच करून घ्यावा लागल्याने या मंचकारोहणाचा संस्कार तितकासा समाधानकारक वाटला नाही. उलट राजारामराजांसही तसाच संस्कार घेऊन गेल्याने शास्त्राचा व धर्माच्या अडचणी उपस्थित. होऊन राहिल्या होत्या. त्यामुळे ह्या सर्व अडचणी दूर करून राजसिंहासनाचा निर्वेध भोक्ता होण्यास जसा शिवाज...

देसूर मुक्कामी जुल्फिकारचा समाचार

Image
हा काळ होता १६९२चा मराठे पळवून पळवून मोगलांना मारत होते. संताजी धनाजी, असे सारेच वीर शर्थीने राज्य राखत होते. मराठ्यांचा तिसरा छत्रपती राजे राजाराम महाराज यावेळी जिंजीस होते आणि जिंजीस औरंगजेबाचा पुत्र कामबक्ष याचे वेढे पडले होते परंतू त्याचे आणि राजाराम महाराजांचे संबंध अगदी चांगले झाले होते. *(बापाच्या मृत्यू पश्चात गादीसाठी होणाऱ्या भांडणामध्ये मराठ्यांनी आपली बाजू धरावी यासाठी ) त्यामुळे तो वेढा देऊन बसलाय असे कधी वाटच नसे. जिंजी पासून वांदीवॉश हे ठिकाण सुमारे २५ मैल दूर आहे. तेथे मोगलांची अन्नधान्य सामग्री होती मराठे मोगलांनी तिथपर्यंत जाऊ देत नव्हते मोगलांचे पहिले २ प्रयत्न फसले पण तिसऱ्या प्रयत्नात मात्र त्यांना यश आले. जुल्फिकार खान. ते अन्नधान्य घेऊन पुन्हा आपल्या तळाकडे निघाला. मार्गात देसूर * (जिंजीपासून १३ मैल ईशान्येस) या ठिकाणी संताजीने आपल्या २० हजार सैन्यानिशी खानावर हल्ला चढविला मोठी तेज लढाई झाली भीमसेन सक्सेना हा मोगल इतिहासकार या लढाईच्या वेळी हजर होता. त्याने ही लढाई प्रत्यक्षात पाहिली असल्याने त्याच्या वर्णनास अधिक महत्व प्राप्त झाले आहे. भीमसेन लिहितो. ....जुल्फ...

|| त्र्यंबकजी इंगळे ||

Image
१ नोव्हेंबर १६९२ ला पन्हाळगडाला बादशहाचा नातू मुहम्मद मुईउद्दीन बेदारबख्त याचा वेढा पडला. हा पन्हाळा थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ८ वर्षे मोघली फौजेशी झुंजला आणि शेवटी २४ मे १७०१ रोजी दाणागोटा-दारुगोळा संपल्यामुळे नाईलाजाने मोघलांना शरण गेला. ... या किल्ल्याचे राखणकरते होते त्र्यंबकजी इंगळे. बादशहाने हा किल्ला घेण्यसाठी पिराजी घाटगे, सुहराबखान, लुत्फ़लुल्लाखान, मुख्तारखान, राजा किशनसिंह, मरहमतखान, तरबियतखान, मंसूरखान आणि असे अनेक नामवंत मोघली मनसबदार पाठविले होते. पण यातील कुणाचीच डाळ त्र्यंबकजी इंगळे आणि त्यांच्या वीरांनी शिजू दिली नाही. मोघली सरदारांनी साम-दाम-दंड-भेद असे सर्व प्रकार पन्हाल्यावर करून पाहिले पण त्यांना यात कशातच यश आले नाही. या लढ्यात बादशहाने प्रचंड प्रमाणात तोफेचा वापर केला. इतकेच नव्हे तर पन्हाल्याच्या हा वेढा चालू असतानाच बाहेरून धनाजी जाधव आणि त्यांचे सैन्य मोघलांवर हल्ले करीत होते. अशा अनेक चकमकी होतच होत्या. त्यातच किल्ल्यावरून सुद्धा, मराठे मोघली छावणीवर हल्ले करीत आणि त्यांची रसद मारून जमेल तेवढे मोघल कापून पुन्हा गडावर पसार होत. मराठे सुद्धा किल्ल्यावरून तोफांचा...

एक फसलेला डाव

Image
मोगली सैन्याशी निकराची पंजेफाड करत मावळी सेना लढतचं होती कारण परिस्थितीवर रडण्यापेक्षा परिस्थितीशी लढण्यात पुरुषार्थ मानणारी ही स्वराज्य सेना. काळ होता १६९९ चा राजाराम महाराज गादीवर येऊन बराच काळ लोटला होता. मराठे सगळीकडेच मोघलांना धूळ चारत होती. भाउबंदकी नडली दुहीचा शाप पुन्हा एकदा दिसून आला. एक लढवय्या आणि जिगरबाज सेनापतीस आपल्याच लोकांनीच दगा करून मारले होते. त्यांचे नांव संताजी घोरपडे. पण धनाजी नावाचा वाघ अजून मैदान गाजवतच होता. मोगलांच्या प्रतिष्ठित सरदारांना धनाजी जाधव यांनी मेटाकुटीस आणले होते. त्यानंतर त्यांनी खुद्द बादशाही छावणीवरच हल्ला करून एकच खळबळ उडवून दिली होती. शत्रू नुसतं त्यांच्या नावानं चळाचळा कापयचा. ३ नोव्हेंबर १६८९ साली रायगड पडल्यावर तह करून बंदिवासात जाणाऱ्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू हे अजून मोगलांच्या बंदिवासातच होते. राहून राहून ही गोष्ट मराठ्यांना सतावीत आणि त्यातूनच काही धाडसी बेत आखले जात. काही करून शाहूंना मोगली बंदिवासातून बाहेर काढायचेच असा त्यांचा बेत. परंतू नुकताच दस्तुरखुद्द बादशहाच्या छावणीत या पठ्ठ्यान...

शंभूराजांचे बुद्धिचातुर्य

Image
औरंगजेबाने दक्षिणेची सुभेदारी जसवंतसिंगाकडून काढून घेउन आपला मुलगा. मुअज्जम यास दिली. मुअज्जम ला शिवाजी राजांशी दुश्मनगिरी नको होती. आणि आपला मुलुख उभा राहीपर्यंत मुघलशाहीची हातघाई राजेंनाही नको होती. त्यांनी दख्खनसुभा मुअज्जमशी तहाची बोलणी लावली. ते देखील आपला छावा शंभूराजे यांना मध्यस्थानी ठेवून त्याबद्दलची फर्माने, खलिते केव्हाच दिल्लीला रवाना झाली होती. राजे मुलखाची बंदिस्ती करीत होते. औरंगजेबाने राजांचा सुलुख मान्य केला. दख्खन सुभा मुअज्जम उर्फ शहाआलाम मार्फत राजांना औरंगजेबाचा ह्स्बुल हुक्म आला तो शंभूराजांच्यासाठी. आता शंभूराजे शाही मनसबदार झाले. औरंगजेबाने आपला पुन्हा एकदा धूर्त डाव टाकत जहागिरीचा मोकासा बहाल केला तो वऱ्हाड खानदेशाचा त्यामुळे नाईलाजाने शंभूराजांना औरंगाबादला रहावे लागणार होते. महत्वकांक्षी पित्याच्या एका राजकारणाखातर शंभूराजे औरंगाबादेस गेले. सोबत प्रतापराव, निराजीपंत, रावजी हे सरदार देखील होते. शंभूराजे व मुअज्जम यांच्या भेटी झाल्या. परत परत भेटी घडत राहिल्या. दोघांची मैत्री वाढली. आपल्या वतनाचा राबता लावून शंभूराजे राजगडी परतले. त्यांच्या वतनाचे काम प्रतापराव...

रत्नपारखी शिवराय २५ नोव्हेंबर १६६४

Image
लखम सावंतांचा बंदोबस्त करुन महाराजांनी अकस्मात खुदावंद पुरावर धाड घातली. मार्गेसीर्षे मासी खुदावंदपूर राजेश्रींनी लुटिले. तिथली मिळकत घेऊन राजे मालवणला आले. असेच महाराज मालवण बंदरावर उभे होते. समोर सिंधुसागर खळाळत होता. तेवढ्यात महाराजांचे लक्ष नैऋत्येकडे सुमारे दीड मैलावर डोके वर काढलेल्या बेटाकडे गेले. जवळच उभ्या असलेल्या कृष्णा सावंत देसाई व भानजी प्रभू देसाई यांचंकडे चौकशी करता ते कुरुटे बेट असल्याचे समजले. मनाच्या कोपऱ्यावर काही बेत शिजत होते कुठे तरी समुद्राच्या लाटा भिंतींवर खळाळुन आदळताना दिसत होत्या. राजेश्री समुद्राच्या खोलपणात जाऊन विचार करीत असल्यासारखे भासत होते. तिन्हीसांजेच्या तिरप्या कोवळ्या उन्हात राजेंची मुद्रा अधिकच उजळून निघाली होती. मावळत्या सूर्यनारायणास नमन करून राजे आपल्या शामियान्याकडे परतले. दुसऱ्या दिवशी कुरटे बेट पाहण्यासाठी राजे जातीने बेटावर आले. महाराजांची नजर स्थापत्यविशारदाची दुर्गबांधणीशास्त्र त्यांस पूर्णपणे अवगत राजांच्या शोधक नजरेने सागरी राजधानीचा ठाव घेतला. शुद्ध खडक, उत्तम स्थल, विस्तीर्ण, आटोपासारिखे, चहूबाजूस समुद्रमार्ग, कठीण सर्पाकार तरांडी म...

वणी- दिंडोरीची लढाई

Image
दि . ५ ऑक्टोबरच्या दुपारी महाराजांनी सुरत सोडली. जाताना त्यांनी मुख्य मोगली अधिकारी व प्रमुख व्यापाऱ्यांकडे पत्र पाठवून दरसाल १२ लाख रुपये होन न द्याल तर पुन्हा पुढील वर्षी येऊन शहराचा राहिलेला भाग जाळून टाकीन असा इशारा दिला. सुरतेहून महाराज पेठ-बालगण मार्गे मुल्हेरकडे निघाले. यावेळी मुअज्जम - दिलेरखान वाद मिटला होता. मुअज्जम औरंगाबादला येऊन पोहोचला होता. त्याच्या कानावर सुरत लुटीची बातमी गेली आणी तो धास्तावालाच कारण हि सुरत लुटीची दुसरी वेळ होती. तेव्हा त्याने दाऊदखानला महाराजांचा मोड करण्याची कामगिरी सोपविली त्याच्या सोबत राव भाऊसिंग हाडा हाही आला. औरंगाबादेहून दाऊदखान लगेच महाराजांना रोखण्यासाठी पुढे निघाला. पण महराजांचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक आणि त्यांच्या असंख्य डोळे असलेले त्यांचे हेर यांनी मोगल पाठीवर आहे हि बातमी मुल्हेरलाच राजेंना आणून दिली. जशा राजेंना पक्क्या बातम्या येत होत्या तशाच त्या दाऊदखानला हि जात होत्याच. मध्यरात्री सुमारे बारा वाजता दाऊदखानला खबर मिळाली की 'कंचन-मंचनचा घाट पार करून महाराज त्वरेने गुल्शनाबाद (नाशिक) च्या वाटेला लागले आहेत. त्यांचे काही सैन्य घा...