समुद्रावरचा शिवाजी कान्होजी आंग्रे.
आपल्या कर्तुत्वाच्या बळावर आंग्रे इतके मोठे आणि इतके प्रभावशाली झाले की दर्यावर बेपान्हा हुकुमत गाजवत. छत्रपती शिवरायांनी दूरदृष्टीने उभारलेल्या आरमाराचा सुवर्णकाळ म्हणजे आंग्रे घराण्याचा काळ परंतु पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेचं महाराष्ट्राच्या, देशाच्या एका कडेचे संरक्षण करता करता त्यांनी घडविलेला इतिहास देखील कडेलाच राहिला. अरबी समुद्रात त्यांनी उभारलेले, राखलेले, आणि उध्वस्त केलेले किल्ले अजाही याची साक्ष देतात. आपल्या कर्तबगारीने, जहाजांशी जवळीक जोडणाऱ्या सागरावर सत्ता सांगणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी साऱ्यांना धाकात ठेवण्याचे कार्य आंग्रे घराण्याने मोठ्या धाडसाने पार पाडीत भारताच्या आरमारी इतिहासाचे पानच लिहिले असे म्हणायला हरकत नाही. सन १७१०-१२ सुमारास आंग्रे समुद्रावर अशाप्रकारे प्रबळ झाले होते की हिंदुस्थानातीलचं नव्हे तर युरोपियन सत्तांना देखील भारी होऊन राहिले आहेत असे गोव्याचा व्हाईसरॉय पोर्तुगालला आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रात म्हणतो - 'महाराज, आन्र्यांनी सांप्रत उत्तर समुद्र किनाऱ्यावर लुटालूटीची मोहीम सुरु केली आहे. त्यांना ते शक्य आहे, कारण काही बं...