इतिहासकर्ते
या देशात फार कमी ठिकाणं अशी आहेत जिथे मराठयांचं रक्त सांडले नाही मग ते १६ व्या शतकातील मराठे असोत वा इंग्रजांच्या जुलमी राजवटीतील क्रांतिकारक असोत वा आजच्या घडीला देखील देशाच्या रक्षणासाठी खडे ठाकलेले आमचे जवान असोत एकप्रकारे या मुलखाची, देशाची रक्षण करण्याची जवाबदारी हि मराठ्यांवरचं येऊन पडलेली. अखंड लढत-झुंजत राहणाऱ्या मराठ्यांच्या तलवारीचे खणखणीत आवाज पार दिल्लीश्वराच्या कानी आदळले आणि ज्या तख्ताविरुद्ध मराठे लढत होते त्याचं तख्ताच्या रक्षणासाठीची जवाबदारी यांच्या खांद्यावर येऊन पडली. हा काळ होता १७६४ सर्वत्र धुमाकूळ, सत्ता गाजवत मराठे सारा हिंदोस्ता हाकत होते. गुजरातचा विचार करता, गुजरातच्या राजकीय सत्ता या सतत बदली होत राहिल्या, तसेच एकाच वेळेस मराठे, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज इत्यादींच्या सत्ता होत्या. मराठ्यांमध्येही पेशवे, गायकवाड, शिंदे इत्यादींची सत्ता गुजरातवर होते. तसेच काही भाग हा स्वतंत्र संस्थानिकांकडे होता. यापैकी काही संस्थाने मांडलिक तर काही स्वतंत्र होती, त्यामुळे राजकीय परिस्थिती थोडी अस्थिर व कायम लढाई राहिली, अशावेळी कायमस्वरुपी सैन्य, तोफखाना इत्यादींची गरज गुजरात...