माहुली स्वराज्यात दाखल १६ जून १६७०
सन १६६५ साली झालेल्या पुरंदरच्या तहात गमवाव्या लागणाऱ्या किल्ल्यांमध्ये माहुली हा देखील सामील होता. शहाजी राजांपासून या किल्ल्यासाठी मराठे आणि मोगलांचा धरपकडीचा खेळ चालू होता. १६६५ मध्ये मोगलांचा मनोहरदास गौडा हा धोरणी कर्तबदार सरदार माहुलीवर कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरेच बांधकाम करून घेतले.
राजाराम महाराजांच्या जन्मानंतर (फेब. १६७० उत्तरार्ध) महाराज राजगड उतरून माहुलीस आले. माहुली गडाची तुलना एखाद्या बळकट किल्ल्याशी करणे अगदी योग्यच होते. एकाच डोंगरावर पलासगड, भांडारगड आणि माहुली असे तीन किल्ले वसले होते. ह्याच त्रिकुटाचा घास राजेंना घ्यायचा होता. तहामध्ये गमावलेले किल्ले घ्यायचे होते. तहामुळे गमवलेला स्वराज्याचा भाग परत जोडायचा होता. जेमतेम १५०० मावळ्यांनिशी महाराज माहुलीस आले. अचनाक छापा घालून मोगलांची मोगलाई उतरवायचा बेत राजेंनी आखला दुर्दैवानी किल्ल्यावरील किल्लेदार मनोहरदास गौडा हां जगसुद असल्याने महाराजांना मात खावी लागली जवळजवळ १००० भर मावळे ठार झाले. राजेंना माघार घेणे भाग पडले. राजांचा पराभव झाला.
माहुली वरील लक्ष काही काळ बाजूला काढून राजेंनी लोहगड विसापूर दोर लावून काबीज केले.
जून मध्ये पुन्हा माहुली जिंकण्याची अनुकूलता पुन्हा प्रस्थापित झाली. औरंगजेबाने मनोहरदासाच्या मदतीला पाठवलेल्या दाऊदखान आणि हसनअलीखान यांना पुन्हा औरंगाबादेस बोलवून घेतले होते. आता गौडा एकाकी पडला होता. पुन्हा शिवाजीने गडाला घेरा घातला तर आपणास मदत वा रसद येणे अशक्य ह्यासर्वच गोष्टींचा विंचर करून गौडाने सरळ किल्लेदारीचा राजीनामाच देऊन टाकला. त्याच्या जागी अलावर्दीबेग हा नवा किल्लेदार नियुक्त केला. तो कुठे रुजू होतोय ना होतोय तोच गनिमा कावा ह्या अतिसंहारक अस्त्राचा वापर करून जवळपास ५ हजार सैन्यानिशी महराजांनी महुलीवर पुन्हा हल्ला चढविला.झालेल्या झुंजीत. अलीवर्दीबेग ठार झाला. पण माहुलीगड अखेर जिंकलाच
माहुली जिंकला ती तारीख होती १६ जुन १६७०
mastach bhava jay shivray
ReplyDeletedhanywad........
Delete