Posts

Showing posts with the label शिवाजी महाराज

माहुली स्वराज्यात दाखल १६ जून १६७०

Image
सन १६६५ साली झालेल्या पुरंदरच्या तहात गमवाव्या लागणाऱ्या किल्ल्यांमध्ये माहुली हा देखील सामील होता. शहाजी राजांपासून या किल्ल्यासाठी मराठे आणि मोगलांचा धरपकडीचा खेळ चालू होता. १६६५ मध्ये मोगलांचा मनोहरदास गौडा हा धोरणी कर्तबदार सरदार माहुलीवर कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरेच बांधकाम करून घेतले. राजाराम महाराजांच्या जन्मानंतर (फेब. १६७० उत्तरार्ध) महाराज राजगड उतरून माहुलीस आले. माहुली गडाची तुलना एखाद्या बळकट किल्ल्याशी करणे अगदी योग्यच होते. एकाच डोंगरावर पलासगड, भांडारगड आणि माहुली असे तीन किल्ले वसले होते. ह्याच त्रिकुटाचा घास राजेंना घ्यायचा होता. तहामध्ये गमावलेले किल्ले घ्यायचे होते. तहामुळे गमवलेला स्वराज्याचा भाग परत जोडायचा होता. जेमतेम १५०० मावळ्यांनिशी महाराज माहुलीस आले. अचनाक छापा घालून मोगलांची मोगलाई उतरवायचा बेत राजेंनी आखला दुर्दैवानी किल्ल्यावरील किल्लेदार मनोहरदास गौडा हां जगसुद असल्याने महाराजांना मात खावी लागली जवळजवळ १००० भर मावळे ठार झाले. राजेंना माघार घेणे भाग पडले. राजांचा पराभव झाला. माहुली वरील लक्ष काही काळ बाजूला काढून राजेंनी लोहगड विसापूर दोर लाव...

शिवराज्याभिषेक

Image
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा अधीर मनाच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला देव देश आणि धर्म रक्षणासाठी खर्ची पडलेले असंख्य ज्ञात अज्ञात मावळे. कित्येक माता भगिनींचे रिते कपाळ या सगळ्यांच्या जखमा आज रायगडावर बुजणार होत्या रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून पिकवलेल्या शेतीचे आज सोने होणार होते आज शिवाजी राजे छत्रपती होणार होते, रायगडावर धामधुमिचे काळ चालू होता. मावळे, नोकरचाकर, राणीवसा, सगळ्यांची धावपळ चालू होती, लोकं आनंदान दमत होते. रायगडावरती राज्याभिषेकाची पूर्व तयारी पूर्ण झाली. धार्मिक विधीला प्रारंभ झाले.ऐशानयाग विधी,मुंज,ग्रह-यज्ञ,प्रतीमादान, सोयराबाई साहेबांसोबत पुनश्च लग्न, सुवर्ण तुला, पुण्यहवाचन असें सर्व धार्मिक विधी यथासांग पार पडले.रायगड दुमदुमत होता हा आनंद होता सार्वभौमत्वाचा हां आनंद होता स्वातंत्र्याचा. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट झाली, राजवाड्यामध्ये तीन पाट ठेवण्यात आले मधोमध महाराज बसले होते डाव्या बाजूला राणी सोयराबाई बसल्या होत्या आणि उजवीकडे संभाजी महाराज बसले होत...

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६

Image
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये प्रभावळीचा सुभेदार रामजी अनंत यांस लिहिलेले पत्र. शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर तर होऊ नयेत, तर त्यास योग्य त्या सवलती देण्यात यावे म्हणून राजांचे हे पत्र यात राजांची जागरूकता दिसून येते हे पत्र होते ५ सप्टेंबर १६७६ येक भाजीच्या देठासही मन नको अशी होती शिवशाही

आऊसाहेब..........

Image
रायगडावरचा सोहळा नुकताच कुठे पार पडला होता. राज्याभिषेकासाठी सजलेला रायगड देखील काही अंशी तसाच होता. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही साधी जाली नाही. या छ्त्रपतीला ज्यांनी घडविले जिच्या कुशीतून स्वराज्याचे देखणे स्वप्न निर्माण झाले त्या राजमाता जिजाऊंनी स्वताच्या पुत्राचा राज्याभिषेक सोहळा डोळे भरून पहिला आणि बुधवार दि. १७ जून १६७४ ज्येष्ठ वद्य नवमी रोजी जिजाऊसाहेबांचा पाचाड येथे रात्री दोन प्रहरी मृत्यू झाला. सर्वांवर आभाळच फाटले. धाय मोकलून रडणारे महाराज साहेब. टाहो फोडलेला सर्व राणीवसा. जणू आभाळच अंगावर कोसळ्याने अवाक झालेले युवराज संभाजी. आणि काहीतरी भयंकर घडल्याची जाणीव होऊन किलकिल्या नजरेने भिरभिर डोळ्याने इकडे तिकडे पाहणारे राजाराम महाराज अशी सर्वांचीच अवस्था बिकट झाली होती. दास दासी प्रधान कारकून मावळे साऱ्यांच्याच नजरांना जणू गंगेचा ओघळ लागला होता पुण्यातील प्रवेशापासून ते रायगडावर आरूढ होई पर्यंत सोबत असेल्या कोणा एका स्वामीनिष्ठाच्या मनातील खालील आठवणी व भावना महाराज आणि जिजाऊ यांच्या कडे आसुसलेल्या नजरेने पहात त्यास सर्व कांही आ...

महाराजांचे महानिर्वाण

Image
राजीयांचे देहवसान झाले ते दिवशी पृथ्विकंप जाहला. गगनी धूमकेतू उदेला. उल्कापात आकाशाहून जाला. रात्री जोड-इंद्रधनुष्ये निघाली. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्री शंभूमहादेवी तळ्यांचे उदक रक्तांबर जाले. पाण्यातील मत्स्य बाहेर पडून अमासवणी उदक जाहले.माझ्या राजाच्या जाण्याने हा तर केवळ सृष्टवर झालेला परिणाम काय अवस्था झाली असेल गडकऱ्यांची.आप्तइष्ठांची रायगड पूर्ण काळवंडला होता, गगनाला भिडलेले टकमक टोक आज ठेंगणे दिसू लागले होते.तेजस्वी सूर्याचा प्रकाश देखील आज मंद झाला होता. वरंधा घाटाच्या पलीकडून उंच आकाशात मान असलेला राजगड जणू तिथूनच राजेंचे अंतिम दर्शन घेत होता तो राजगड ज्याने पाहिले महाराजांचे तरुणपण, ज्याने पाहिले महाराजांचे जाणतेपण, करतेपण ते शौर्य तो पराक्रम ते धाडस ते अतिउच्च साहस वयाची २५ वर्षे आपल्या डोक्यावर महाराजांचा असणारा हात. राजाराम महारजांचा जन्म, सईबाईंचे निधन, तो त्या कित्येक वादळे धैर्याने सहन करणारा त्या राजगडाचा आज धीर खचला त्याच्या तिन्ही माच्या राजंना शेवटचा मुजरा करत होत्या,बालेकील्ल्याने टाहो फोडला होता २५ वर्ष माझ्या डोक्यावरचा मुकुट असणारा माझा राजा आज मला स...

शिरवळच्या सुभेदाराचे धमकीवजा पत्र ३० मार्च १६४५

Image
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले. हे फर्मान छ ११ सफर सु || खमस अर्बैन अलफ म्हणजे ३० मार्च १६४५ यां तारखेचे आहे