ऑपरेशन ट्रायडंटल
रोजच्या पोटापाण्याची भ्रांत असणाऱ्यांना कसले आलय कुठल्या गोष्टीचं सोयरं सुतक, रोजचा गाडा ओढण्यातच नशिबाला घामाच्या धारा लागतात. पण आजचा प्रसंग काहीसा वेगळा होता. साऱ्या दिल्लीमध्ये सायरन मोठमोठ्यान खणखणत होते. रस्त्यावरून पोलीस व्हॅन सतत सूचना देत होत्या. घरातून बाहेर उजेड येणार नाही एवढ्या खबरदारीनं राहण्याचे ते सांगत होते. ३ डिसेंबर १९७१ ची ती रात्र. सबंध उत्तर भारतात आगपाखड करत पाकिस्तानी विमानं घोंगावत होती. अंबाला, श्रीनगर, अवंतपूर, पठाणकोट, उत्तरलाईन, जोधपुर पार आग्र्यापर्यंत ही विमानं आत शिरली. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आपले सर्व कार्यक्रम स्थगित सर्वत्र होणाऱ्या हल्ल्याची माहिती घेतली. देश कि धडकन असणाऱ्या नव्या दिल्लीत खलबतांना उत आला. इंदिरा बाईंनी तिन्ही दलांच्या सेनापतींना बोलावून घेतले. बराच खल झाला. शेवटी रात्री उशिरा बाईंनी फोन उचलला पलीकडल्या "येस मॅमला" अलीकडून "संसार" एवढेच उत्तर दिले गेले. आता सुरवात झाली होती ती एक, भविष्यासाठी दैदिप्यमान ठरणाऱ्या ऐतिहासिक घटनेला. # ऑपरेशन_ट्रायडंटला सुरुवात झाली. भारतीय नौकांचा काफिला कराचीच्य