इतिहासकर्ते

हा काळ होता १७६४ सर्वत्र धुमाकूळ, सत्ता गाजवत मराठे सारा हिंदोस्ता हाकत होते. गुजरातचा विचार करता, गुजरातच्या राजकीय सत्ता या सतत बदली होत राहिल्या, तसेच एकाच वेळेस मराठे, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज इत्यादींच्या सत्ता होत्या. मराठ्यांमध्येही पेशवे, गायकवाड, शिंदे इत्यादींची सत्ता गुजरातवर होते. तसेच काही भाग हा स्वतंत्र संस्थानिकांकडे होता. यापैकी काही संस्थाने मांडलिक तर काही स्वतंत्र होती, त्यामुळे राजकीय परिस्थिती थोडी अस्थिर व कायम लढाई राहिली, अशावेळी कायमस्वरुपी सैन्य, तोफखाना इत्यादींची गरज गुजरातमध्ये होती.
त्यामुळे गुजरातमधील मोठ्या शहरांत व जी शहरे लष्करीदृष्ट्या महत्वाची आहेत. तिथे तोफखाना होता व त्याचे स्वतंत्र प्रशासन होते. सुभेदार किंवा कमविसदार हे या तोफखान्यावर लक्ष ठेवून असत. अहमदाबाद, सुरत, बिरमगाव इत्यादी ठिकाणी तोफखाना असल्याचे उल्लेख मिळतात. त्या त्या ठिकाणच्या ताळेबंदात तोफखान्याकडील कर्मचाऱ्यांचा पगार, तोफांची मरम्मतदारुगोळा शिसे वगैरेचा खर्च नोंदविलेला दिसतो.
तोफ ओतण्याचे कामही गुजरातमध्ये केले जात होते. दमाजी गायकवाड यांनी गोविंदराव गायकवाड यांना ४ सप्टेंबर १७६४ रोजी लिहिलेल्या पत्रात इंग्रजी लोखंड खरेदीची आज्ञा केली होतो ती अशी
"तोफखाण्याबद्दल इंगरेजी लोखंडी मण - १ - पाच मण पक्के चांगला माल पाहून सरकार निरखे किफायतशीर खरेदी करून जलदीने हुजूर पाठविणे"
I want ur phone number message me on
ReplyDelete9011489191