इतिहासकर्ते

या देशात फार कमी ठिकाणं अशी आहेत जिथे मराठयांचं रक्त सांडले नाही मग ते १६ व्या शतकातील मराठे असोत वा इंग्रजांच्या जुलमी राजवटीतील क्रांतिकारक असोत वा आजच्या घडीला देखील देशाच्या रक्षणासाठी खडे ठाकलेले आमचे जवान असोत एकप्रकारे या मुलखाची, देशाची रक्षण करण्याची जवाबदारी हि मराठ्यांवरचं येऊन पडलेली. अखंड लढत-झुंजत राहणाऱ्या मराठ्यांच्या तलवारीचे खणखणीत आवाज पार दिल्लीश्वराच्या कानी आदळले आणि ज्या तख्ताविरुद्ध मराठे लढत होते त्याचं तख्ताच्या रक्षणासाठीची जवाबदारी यांच्या खांद्यावर येऊन पडली.

हा काळ होता १७६४ सर्वत्र धुमाकूळ, सत्ता गाजवत मराठे सारा हिंदोस्ता हाकत होते. गुजरातचा विचार करता, गुजरातच्या राजकीय सत्ता या सतत बदली होत राहिल्या, तसेच एकाच वेळेस मराठे, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज इत्यादींच्या सत्ता होत्या. मराठ्यांमध्येही पेशवे, गायकवाड, शिंदे इत्यादींची सत्ता गुजरातवर होते. तसेच काही भाग हा स्वतंत्र संस्थानिकांकडे होता. यापैकी काही संस्थाने मांडलिक तर काही स्वतंत्र होती, त्यामुळे राजकीय परिस्थिती थोडी अस्थिर व कायम लढाई राहिली, अशावेळी कायमस्वरुपी सैन्य, तोफखाना इत्यादींची गरज गुजरातमध्ये होती.

त्यामुळे गुजरातमधील मोठ्या शहरांत व जी शहरे लष्करीदृष्ट्या महत्वाची आहेत. तिथे तोफखाना होता व त्याचे स्वतंत्र प्रशासन होते. सुभेदार किंवा कमविसदार हे या तोफखान्यावर लक्ष ठेवून असत. अहमदाबाद, सुरत, बिरमगाव इत्यादी ठिकाणी तोफखाना असल्याचे उल्लेख मिळतात. त्या त्या ठिकाणच्या ताळेबंदात तोफखान्याकडील कर्मचाऱ्यांचा पगार, तोफांची मरम्मतदारुगोळा शिसे वगैरेचा खर्च नोंदविलेला दिसतो.

तोफ ओतण्याचे कामही गुजरातमध्ये केले जात होते. दमाजी गायकवाड यांनी गोविंदराव गायकवाड यांना ४ सप्टेंबर १७६४ रोजी लिहिलेल्या पत्रात इंग्रजी लोखंड खरेदीची आज्ञा केली होतो ती अशी

"तोफखाण्याबद्दल इंगरेजी लोखंडी मण - १ - पाच मण पक्के चांगला माल पाहून सरकार निरखे किफायतशीर खरेदी करून जलदीने हुजूर पाठविणे"


उंबरखिंड

शास्ताखान पुण्यात ठाण मांडून बसला याच काळात आजूबाजूच्या परिसरात हातपाय पसरण्याचा त्याचा मनसुबा तडीस नेण्याच्या उद्देशाने त्याने सुरवात केली. विश्वासू सरदारांना एकांतात भेटून चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे हा भाग हस्तगत करण्याची कामगिरी सोपविली गेली. कारतालाबखानसोबत कछ्प, चव्हाण, अमरसिंह, सर्जेराव गाढे, कोकाटे, जाधवराव यांची या मोहीमी साठी नियुक्ती केली गेली. विशेष म्हणजे यात या सरदारांशिवाय माहुरची रायबाघनदेखील या मोहिमेत सामील होणार होती.

बरेच मोठे सैन्य घेऊन कारतालाबखान लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गाने पुढे सरकू लागला. वाट मोठी बिकट निरुंद गहन अरण्य ओलांडून पुन्हा सह्याद्रीची बिकट चढण चढून उतरायची व मग उंबरखिंडीतून खाली उतरायचे होते. इकडे कारतलबखानाच्या सर्व बातम्या महाराजांपातूर पोचतच हुत्या. राजांनी उंबरखिंडीच्या झाडीत सैन्य दाबून ठेवले.

मोठी चढण चढून उतरून खानाचे सैन्य खिंडीत उतरले आणि रणभेरी निनादू लागल्या शत्रूने घेरल्याचे एव्हाना खानास समजले होते. बाणांचा बंदुकांचा मारा परस्परांवर होऊ लागला. प्रारंभी अमरसिंहाने व मित्रसेनाने मराठ्यांना चांगलेच तोंड दिले. रानोरान पळत सुटलेल्या आपल्या सैन्याला मित्रसेन घाबरू नका, स्थिर राहा असा धीर देत होता. पण एक गोष्ट होती कि कोंडीत सापडून सुधा कारतालाब खान युद्धावेश सोडत नव्हताचं, पण मराठ्यांच्या माऱ्यापुढे आता मात्र मोघलांची मात्र चालेन तेव्हा रायबाघन खानकडे आली. आणि तिने कारतालाबखानाला युद्धाची भाषा सोडून शरणागतीचे बोलणे करण्याचा सल्ला दिला.

उशिरा का होईना पण कारतालाब खानास शहाणपणा सुचला आणि ३ फेब्रुवारी १६६१ रोजी युद्धविराम झाला अर्थात त्यासाठी मोठी खंडणी खानास मोजावी लागलीचं  


फोटो - नेट साभार

वांदीवॉशला मुघलांची दाणादान

जिंजीपासून वांदीवॉश हे ठिकाण २५ मैल येथे मोगलांची अन्नधान्य सामग्री. ती आणण्याचा झुल्फिकारखानाचा प्रयत्न चालू होता. दोन अयशस्वी प्रयत्नानंतर तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झला. मोगली लष्करात एवढी बेशिस्त माजली होती कि उपाशी सैनिकांनी रात्री तांड्यावर हल्ला करून ते लुटले. या हल्ल्यातून वाचलेले सैन्य घेऊन तो वांदीवॉशहून तळाकडे निघाला मार्गात देसुर या ठिकाणी संताजी घोरपडे यांनी आपल्या २० हजार सैन्यासह त्याचावर हल्ला चढविला तो दिवस ५ जानेवारी १६९३

इतिहासकार भीमसेन सक्सेना यावेळी हजर होता त्याने लिहलेला प्रसंगातून हे कळते कि
जुल्फिकार खान परत येण्यास निघाला. मराठ्यांनी चोहीकडून हल्ले चढविले, मराठे देसुर मुक्कामी गोळा झाले होते. मोगली सैन्याची अशीकाही दाणादाण उडाली होती कि तिथे असणार्या भाताच्या शेतीत मोगली उंट, बैलगाड्या, हत्ती रुतून बसले चिखलातून मार्ग काढत उरल्यासुरल्या सैन्याने जीव वाचवून पळ काढला