शिवराज्याभिषेक
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा
अधीर मनाच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला
देव देश आणि धर्म रक्षणासाठी खर्ची पडलेले असंख्य ज्ञात अज्ञात मावळे.
कित्येक माता भगिनींचे रिते कपाळ या सगळ्यांच्या जखमा आज रायगडावर बुजणार होत्या रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून पिकवलेल्या शेतीचे आज सोने होणार होते आज शिवाजी राजे छत्रपती होणार होते,
रायगडावर धामधुमिचे काळ चालू होता. मावळे, नोकरचाकर, राणीवसा, सगळ्यांची धावपळ चालू होती, लोकं आनंदान दमत होते. रायगडावरती राज्याभिषेकाची पूर्व तयारी पूर्ण झाली. धार्मिक विधीला प्रारंभ
झाले.ऐशानयाग विधी,मुंज,ग्रह-यज्ञ,प्रतीमादान, सोयराबाई साहेबांसोबत पुनश्च लग्न, सुवर्ण तुला, पुण्यहवाचन असें सर्व धार्मिक विधी यथासांग पार पडले.रायगड दुमदुमत होता हा आनंद होता सार्वभौमत्वाचा हां आनंद होता
स्वातंत्र्याचा.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट झाली, राजवाड्यामध्ये तीन पाट ठेवण्यात आले मधोमध महाराज बसले होते डाव्या बाजूला राणी सोयराबाई बसल्या होत्या आणि उजवीकडे संभाजी महाराज बसले होते त्यांच्या बाजूने अष्टप्रधान उभे
होते. प्रत्येक प्रधानांच्या हातात एक एक कलश होता.राजांच्या अंगावरून सप्तगंगा घळाळत होत्या गागाभट्ट मंत्र म्हणत होते.
गंगेचयमुनेचेव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी
पण यातील एकही नदी स्वराज्यात नव्हती गोदावरी तेवढी स्वराज्यात उगम पावत होती परंतू नाशिक पुढे ती देखील मोगली अमलात जात होती. राज्याभिषेक पार पडला. आता वेळ आली ती राज्यरोहणाची
अशक्यप्राय वाटणाऱ्या स्वातंत्र्यसूर्याचा उदय घोर तीमिराला चिरून आज रायगडी संपन्न होत होता.
महाराज सिहासनाजवळ आले. प्रथम भूमीवर उजवा गुडघा टेकवून महराजांनी सिहासानाला वंदन केले आणि राजे पूर्वाभिमुक उभे झाले. अवघ्या राजसभेची उत्सुकता शिगेला पोहोचली होती दुरवर राजगड आकाशात मान घुसडून
आपल्या राजाचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा बघत होता.
आणि तो अमृतक्षण आला. वेदमंत्रोचार थांबले.मुहूर्ताची घटिका बुडालीव त्याचक्षणी, नृपशालिवाहन शके १५९६, आनंद नाम संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध १२ शुक्रवार, घटी २१ पळे ३४ वि.३८|४० सी ४२ तीण घटिका रात्र उरली
तेव्हा राजश्री सिवाजी राजे भोसले सिव्हासनी बैसले.निमिषार्धात संवत्सर पुरोहितांनी महाराजांवर छत्र धरले आणि सर्व लोकांना तो क्षत्रिय राजा अभिषिक्त झाल्याचे घोषित केले.
क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीराजा शिवछत्रपती या महाराजांच्या नव्या बिरुदावलीचा सर्वांनी जयघोष केला पुष्पवर्षाव झाला सह्याद्रीच्या तोफांनी प्रत्येक खेड्यामध्ये पलीकडच्या विजापुरकरांना, कुत्बुशहाला, मोगलांना कळविले
की माझा राजा छत्रपती झाला. सर्व वातावरण खुशीचे होते. उत्तरेतून मात्र रडण्याचा आणि अल्लाला दोष देण्याचा आवाज येत होता, तो आवाज होता औरंगजेबाचा लहानपणा सरल्यावर आयुष्यात औरंगजेब पहिल्यांदा रडला
होता या अल्लाह तू भी उस सिवा का खिदमतगार हो गया असे दोष देण्याचा त्याचा कार्यक्रम दिल्लीत पार पडत होता त्याच्या दुःखाचे वर्णनासाठी एक चारोळी सार्थ ती म्हणजे
याच दिवशी याच समयी रायगडावर आणिखी एक इतिहास घडला होता, इथून मागे मराठ्यांची मुले सरदार पुत्र होती पण माझा संभाजी राजा पहिला युवराज ठरला होता
जय शिवराय

सरीतापतीचे जल मोजवेना
मध्यानीचा भास्कर सहवेना
तैसा हा राजा शिवाजी
कोणासही जिंकवेना
मध्यानीचा भास्कर सहवेना
तैसा हा राजा शिवाजी
कोणासही जिंकवेना
याच दिवशी याच समयी रायगडावर आणिखी एक इतिहास घडला होता, इथून मागे मराठ्यांची मुले सरदार पुत्र होती पण माझा संभाजी राजा पहिला युवराज ठरला होता
जय शिवराय
1ch no.................jay bhavani
ReplyDeletejay shivaji
कार्य असे शिवबाचे
ReplyDeleteनाही कुणास जमायाचे ,...
म्हणुन नाव घेता त्यांचे
मस्तक आमचे नमायाचे,....
छान लेख!! जय भवानी जय शिवाजी
ReplyDeletekhup chan lekh ahe
ReplyDeletejay bhavani jay shvaji
maharajancha rajyabisheck manje hindvi swarajacha swatantray din aahe aapan sarvani sajara karu. jay bhavani jay shivray.
ReplyDeleteApratim,
ReplyDeleteMaratha Badshaha Yevdha Chatrapati Jhahala,
Hi Goshta Kahi Samanya Jahali Nahi.
Khupach Chhan Ahe
ReplyDeletekharach kay lekh aahe rajebaddal blog lihat jaa raje aapnas udand aayushya detil
ReplyDeleterajesahebanna manacha mujara
एकच राजे शिवराय माझे
ReplyDeleteएकच राजे शिवराय माझे
ReplyDeleteखुप छान लेख आहे. 👌👌👍💐
ReplyDeleteस्फूर्तिदायक लेख.लेखकाचे खूप खूप आभार.
ReplyDelete