घडविला महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

महाराष्ट्र घडविला तो महाराजांनी, शेताच्या बांध्यावर उभे राहून गोफणीने पाखरे हाकणाऱ्या शेतकऱ्याला उभे केले गोफण हातात घेऊन पण पाखरे हाकलायला नाही तर मराठी मातीवर अन्याय करणाऱ्या सैतानांना हाकलायला तेव्हा कुठे रयतेचे राज्य उभे राहिले. महाराज गेले संभाजी महाराजांनी हे स्वराज्याचे स्वप्न आपल्या अंगावर पेलले, त्यानंतर राजाराम, पेशवे शाहू असे अनेकांनी...
राजेशाही संपली नंतर ब्रिटीश आले जवळ-जवळ १५० वर्षे सत्ता गाजवत तेही निघून गेले, भारत स्वतंत्र झाला, पण महाराष्ट्र मात्र धुमसत होता महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले, पण मराठ्यांनी असे होऊ दिले नाही संयुक्त महाराष्ट्रासाठी "१०६" बळी गेले
चिंतामणराव देशमुख याच एकमेव माणसाने दिल्लीत स्वाभिमानी मराठी बाणा दाखविला बाकी सारे मराठे पळ्कुटे व लाचार निघाले संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरु असताना स.का.पाटील नावाचं व्यक्तीमत्व आडवे आले मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही असी वल्गना करणारे तेच ते पाटील म्हणे सूर्यचंद्र असे पर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, मग काय झाले मुंबई जिंकली मराठी माणसाने लढले कोण ? मंगल कलश आणला कुणी ? सबंध मराठी माणूस आणि चिंतामणराव देशमुख पण, नाव झाले कुणाचे यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्रपेक्षा नेहरू मोठे असे यशवंतराव चव्हाण म्हणाले होते आणि याच यशवंतरावांच्या हातात मंगल कलश महाराष्ट्राचा मंगल कलश यानी भंगारात टाकला, अहो अगदी वाटच लावली...!

तेव्हा मराठ्यांची एकजूट होती आणि आत्ता देखील अशा एकजुटीची गरज आहे महाराष्ट्राला......!

" दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा
बस करा राखायचे दिल्लीच्या तख्तावरी बैसितो
मराठा माझा येणाऱ्या काळात आपल्याला हि साद घालायचीये..."

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Nakkich.........Saad GHalayachich aahe

    ReplyDelete