आपला इतिहास

मराठ्यांनो, महाराष्ट्राचा इतिहास केवळ छत्रपती शिवरायांपासून सुरु होऊन पानिपत मध्ये संपत नाही, तर, अगदी अन्याय्यी क्षत्रियांचे निर्दालन करणाऱ्या परशुरामाच्या पूर्वी पासूनच तो सुरु होतो.

रावणाच्या निर्दालनासाठी जाताना प्रभू श्री रामचंद्राच्या मार्गातला 'दक्षिणपथ' म्हणजेच आताचा महाराष्ट्र !!!!! शत्रूच्या उच्चाटनासाठी सदैव तत्पर असणारा महाराष्ट्र !


इ. स. ७११ मध्ये महम्मद कासी नावाच्या अरबी मुसलमान सेनापतीने हिंदुस्थानवर पहिल्यांदा सर्वात मोठे आक्रमण केले. त्यानंतर शतके उलटून गेली तरी साऱ्या आशियातील अरब, अफगाण, पठाण, तुर्क, मोघल इ. साऱ्या म्लेच्छ जातीची व पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज ह्या प्रबळ नी आक्रमक युरोपियन राष्ट्रांचीही धाडच्या धाड हिंदुराष्ट्राचा नी हिंदुधर्माचाही उच्छेद करण्याच्या प्रतिज्ञेने येऊन कोसळली होती. त्या भीषण धार्मिक-राजकीय आक्रमणांनी संपूर्ण हिंदुराष्ट्र जर्जर झाले होते. तेव्हा ह्या हिंदुराष्ट्राच्या अधिष्ठात्री देवतेने मंत्रोदकाचे सिंचन दक्षिणेत या सह्याद्रीवरच केले ! आणि अकस्मात सह्याद्री पर्वतचा पर्वत पेटून उठला ! अग्नीकल्लोळावर अग्नीकल्लोळ भडकले !!!! आणि त्यातून शतावधी - सहस्त्रावधी - लक्षावधी सशस्त्र वीर पुरुषांचे समूहाचे समूह निर्माण झाले ! त्यातील ज्याने त्याने त्या ज्वालांच्या मालिकांतून एकेक ज्वाला उपटून, तिचाच आपल्या हातात भगवा ध्वज धरून, मुसलमानी व ख्रिश्चन राजसत्तेच्या समूळ निर्दालनासाठी ते, साऱ्या भारतभर "हरहर महादेव" चा रणघोष करीत लढले.


इराणपासूनी फिरंगाणपर्यंत शत्रूची उठे फळी |
सिंधुपासुनी सेतुबंधापर्यंत रणांगणभू झाली ||
तीन खंडीच्या पुंडांची ती परतू सेना बुडविली |
सिंधुपासुनी सेतुबंधापर्यंत समरभू लढविली ||

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब