किमॉंशहरण


औरंगजेबाला पूर्ण हिंदुस्थानवर एक छत्री अमल प्रस्थापित करावयाचे होते उत्तरेकडील भागात ते निर्विवाद सत्ता गाजवत होते परंतु दक्षिणेतील उठावांमुळे त्याचा मनसुबा पुरा होत नव्हता दक्षिणेकडील विजापुर, गोवळकॊंडा आणि मराठे यांचा नायनाट करण्याची आपली दीर्घकाळाची महत्वाकांक्षा पुर्ण करण्याच्या हेतुनेच तो दक्षिणेत उतरला होता.

त्याचा सेनासंभार मराठ्यांच्या सामर्थ्यापेक्षा किती तरी पटींनी अधिक समृद्ध आणि संपन्न होता.
पण शंभूमहाराजही काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. कडवी झुंज हे जणू मराठ्यांच्या रक्तातच निपजले होते
आपल्या मुठभर संभाजीराजांच्या सेनेनी त्याच्या सेनेला इतके सळो कि पळो करुन सोडले होते .
प्रत्येक ठिकाणी अपयश येत होते आणि ते पचवणे ही फार कठीण होते .

अपयश येत असल्याने आपल्या अधिकाऱ्यांच्या सतत बदल्या कराव्या लागत होत्या. मुघलांचे अवाढव्य सैन्य आणि त्यांचा बादशाही सरंजाम कोठेही स्थीर होऊ दिला नाही. माणसे, घोडे, मालवाहू जनावरे, धान्य यांचा मराठ्यांनी गनिमीकाव्याने नाश केला.

कल्याण, भिवंडी, रायगड, पुरंदर वगैरे सर्वच मराठी मुलखात औरंगजेबाला सतत तीन वर्षे दारुण अपयश आल्यामुळे त्याने आपला मोहरा विजापूर, गोवळकॊंड्याकडे वळवला.काही केल्या संभाजी हातात येत नाही ही
चिंता औरंगजेबाला खात होती .हातात माळ घ्यावी नमाजाची चादर काखेत गुंडाळावी आणि मक्का मादिनेच्या यात्रेला जावे आसा त्याचा मनसुबा होता आणि तो पुरा होण्यासाठी ह्या वादळावर मात मिळवावी लागणार होती.

पण जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन आलेला हा राजा एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते हे वेळोवेळी सिद्ध करत होता आणि ह्याच सगळ्या गोष्टीला मनापासून
खचलेल्या औरंगजेबाने आपल्या डोक्यावरचा किमॉंश फेकुन देऊन संभाजीचा पराभव केल्याशिवाय तो पुन्हा डोक्यावर घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती.

शेवटी सह्यादीच्या कुशीतील वाघाचाच हा छावा होता...............

2 comments:

  1. Anonymous09:19

    शेवटी सह्यादीच्या कुशीतील वाघाचाच हा छावा होता...........

    ReplyDelete
  2. धर्मवीर,शौर्यवीर,सिंहाच्या छाव्याला त्रिवार मानाचा मुजरा.....!! जय शिव-शंभु !!

    ReplyDelete