छत्रपती राजाराम

प्रस्तुत लेखात आपण छत्रपती संभाजी नंतरच्या मराठा राज्याची वाटचाल पाहानार आहोत. थोरल्या राजांनी जे कामावले ते राखन्याची जबाबदारी छत्रपती संभाजींवर आली ते त्यांनी राखले पण त्यांचा अकाली घरपकडी व नंतर हत्ये मुळे मराठेशाहीचा पार कणा मोडुन गेला. स्वराज्यास छत्रपती म्हणुन राजारामाला मंचकावर बसवीले. हा कालावधी या छोट्या हिंदु राज्याला फारच धामधुमीचा, दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला. छत्रपती राजाराम व नंतर त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्य पाहीले व तो काळ गाजविला व राज्य (थोडेसे का होइना जिंवत ठेवले) त्या कालावधीस आपण थोडक्यात भेट देऊ.
छत्रपती राजाराम हा सन १६७० च्या २४ फेब्रुवारीला जन्मला. जन्मताना तो पायाकडुन जन्मला म्हणुन सर्वजन चिंतीत झाले असता शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तवीले. (ही कथा) जरी राजारामाने पातशीही पालथी घातली नाही तरी त्याने पातशाहाला मात्र झुंजवत ठेवुन यश मिळु दिले नाही, पातशाही खिळखिळी केली. राजारामास लिहीता वाचता येत होते. मोठ्या भावाप्रमाने तो कवि नव्हता. राजाराम हा शांत धीरगंभीर प्रकृतीचा होता. राजाराम महाराजांचे लक्ष्करी शिक्षण हे हंबीरराव मोहीत्यांकडे ( स्वराज्याचे सरसेनापती व नात्याने सख्खे मामा) झाले. हबिंरराव हे कुडतोजी (प्रतापराव) गुजरानंतरचे सेनापती. प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामाचे लग्न लावले.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६