गुढीपाडवा


लक्ष द्या हिंदूंनो,गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी.पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्या राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते.
गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते.
त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही.
यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते.

स्वाभीमानाने तळपत झळकणार्या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. "दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले

!!!स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न हो.....!!!शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही. तिथे तुमचे स्मरण करून साधी फुलेही वाहात नाही. उलट आमच्यातीलच काही हिंदु तुमच्या नावाचा दुरूपयोग राजकारणात करून त्यावर आपली पोळी भाजत आहेत. ज्या धर्मासाठी आपण बलीदान केलेत त्या धर्मा विरोधात काम करीत आहेत. आणि आम्ही अभागे हे सर्व निमूट पणे पाहात आहोत. आम्हाला क्षमा करा..आम्हाला क्षमा करा.

Comments

  1. Anonymous03:26

    maaf kara maharaj aamhala

    ReplyDelete
  2. amey ghadage03:27

    sambhaji maharaj far shur hote

    ReplyDelete
  3. Nilesh09:47

    Chatrapati Sambhu rajanche dole kadale tari te kalvale nahit karan kadachit marathi manachi kahuri, Sharamsarpana tyanna pahayacha nasava.
    Kadachit ya chavyasati marathi band zale aste tar uttarekadun aleli hizadyanchi fauzene hi haramkhori keli nasti, pan kadachi amchya matila futirpanacha shrap asava........
    Manun amchya Wagach ghas ghennyachi himmat ya gidhadani keli........

    ReplyDelete
  4. Anonymous18:53

    Atishay Chaan aahe. Pan mala ek saangaayche aahe ki Chatrapati Sambhaji Maaharajaancha ani Kutil Aurangjebacha Sangharsh ha keval Dharm Sangharsh hota ka? mala asa vaatat ki to Ek Sattasangharsh hota. Karan Maharaj Kontya dharmacha anataer nhavte karat.

    Karan Khup lok mhantat ki Sambhaji Raje Dharmasathi maran paavle.

    Aso pan tumcha blog atishay Changla aahe..ani he atishay changle kaam aahe marathi pan japun thevne..Tumchya kaamat udand yash yeude hich chatrapain charani prarthan

    Jai Maharashtra....

    ReplyDelete
  5. Nagesh00:43

    He balidan kadhich visrun chalnar nahi. Maharajani Marathi dharmasathi aaple balidan deun Mararashtratil pratyek mansala tyachya kartvyachi janiv karun dili aani julmashahipude taath maanen sangharsh karnyachi prerna dili. Dhanya Shri.Chatrapati Shivaji Maharaj aani tyancha Shurveer Chhawa!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब