पावनखिंड


स्वातंत्र्याच्या सुर्या प्रसन्न हो, आता तरी प्रसन्न हो |
गजापूर ची खिंड पावन झाली , पावन खिंड... दाट
वृक्षराजीखाली, लवलवत्या तृनंकुरांच्या संगतीत निर्जन एकांतात
सह्याद्रीच्या कुशीत समाधीच्या पवित्राने आणि सतीच्या गांभीर्याने उभी
असलेली ती पहा गाजपुरची खिंड.हीच ती वाट याच वाटेवर रक्ताचे आणि घामाचे थेंब सांडले, येथून ती पालखी गेली वारकर्यांची धडकार्यांची.इतिहास उगवतो तो रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून अत्तराच्या आणि गुलाब पाण्याच्या थेम्बातून नव्हे ती ही पावन खिंड. पान्हाळगड पासून १७ कोसावर आहे: अवघड आहे तिचा मार्ग खच खळग्यांनी आणि कट्याकुट्यानि सजला आहे.एका भयंकर घटसर्पाच्या तडाक्यातून हिरडस मावळातल्या गरीब शेतकर्यांनी स्वराज्याचे प्राण वाचवले ते याच खिंडीत.बाजीप्रभूंच्या आणि मावळाच्या रक्ताचे आणि घामाचे थेंब टप टपले ते याच खिंडीत,पावन खिंडीतील मातील सुघंद आहे बाजींच्या आणि फुलाजी प्रभूंच्या त्यागाचा.जर तेथील मुठभर माती पाण्यात टाकली तर त्याला रंग चडेल बाजींच्या रक्ताचा, जर तेथील जमिनीला कान लावला तर आवाज एकू येईल बाजींच्या तोंडून कडाललेल्या महाराष्ट्राच्या महामंत्राचा,हर हर महादेव | हर हर महादेव ||

No comments:

Post a Comment