किल्ले रायगड

रायगडाचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास रासिवटा व तणस अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दर्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोर्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूर कडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणार्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून
महारांजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.
शिवराज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर आलेला इंग्रज वकील टॉमस निकल्स रायगड दर्शनाने इतका प्रभावित झाला अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्यास हा गड थोड्या सैन्यासह सुद्धा संपूर्ण जगविरूध्द लढू शकेल
अशी नोंद केली
याच दुर्गदुर्गेश्र्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे.
१.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्विप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर १५.पूर्वेकडील जिब्राल्टर

4 comments:

 1. moryanchya pan aadhi rayagadvar shirke rahat hote tyanchi tithe vasti hoti. nanatr tithe more aale. pan more sangun pan ekat nahit gaddari karatat mhanun tyanna jarab basavi mhanun maharajanni to tabyat ghetala aani maharajanchya aadnye varun hiroji indolkaranni tithe killa bandhun kadhala.

  ReplyDelete
 2. Aapan dileli mahiti chan aahe..... facebook var aamache kahi ase group aahet kiva mandali aahet tyani SHIVRAYANCHA itihas ...Marathyancha itihas gharoghari poahachavanyace tharavale aahe krupaya aamhi aapali link tikade share karu shakato ka??? plzzzz sanga maza mail id: bhosale.ranjet8@gmail.com

  ReplyDelete
 3. maza mail id : bhosale.ranjeet8@gmail.com

  ReplyDelete
 4. mi raygadla 5 vela gelo ahe. Shivrayanchya sparshane paavan zalelya raygadavar pratyetk veli jatana bhan harapate. Mi swatahala bhagyavan samjato ki maze gav rayagadachya javal ahe 'Mahad'. Tari suddha raygadachi 'rayri' sodun itki nave mala mahit navhati. ti tumchya mule kalali tya baddal dhanyavaad. Raygadache ani Shivarayanchya doordrushtiche jevdhe kautuk karave tevadhe kami ahe. mhanun Rayagadala ani maharajana maza trivaar mujara...

  Avinash Baikar
  Graphic Designer
  Vajra Communication
  Dar es Salaam
  Tanzania

  ReplyDelete