चढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज

चढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज


चढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज
चढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज, चढत प्रताप दिन, दिन अति अंग में,
भूषण चढत मर हट्टन के चित्तजाव,खग्गकुली चढत हे अरिन के अंग में !!

भौसिला के हात गडकोट हे चढत अरी, जोट हे चढत एक मेरुगिरी स्रिंग में,
तुरकान गनव्योम यान हे चढत बिनु, मान हे चढत बद रंग अवरंग में !!

-कविराज भूषण

अर्थ :
चतुरंग सैन्य सज्ज करून,"शिवराज" घोड्यावर स्वार होताच.त्यांचा प्रताप दिवसेंदिवस समरांगनात वाढतो आहे , भूषण म्हणतोय इकडे मराठ्यांच्या मनातला उत्साह ही वाढायला लागला आहे,तर तिकडे उपसलेल्या तलवारी शत्रुच्या छातीत घुसत आहेत,भोसल्याच्या हाती एका-मागुन एक असे किल्ले येऊ लागले आहेत,तर तिकडे शत्रुच्या टोळ्या एकत्र होउन मेरु पर्वतांच्या शिखरानवर चढू लागल्या आहेत, तुरकांचे समुदाय युद्धात मरण मिळाल्या मूळे विमानात बसून आकाश मार्गे जात आहेत ,तर इकडे अवमान जाल्या मूळे अवरंगजेब निस्तेज जाला आहे .

No comments:

Post a Comment