हिन्दुपति सेवाने


हिन्दुपति सेवाने


मन कवी भूषन को सिव की भगति जीत्यो
सिव की भगति जीत्यो साधु जन सेवाने ।

साधु जन जीते या कठिन कलिकाल
कलिकाल महाबीर महाराज महिमेवाने ॥

जगत मै जीते महाबीर महाराजन
ते महाराज बावन हू पातसाह लेवाने ।

पातसाह बावनौ दिली के पातसाह
दिल्लीपति पातसाहै जीत्यो हिन्दुपति सेवाने ॥

-कविराज भूषण

अर्थ :
कवी भूषणाच्या मनात शिवभक्तिने ,शिव भक्तिस साधूजनांच्या सेवेने, साधूजनास कलिकालाने,कलिकालास शूर आणि कीर्तिवान राजांनी आणि या शूर आणि कीर्तिवान राजास बावन्न बादशहास जिंकणार्या (औरंगजेबाने) आणि त्या बावन्न बादशहाच्या बादशहास म्हणजे दिल्ली पति औरंगजेबास "हिन्दू पति" शिवरायांनी जिंकले.

या छंदात कवि भूषणाने शिवाजी महाराजांना "हिन्दूपति" अशी उपमा दिलेली आहे. यावरूनच पुढील काळात मराठी साम्राज्याला हिंदुपतपातशाही म्हणण्याचा प्रघात पडलेला असावा.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६