सिवा नरेस भ्रकुटी चढाई है...

सिवा नरेस भ्रकुटी चढाई है...

प्रेतिनी पिसाच रु निसाचर निसाचरि हू, मिलि मिलि आपुसमे गावत बधाई है ।
भैरों भूत प्रेत भूरी भूधर भयंकर से, जुत्थ जुत्थ जोगिनी जमाती जुरि आई है ।
किलकि किलकि कै कुतूहल करति काली, डिमडिम डमरू दिगंबर बजाई हैं ।
सिवा पूंछै सिव सों "समाजु आजु कहॉ चली", काहू पै सिवा नरेस भ्रकुटी चढाई है ॥
-कविराज भूषण
अर्थ :
(या छंदात भूषण कवीने काल्पनिक शिव - पार्वती संवाद वर्णिलेला आहे)
प्रेते, पिशाच्चे, राक्षस, राक्षसी जमून आपापसात आनंदाने गात आहेत. पर्वताप्रमाणे धिप्पाड शरीरे धारण करणारे भैरव, तसेच भूते, प्रेते यांच्या झुंडीच्या झुंडी जमू लागलेल्या आहेत, कालीदेवता किल किल शब्द करून जमलेल्या समाजाचे कौतुक करीत आहे, आणि महादेव आनंदाने डमरू वाजवत आहे. हा शिवगणाचा आनंद पाहून पार्वतीने महादेवास विचारले,
" महाराजा, आज आपली मंडळी कुठे निघाली आहेत ?"
महादेव म्हणाले,
" आज, शिवराज कोणा शत्रुवर कृद्ध झालेले आहेत.

Comments

  1. नमस्कार,
    धन्यवाद...ह्या सर्व कवितंचा संग्रह आम्हसर्वापर्यंत पोहोचवन्यासाठि.
    वरिल कडवे "शिवबावनी" मधिल आहे ना?...तुम्च्यकडे पुर्ण "शिवबावनी आहे का?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब