अण्णाजी दत्तो

अण्णाजी दत्तो : मुलुखदार कोकण प्रांत

प्रतापगडावरील अफझलखानच्या मृतुनंतर १८ दिवसातच पन्हाळा जी आदिलशाहीची राजधानी मानली जाते ती अण्णाजी दत्तो नी काबीज केली तो दिवस होता
२८ नोवेबेर १६५९.

अण्णाजी पहिल्यांदा "वाकनीस" म्हणून स्वराज्याच्या राज्य कारभारात रुजू झाले ते १६६१ साली.नंतर १६६२ साली त्यांना सुरनीस पदावर नेमण्यात आले.

१६७३ मध्ये,अण्णाजी आणि कोंडाजी फार्झंद यांनी पन्हाळा जिंकला.हा एक उत्तम असा व्यवस्थित आखणी केलेला डाव होता पन्हाळ गडाच्या किल्लेदाराला हल्ल्याची
जराही चाहूल न लागू देता कोंडाजीने गडाची सर्व दारे आपल्या ताब्यात घेतली.अण्णाजी हे कोंडाजीच्या एश्र्याची वाट बघत होते.जसा इशारा कोन्दाजीने केला तसे
अण्णाजी आत शिरले आणि गड काबीज केला.

१६७४ साली अन्नाजींनी फोंडा किल्ला घेण्याचा अपयशी प्रयत्न देखील केला किल्लेदार मोहम्मद खानच्या लढवय्ये पणामुळे हा किल्ला अन्नाजींना घेता आला नही
परंतु १६७५ मध्ये महाराजांनी स्वताः फोंडा किल्ल्याची मोहीम फत्ते केली तेव्हा देखील अन्नोजी महाराजांसोबत होते
१६७४ मध्ये जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला. तेव्हा अण्णाजींना कोकण परगण्याची जवाबदारी सोपविण्यात आली
१६७७ साली दक्षिण दिग्विजयास निघालेल्या महाराजांसोबत अण्णाजी देखील होते
असे अण्णाजी दत्तो शिवाजी महाराजांच्या काळातील एक अत्यंत विश्वासू ,आज्ञाधारक आणि महत्वाचे व्यक्ती होते अण्णाजी हे शिवाजी महाराज्यांच्या अष्टप्रधान मंडळातील महत्वाचे सदस्य होते.
शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.

याच मूळे अण्णाजी दत्तो आणि संभाजी महाराजांचे कधी पटलेच नही इतकाच काय तर शिवाजी
महाराजांविरुद्ध रचलेल्या कारस्थानात (विष देण्यास) अण्णाजी दत्तो आणि इतर काही मंत्री एकत्र होते
आणि अन्नाजींनी महाराजासाहेबांना (शिवाजींना) विष देण्याचा आळ शंभू महाराजांवर घेतला इतकेच काय
तर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाई यांना भिंतीत चुणून मारण्याचा खोटा आरोप देखील या अण्णाजी मुळे
संभाजी महाराजांवर आला

No comments:

Post a Comment