सिवाजी न हो तो..

कुंभ कन्न असुर अवतारी अवरंगजेब कीन्ही ।

कत्ल मथुरा दोहाई फेरि रब की ।

खोदि डारे देवी देव सहर महल्ला बाँके ।

लाखन तुरूक कीन्हे छूटि गई तब की ।

भूषन भनत भाग्यो कासीपति विश्वनाथ ।

और कौन गिनती में भूली गति भब की ।

चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि ।

सिवाजी न हो तो सुनति होत सब की ॥


-कविराज भूषण

अर्थ :
भूषण म्हणतो, कुंभकर्ण राक्षसाचा अवतार जो औरंगजेब - त्याने मथुरेची कत्तल करून सर्व शहरात "रब"ची द्वाही फिरवली (मुसलमानी चालविली). शहरातील गल्लोगल्लीतून असलेल्या उत्तम उत्तम देवता खोदून खणून काढल्या. लाखो हिंदुंना बळाने मुसलमान केले, इतकेच काय, प्रत्यक्ष काशी विश्वनाथ भयभीत होउन पळाले, महादेवाची अशी त्रेधा उडाली तेथे इतरांची काय कथा ? अशा भयाण वेळी जर शिवराय नसते तर चारही वर्णांना आपापले धर्म सोडून नमाज पढावा लागला असता व सर्व हिंदुंची सुंता झाली असती

No comments:

Post a Comment