अली नवरंगजेब चंपा शिवराय है

अली नवरंगजेब चंपा शिवराय है


अली नवरंगजेब चंपा शिवराय है...
कूरम कमल, कमधुज है कदमफुल,
गौर है गुलाब राना, केतकी बिराज है |

पाँढुरी पवार, जुहीसोहत है चंदावत,
सरस बुंदेले सों चमेली साजबाज है ||

भूषण भनत मुचुकुंद बडगूजर है,
बघेले बसंत सब, कुसुम समाज है |

लेई रस ऐतिन को, बैठी न सकत है,
अली नवरंगजेब चंपा शिवराय है ||
-कविराज भूषण

अर्थ :
येथे भुषणाने औरंगजेबाच्या मांडलिक राजांना एकेका फूलाची उपमा दिली आहे.
जयपूरचे कछवाह हे कमळाप्रमाणे , जोधपुरचे कबंधज हे कदंबप्रमाणे, गौड़ गुलाबावत तर चितोडचे राणे केतकीवत आहेत. पवार पांढरीच्या फूलासारखे तर चंदावताचे राजे जुईच्या फूलाप्रमाणे, बुंदेले चमेलीसारखे, गुजर मुचकुंदाप्रमाणे आहेत. औरंगजेब हा भूंगा आहे. भूंगा जसा फूलाफूलातून मध गोळा करतो तसा औरंगजेब या सगळया राजांकडून कर गोळा करतो. पण शिवराय चंपकपुष्पाप्रमाणे आहेत की ज्याच्या वाटेला भुंगा(औरंगजेब) कधीही जात नाही.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६