साहि तनै सरजा कि कीरती सों

साहि तनै सरजा कि कीरती सों


साहि तनै सरजा कि कीरती सों...
साहि तनै सरजा कि कीरती सों ।
चारों और चाँदनी वितान छिति छोर छाइयतु है ।
भूषन भनत ऐसो भूप भौंसिला है ।
जाको द्वार भिच्छुकन सो सदाई भाइयतु है ।
माहादानी सिवाजी खुमान या जहान ।
पर दान के प्रमान जाके यों गनाइयतु है ।
रजत की हौस किए हेम पाइयतु जासो ।
हयन की हौस किए हाथी पाइयतु है ॥
-कविराज भूषण
अर्थ :
शहाजी पुत्र शिवरायांच्या कीर्तिरूप चांदणीचा मंडप पृथ्वीच्या चहूंकडील टोकापर्यंत पसरला आहे. भूषण म्हणतो, हे भोसलेराज असे आहेत की, भिक्षुकांना नेहमी त्यांच्या द्वाराशी पडून रहावेसे वाटते. या भूतलावर शिवाजी महाराज महान महान दाता असून त्यांच्या दानाचे प्रमाण यावरूनही समजून येते ; की रूप्याची इच्छा केली असता सोने मिळते व घोड्याची इच्छा केली असता महाराजांकडून हत्ती मिळतो.
या छंदावरून शिवाजी महाराजांनी दानाप्रीत्यर्थ कविराज भूषणास हत्ती भेट दिलेला असावा असा तर्क करावयास जागा आहे.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६