मृत्यूशय्येवर निजणारा हिरोजी फर्जंद


लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजेल ह्या काळजीमुळे प्रत्येक रयत रयतेतील प्रत्येक जण महाराजांवर जीव ओवाळून टाकीत होता त्यातीलच एक म्हणजे हिरोजी फर्जंद

मिर्झा राजे जयसिंग यांबरोबर झालेल्या कराराच्या ओझ्यामुळे महाराजांना पातशहाच्या भेटीसाठी आग्र्यास जाणे भाग पडले औरंगजेबाचा पन्नासाव्या वाढदिवसाला महाराज त्या औरंग्याच्या दरबारात हजर होते येथे मात्र महाराजांचा अपमान करण्यात आला आणी नंतर महाराजांना डांबून ठेवण्यात आले हफ्सी मुराज खान, फौलाद्खन जातीने पहारा देत. नंतर हे पहारे ढील्ले पढले

युक्ती लढवली गेली तसेच झाले. महाराज दि. १७ ऑगस्टला संध्याकाळी पसार झाले. त्यावेळी त्यांच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद स्वतः हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत पांघरून घेऊन झोपला झोपला.

(मागें दिल्लीमध्ये हिरोजी फरजंद पलंगावरी निजला होता. तो चार प्रहर रात्र तीन प्रहर दिवस तैसाच निजला.चौकीचे पोलादखानाचे लोक कोठडीत येऊन पाहतात {तो} राजे शेला पांघरून निजले.पोर पाय रगडित होता. पोरास लोक पुसतात की राजे आज फार वेळ निजले? पोर म्हणतो की 'शीर दुखते'ऐसे पाहोन लोक जातात. तैसाच तीन प्रहर रोज हिरोजी निजला होता. तों प्रहर दिवस असतां हिरोजी उठोन , आपलीं पांघरुणे, चोळणा, मुंडासे घालून पोर बरोबरी घेऊन, बाहेर आला चौकीदारांनी पुसिले त्यांस हिरोजीने सांगितले की शीर दुखते, कोणी कोठडीत जाऊ लागेल त्यास मन करणे. आपण औषध घेऊन येतो " म्हणून चौकीदारास सांगून दोघे बाहेर गेले. रामसिंगाचे गोटास जाऊन त्यास एकांती वर्तमान सांगोन आपण तेथून निघोन देशाचा मार्ग धरीला ) कंसातील लेखन - सभासदाची बखरदुसरा दिवस उजाडला आणि बोभाटा झाला.एकच कल्लोळ उसळला. फौलादखानाला तंबूत चिटपाखरूही दिसले नाही. पलंगावर एक गाठोडे , एक लोड आणि दोन जोडे शालीखाली गाढ झोपलेले आढळले. ते पाहून फुलादखानाची काय अवस्था झाली असेल ? तो विरघळला की गोठला ? त्याला शिवाजीराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का ? आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का ? केवढी फजिती!

एवढ्या प्रचंड पहाऱ्यातून अखेर तो सीवा आपली थट्टा करून पसार झाला तेही साऱ्या मावळ्यांना सुरक्षित घेऊन . आता त्या औरंगजेबापुढे जायचे तरी कसे ? त्याला सांगायचे तरी काय ? काय अवस्था झाली असेल फुलादखानची ?

केवढी ही स्वामीनिष्ठा केवढा हा त्याग स्वताच्या जीवावर खेळून पर मुलखातुन आपल्या धन्याला सुखरूप राजगडी न्हेणारे असे हे हिरोजी फर्जंद

17 comments:

 1. salam tya heorjin's
  kay mhanave tyanchya badal........

  ReplyDelete
 2. तमाम शिवाप्रेमिन्कडून मी "हीरोजीनचे " आभार मानतो !
  त्यांच्यामुले "आग्रयहून महाराज " सुटले
  एकदम सही रे... !!!!
  जय भवानी! जय शिवराय !!

  ReplyDelete
 3. महापराक्रमी तूच खरा
  राजनीती चाणक्य खरा
  त्यागाचा आदर्श खरा ||

  ReplyDelete
 4. Anonymous02:20

  जगण्याची शान तु
  आणी आमुचा
  अभिमान तु ...... सिद्धेश तापकीर

  ReplyDelete
 5. हिरोजी फर्जंद यानां माझा मानाचा मुजरा....
  पण असे मावले घडवले त्या छत्रपति शिवाजी राजाना माझा त्रिवार प्रणाम..

  श्री ची इच्छा -· -·=»‡«=·- ·ï¡÷¡ï·

  ReplyDelete
 6. हिरोजी फर्जंद यानां माझा मानाचा मुजरा....

  ReplyDelete
 7. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 8. मराठी लॅंग्वेज ICU मध्ये आहे. मराठी लॅन्गवेजला इण्टेन्सिव्ह केअरची गरज आहे. .... जीवाला जीव देण्याची, मावळ्यांना आता नशा नाही. खूप झाल्या सेना, खूप झाले सेनापती, .... ती यशस्वी झाली आणि आता ती देशाने उचलली आहे. अशा प्रकारच्या अनेक योजना महाराष्ट्राने राबवल्या आहेत. ...

  ReplyDelete
 9. chetan Baraskar12:38

  असाच हनुमान जयंतीचा दिवस ! छत्रपती महाराज अस्तावास्थ पहुडले होते तेवढ्यात महाराजांनी आज्ञा केली ,"आता सगळ्यांनी बाहेर जा !
  आम्हास शिव शंभूचे ध्यान करायचे आहे . आमची जाण्याची वेळ आली आहे !"आणि महाराजांनी आपले डोळे मिटून सांब सदाशिवाचे ध्यान करू लागले.. महाराणी सोयरा बाईसाहेब,बालाजी आवजी चिटणीस , एक एक करून सारी खाशी मंडळी बाहेर पडू लागली. आणि सर्वात शेवटी वयाने आणि अनुभवाने मोठे असलेले हिरोजी फर्जंद जाऊ लागले . आणि जाताना महाराजांना पाहून कदाचित म्हणाले असतील का , "महाराज आजही हा हिरोजी तुमच्या शय्येवर झोपायला तयार आहे ! महाराज फ़्क़्त तुम्ही आज्ञा द्या ...............!!"
  अशा हिरोजी फार्जन्दास मनाचा मुजरा ......!!!

  ReplyDelete
 10. तलवारीला कितीही धार असलीतरी ढाल ही जरुरी असते,
  पण एका अबेद्या मराठ्याला फक्त तलवारच काफी असते,
  कारण मराठा लढतो तो जिंकून मरण्यासाठी त्याला जगण्याची भीती नसते,
  मनाचा मुजरा त्या "हीरोजीना"

  ReplyDelete
 11. दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रांनो असच भरभरून प्रेम देत रहा
  अजून खूप काही इतिहास बाकी आहे

  ReplyDelete
 12. aamche raje aahetach tase ki konihi jiv vovalun takatat

  ReplyDelete
 13. Maharaja barobar, Hirojina aamcha manacha mujara...!

  ReplyDelete
 14. सही रे... !!!! हिरोजी फर्जंद यानां माझा मानाचा मुजरा....

  ReplyDelete
 15. chhanch ...
  हिरोजी फर्जंद यानां माझा मानाचा मुजरा...

  ReplyDelete
 16. mujra tya hutatmyas .....

  ReplyDelete