दुर्ग -ढाकोबादुर्ग -ढाकोबाकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः भीमाशंकर रांग
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
किल्ल्याची उंची : दुर्ग ३९०० फूट,ढाकोबा ४१०० फुट

नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे एक उत्तुंग पर्वत रांग दिसून येते.त्याध्येच एक डोंगर म्हणजे 'ढाकोबा'.किल्ल्याची एक बाजू म्हणजे सरळसोट सुटलेला कडा.तो सरळ खाली कोकणातच उतरतो.याच ढाकोबाच्या सरळ रेषेत असणारा दुसरा किल्ला म्हणजे 'दुर्ग'.दुर्गमता आणि विरळवस्ती हे या भागाचे वैशिष्ट.येथे ग्रामस्थांची आपल्या प्राथमिक गरजा भागवतांनाच मारामार होते तर वीज -शिक्षण तर दूरच.येथील मुख्य व्यवसाय शेती काही ठिकाणी दुधाचा व्यवसाय पणा केला जातो. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : या दोन्ही गडावर गड किंवा किल्ला असण्याचे कोणतेही अवशेष नाहीत मात्र
टेहळणीसाठी यांचा उपयोग केला जात असावा.धाकोबा किल्ल्यावरून नाणेघाट जीवधनची मागची बाजू ,दा-याघाट असे कोकणचे विहंगम दृश्य दिसते. दुर्ग :-दुर्गादेवीच्या मंदिरासून किल्ल्यावर पोहण्यास २० मिनिटे लागतात.येथून गोरखगड ,सिध्दगड आणि
मच्छिद्रगड असा सर्व परिसर दिसतो.

गडावर जाण्याच्या वाटा : जुन्नर - आपटाळे -आंबोली मार्गेयेणा-या वाटेने प्रथम ढाकोबा आणि नंतर दुर्ग करता येतो.भीमाशंकर-अहुपे मार्गेयेणा-या वाटेने प्रथम दुर्ग आणि नंतर ढाकोबा करता येतो.
१. जुन्नर - आपटाळे -आंबोली मार्गे
जुन्नर वरून आंबोली गावात येण्यासाठी थेट बस आहे.हे अंतर साधारण दीड तासाचे आहे.आंबोली गावातूनच ढाकोबाचे दर्शन होते.गावातून एक वाट सरळ समोरच्या पठारावर जाते.वर जातांना वाटेत तीन गुहा लागतात. गावापसून पठारावर येण्यास दीड तास पुरतो.या वाटेतूनच एक वाट मध्ये उजवीकडे दुभागते ती दा-याघाटा कडे जाते.एकदा पठारावर पोहचल्यावर अनेक ढोरवाटा लागतात.पण त्यामध्ये ठळक मात्र दोनच वाटा आहेत.त्यातील एक वाट डावीकडे जाते तर दुसरीवाट उजवीकडे थेट धाकोबाच्या पायथ्यालगत पुढे जाते आणि पुन्हा ५ मिनिटांनी डावीकडे डोंगरधारेवरून खाली उतरते.हीच वाट पुढे दुर्गकडे जाते.ही वाट ज्या ठिकाणाहून खाली वळते तेथूनच एक वाट सरळ डोंगरावर म्हणजेच धाकोबावर जाते. येथून गडमाथा गाठण्यास अर्धा तास पुरतो.
२. भीमाशंकर-अहुपे मार्गे वर सांगितलेल्या दुर्गकडे जाणा-या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक वाट डावीकडे जंगलात वळते.ती धाकोबाच्या मंदिराकडे जाते तर सरळ जाणारी वाट पुढे अर्ध्या तासात एका ओढापाशी येऊन थांबते.या ओढाला बारामही पाणी असते.याच वाटेने पुढे हातवीज च्या मार्गेनिघायचे.थोडेफार चढउतार आहेत वाटेला अनेक उपवाटा फुटलेल्या आहेत पण आपण ठळक वाट सोडायची नाही.पुढे एक तासाच्या चालीनंतर दुर्ग किल्ल्याचे दर्शन होते.पुढे एका पठारावर येऊन वाट दुभागते.डावीकडे जाणारी वाट हातवीज आणि दुर्गवाडीकडे कडे जाते तर उजवीकडे जाणारी वाट दुर्गादेवीच्या मंदिरात जाते.येथून दुर्गादेवीच्या मंदिरात जाण्यास अर्धा तास पुरतो.दुर्गादेवीच्या मंदिरापासून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट नाही.वाट आपणच आपली शोधून काढायची.

राहण्याची सोय : किल्ल्यावर नाही.
धाकोबाच्या पायथ्याशी असणा-या मंदिरात १५ जणांची राहण्याची सोय होते. दुर्गच्या पायथ्याशी असणा-या दुर्गादेवीच्या मंदिरात ५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : ढाकोबा आणि दुर्गादेवीच्या मंदिराच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याची तळी आहेत.

No comments:

Post a Comment