इंद्राई
किल्ल्याची उंची : ४४९० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः -सातमाळ
जिल्हा : नाशि
क श्रेणी : सोपी

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवडपर्यंत येऊन संपते.पुढे तीच मनमाडच्या
जवळ असणा-या अंकाईच्या पर्यंत जाते.याच रांगेला अजंठा - सातमाळ रांग म्हणतात.चांदवड तालुक्यात ४ किल्ले
येतात.राजधोर,कोळधेर,इंद्राई आणि चांदवड.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

गडाच्या पाय-या चढून गेल्यावर प्रवेशद्वाराच्या अलिकडेच डाव्या बाजूच्या कातळावर एक फारसीतील शिलालेख कोरलेला आहे.प्रवेशद्वाराचे अवशेष केवळ आजमितिस शिल्लक आहेत.गडमाथा प्रशस्त आहे.
गडमाथ्यावर गेल्यावर डावीकडे वळावे.थोडे पुढे गेल्यावर तीन वाटा लागतात.प्रथम उजवीकडची वाट पकडावी थोडाच अंतरावर कातळात खोदलेल्या गुहांची रांग ची रांग दिसते.या सर्व पाहून परत मागे फिरावे.
नंतर वर जाणारी वाट पकडावी थोडे अंतर चढून गेल्यावर महादेवाचे मंदिर लागते येथून पुढे जाणारी वाट समोरच्या डोंगरावर घेऊन जाते.महादेवाचे दर्शन घेऊन परत मागे फिरावे आणि आता डावीकडची वाट पकडावी.थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या १८ ते २० गुहा लागतात.यापैंकी काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत.शेवटच्या गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.इंद्राई किल्ल्यावरून चांदवड,राजधेर,कोळधेर ,धोडप ईखारा हा सर्व परिसर दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
१. वडबारे मार्गे
चांदवडहून राजधेरवाडी कडे जाणारी बस पकडावी.चांदवड पासून ६ किंमी अंतरावर असणा-या वडबारे गावात उतरावे.वडबारे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक ठळक पायवाट आहे.या वाटेने किल्ल्यावर जातांना एक झाप लागतो.ही वाट किल्ल्याच्या कातळकडापाशी राजधेरवाडीतून येणा-या वाटेला येऊन मिळते.गावातून किल्ल्यावर पोहचण्यास ३ तास पुरतात.
२. राजधेरवाडी मार्गे
चांदवडहून राजधेरवाडी कडे जाणारी बस पकडावी आणि राजधेरवाडीत उतरावे. वडबारे गावाच्या पुढे राजधेरवाडी आहे.राजधेरवाडीतू सुध्दा किल्ल्यावर जाण्यास पायवाट आहे. ही वाट किल्ल्याच्या कातळकडापाशी वडबारे गावातून येणा-या वाटेला येऊन मिळते.या वाटेने किल्ला गाठण्यास २ तास पुरतात.या कातळकडापाशी कातळात खोदलेल्या २ गुहा आहेत.यापैकी एका गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.कडातूनच गडावर जाण्यासाठी एक पाय-याची वाट खोदलेली आहे.सुमारे १५० पाय-या चढून गेल्यावर आपल्याला गडमाथा गाठता
येतो. राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. जाण्यासाठी लागणारा वेळ : वडबारे गावातून ३ तास.

No comments:

Post a Comment