किल्ले खांदेरी - उंदेरीखांदेरी - उंदेरी


किल्ल्याची उंची : ० फूट
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
जिल्हा : रायगड
श्रेणी : सोपी

सह्याद्रीतील भटक्या ट्रेकर्सला ऐकून सुपरिचित असलेली परंतु या सर्व ट्रेकर्सपैंकी अत्यंत कमी जणांनी प्रत्यक्ष पाहिलेली जलदुर्गांची जोडगळ म्हणजेच किल्ले खांदेरी उंदेरी .समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखाने उभे असणा-या खांदेरी - उदेरीचे वैशिष्टय म्हणजे मजबूत तटबंदी ,उंदेरीवर असणा-या १५-१६ तोफा तर खांदेरीवरच्या अत्यंत दुर्मिळ अशा तोफांना वाहून नेणा-या गाडासहीत असणा-या ३ तोफा. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे खांदेरी किल्ल्याकडे होडीने जात असतांनाच खांदेरीची मजबूत तटबंदी ,बुलंद बुरुज आणि त्यावर असणारे 'मुंबई पोर्ट ट्रस्ट' चे दिपगृह आपले लक्ष वेधून घेते.खांदेरीवर दक्षिणेला ३० मी उंचीची तर उत्तरेला २० मी उंचीची टेकडी आहे.या दोन टेकडयांमध्ये बोटींसाठी धक्का बांधलेला आहे.या धक्क्यावर ज्या ठिकाणी समुदाच्या पाण्याचा स्पर्श होतो तेथे चक्क एक तोफ पुरलेली आहे.तोफेचा मागचा भाग पाण्यातून डोकावतांना दिसतो.बाजूलाच बोटीची एक शेड बांधली आहे.
१. वेताळाचे मंदिर
धक्क्याच्या बाजूलाच उजवीकडे वेताळाचे लाकडी मंदिर आहे.आत एक मोठी पाढ-या रंगाने रंगविलेली शिळा आहे.ही शिळा म्हणजेच वेताळ होय.ही शिळा दरवर्षी आकाराने मोठी होत जाते अशी गावक-यांची श्रध्दा आहे.होळीच्या दिवशी येथे जत्रा भरते.
२. भांडाचा आवाज येणारा खडक
डावीकडे असणा-या धक्क्यावरून उतरून आपण दिपगृहाकडे निघालो की आपण बाजुलाच झाडांध्ये हा मध्यम आकाराच खडक दिसतो.छोटा दगडांनी यावर ठोकून पाहिले असता अक्षरक्षः भांडावर ठोकल्या सारखा आवाज येतो.
३. गाडावरील असणा-या तोफा
धक्क्यावरून दिपगृहाकडे जातांना दिपगृहाला लागुनच असणारे एक तळे आहे.ते मागे टाकून दिपगृहाच्या बाजूने पुढे जातांना बुरुजावर जाण्यासाठी पाय-या केलेल्या आहेत.वर पोहचल्यावर आपल्याला दिसते ती गाडयांवर ठेवलेली तोफ.ही तोफ आकाराने मध्यम असून ती आजही सुस्थित आहे.अशाच दोन तोफा लहान टेकडीच्या बाजूला असणा-या बुरुजावर आहेत.
४. दिपगृह
१८६७ मध्ये बांधण्यात आलेले दिपगृह २५ मी उंचीचे असून षट्कोनी आकाराचे आहे.दिपगृहाच्या अर्ध्या उंचीवर दिपगृहाच्या दोन्ही बाजूला एक गधी लागते.दिपगृहाच्या शिखरावरून किल्याचा मनोरम देखावा आपण पाहू शकतो.
५. मजबूत तटबंदी
दिपगृहाच्या बाजूला तटबंदीवर जिथे हेलिपॅड आहे तिथेच खाली एक दरवाजा आहे.हा दरवाजा आपल्याला किल्ल्याच्या बाहेरील समुद्राकडे घेऊन जातो.येथून बाहेर पडल्यावर कडकडे चालतांना किल्ल्ययच्या मजबूत तटबंदीची आणि बुरुजांची कल्पना येते.याशिवाय किल्ल्यावर महादेवाचे एक जुने मंदिर असून गणपति व मारुति चे अलिकडे बांधलेले मंदिरे पण आहे .किल्ल्यावर पाण्याचे टाकेसुध्दा आहे.वेताळाच्या मंदिराच्या दिशेने चालत गेल्यावर तटबंदीध्ये एक द्वार आहे.तिथेच एक छेटी खोली आहे.
६. उंदेरी
खांदेरी किल्ल्याप्रमाणे उंदेरीवर पण दोन कमी उंचीच्या टेकडा आहेत.या ठिकाणी बोटी लागतात तेथून किल्ल्याच्या तटबंदीवर पडझड झालेल्या दगडांवरून चालत जावे लागते.आपल्या सारख्या गिरिदुर्गांवर भटणा-या ट्रेकर्सला किल्ल्यावर तोफांचे दर्शन तसे दुर्लभच मात्र उंदेरीवर तोफांचा खजिनाच बघायला मिळतो.संपूर्ण किल्ल्यावर एकंदर १५ ते १६ तोफा आहेत.किल्ल्यावर तीन पाण्याची टाकी असून त्यातील पाणी पिण्यासाठी मात्र उपयोगी नाही.किल्ल्यावर काही ठिकाणी खूपच झाडी असून वाटेत एका ठिकाणी तर चक्क झाडाच्या खोडांचे दार तयार झालेले आहे.किल्ल्याच्या तटबंदीध्ये एक अगदी लहान दार असून येथून बाहेर गेले असतांना किल्ल्याच्या मजबूत तटबंदीची आणि बुरुजाची कल्पना येऊ शकते.येथे बोट लावून पण आपण किल्ल्यात शिरू शकतो.
गडावर जाण्याच्या वाटा : १. थळ मार्गे
खांदेरी - उंदेरी या जलदुर्गांवर जाण्यासाठी आपल्याला जावे लागते ते म्हणजे अलिबागला.अलिबाग ते रेवस या मार्गावर अलिबागपासून ४ कि.मी अंतरावर थळ नावाच्या गावाचा फाटा लागतो.या फाटापासून २ ते ३ कि.मी वर थळ गाव आहे.अलिबागहून येथपर्यंत येण्यासाठी एस टी बस उपलब्ध आहेत.थळ बाजारपेठे जवळून आपल्याला किल्ल्यावर जाण्यास बोटी
मिळू शकतात.अलिबागहून थळ आगाराकडे जाणा-या एस टी ने ही आपण बाजारपेठेकडे जाणा-या फाटावर उतरून चालत येथ पर्यंत येऊ शकतो.थळ बाजारपेठे जवळच्या समुद्रकिना-याहून दिसणारी दोन बेटे आपले लक्ष सहज वेधून घेतात.यापैंकी रा जवळ असणारा किल्ला म्हणजे उंदेरी व डाव्याबाजूच्या थेडा लांब असणारा किल्ला म्हणजे खांदेरी . खांदेरी किल्ला त्यावर असणा-या दिपगृहामुळे लगेसच लक्षात येतो..थळ बाजारपेठेच्या ठिकाणी सकाळी लवकर येणे सोईस्कर अन्यथा किना-यावरील बोटी मासेमारी करण्यासाठी सकाळी ६ , ६.३० च्या आत समुद्रात जायला निघतात.उशीरा पोहचल्यास मासेमारी करून येणा-या बोटी आपल्याला मिळू शकतात.साधारण मध्यम आकाराच्या ५ ते ६ लोक बसू शकतील अशा होडा संपूर्ण खांदेरी - उदेरी दाखवून परत आणण्याचे होडीवाले भाव सांगतांना मात्र दुप्पट सांगतात.खांदेरी किल्ल्यावर ज्याप्रमाणे बोटींना धक्क्याची सोय आहे ती सोय उंदेरीपर नाही.त्यामुळे उंदेरीवर ओहटीच्या वेळेसच जाता येते.खांदेरवर कधीही गेलेतरी चालते मात्र उंदरीवर भरती ओहटीची वेळ पाळूनच जावे लागते. भरती ओहटीची वेळ काढण्याची सोपी पध्दत म्हणजे आपण ज्या दिवशी किल्ला पाहण्यास जाऊ यादिवशी मराठी पंचागा प्रमाणे जी तिथी असेल तिला ३/४ ने गुणल्यास पूर्ण भरतीची वेळ सांगणारा आकडा मिळतो.उ.दा जर चतुर्थी असेल तर ४ ला ३/४ ने गुणल्यास ३ आकडा मिळतो.म्हणजेच ३ वा रात्री किंवा दुपारी पूर्ण भरती असेल.याचप्रमाणे पूर्ण भरतीच्या वेळेनंतर ठीक ६ तासांनी पूर्ण ओहटीची वेळ असते. तर वरील उ.दा मध्ये ९ वाजता रात्री आणि सकाळी ओहटी असते.थळच्या समुद्रकिना-याहून उंदेरी किल्ला समुद्रात साधारण अडीच कि.मी वर आहे तर खांदेरी किल्ला किना-यापासून तीन साडेतीन कि.मी वर आहे.उंदेरीहून पश्चिमेला पाऊण कि.मी वर खांदेरी आहे.
राहण्याची सोय : किल्ल्यावर सोय नाही..जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.पाण्याची सोय : खांदरीवर पिण्याचे पाण्याचे टाके आहे उंदेरीवर अजिबात नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ : अलिबाग मार्गे२ तास.

No comments:

Post a Comment