रायरेश्र्वर



रायरेश्र्वर



किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः वाई - सातारा
जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी
किल्ल्याची उंची : ४०००फुट

पाचगणीचे टेबललॅन्ड सर्वांनाच माहितच असते मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबललॅन्ड म्हणजे रायरीचे पठार. भोरपासून ८ कि.मी. अंतरावर असणारे हे रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे.दाट झाडी, खोल दर्‍या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट. यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.
इतिहास : शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्र्वराच्या डोंगरावर. मात्र ही घटना काल्पनिक आहे की खरी याबद्दल निश्चित विधान
मांडता येणार नाही.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : रायरेश्र्वरावर पाहण्यासारखे फार काही नाही. रायरेश्र्वराचे पठार हे ५ ते ६ कि.मी. पसरलेले आहे. त्यामुळे या पठारावरील वर्षाऋतुत पाहण्यासारखे असते. रायरेश्र्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर लक्षात येत नाही. पठारावर अलिकडेच गावं वसलेली आहेत. पठारावर भात शेतीचे प्रमाणही मोठे आहे. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्र्वर, कोल्हेश्र्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर येथून दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा : रायरेश्र्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर गावं गाठावे.
१.
टिटेधरण कोर्लेबाजूने

पुण्याहून भोरमार्गेआंबवडे गाठावे. तेथून टिटेधरण कोर्लेबाजूने
रायरेश्र्वरावर जाता येते. वेळ साधारण ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड
आहे.


२.
भोर-रायरी मार्गे


भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी अकरा व सायंकाळी ६ वाजता
(मुक्कामाची) गाडी येते. याच वाटेला सांबरदर्‍याची वाट म्हणून देखील
संबोधतात. या वाटेने रायरेश्र्वर गाठण्यास दोन तास लागतात.

३. केजंळगडावरुन केजंळगडावरुन सूणदर्‍याने किंवा श्र्वानदर्‍याने सुध्दा रायरेश्र्वरला जाता येते. राहण्याची सोय : रायरेश्र्वरावर मंदिरात किंवा गावात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय : आपण स्वतः करावी. पाण्याची सोय : बारामही उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६