भीमाशंकर



भीमाशंकर



किल्ल्याची उंची : ३५००
फूटकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः भीमाशंकर
जिल्हा : रायगड
श्रेणी : कठीण

भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग. सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर वसलेले एक पवित्र देवस्थान. भीमाशंकरचा आजुबाजूचा प्रदेश हा अतिशय घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. येथे महाराष्ट्र सरकारचे अभयारण्य आहे.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :मंदिर : भीमाशंकरचे मंदिर १२०० ते १४०० वर्षापूर्वीचे असून त्याची बांधणी हेमाडपंथी पद्धतीचे आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिराच्या बाह्यभागात सिंहासनाधिष्ठीत देवता व त्यांवर छत्रचामर ढाळणारे त्यांचे सेवक यांच्या मूर्ती आढळून येतात. देवळासमोरच १७२९ सालातील धातूची एक प्रचंड घंटा लटकवलेली आहे. मंदिराच्या आवारात ५ ते २० फूट उंचीची दीपमाळ आहे. या दीपमाळेवर एक शिलालेख आढळतो. पंढरपूरला चंद्रभागा म्हणून ओळखल्या जाणा-या नदीचे नाव भीमा आहे. या भीमेचा उगम याच भीमाशंकरच्या डोंगरावर आहे.नागफणीचे टोक : घाटाच्या रस्त्याने वर आल्यावर एक तळे लागते. या तळ्याच्या उजव्या बाजूने वर जाणारी वाट आपल्याला हनुमान मंदिराकडे घेऊन जाते. मंदिरावरून सरळ वर जाणा-या वाटेने आपण नागफणीच्या टोकापाशी येऊन पोहोचतो. येथून समोरच उभा असणारा पेठचा किल्ला,पदरचा किल्ला,पेब आणि माथेरानचे पठार दिसते. या निसर्गसौंदर्याच्या दालनातून बाहेर पडताना निसर्गावर नितांत प्रेम करणा-या समर्थांच्या ओळी आठवतातद्रुमलता संमता गुणमालते। सुख मनी सुमनी मन रातले॥ परम सुंदर ते खग बोलती। गमतसे वसती कमलापती ॥भीमाशंकर : राम मंदिराच्या डाव्या बाजूने एक पाण्याची वाट खाली उतरते. या वाटेने सरळ गेल्यास आपण घनदाट जंगलात प्रवेश करतो. पुढे २५ मिनिटानंतर एक मंदिर लागते. या मंदिरापासून डावी कडे उतरणारी वाट आपणांस पाण्यामुळे तयार झालेल्या पिंडी कडे घेऊन जाते. यालाच गुप्त भीमाशंकर असे म्हणतात. पावसाळ्यात येथे फार मोठा धबधबा तयार होतो.
गडावर जाण्याच्या वाटा : भीमाशंकरला जाण्यासाठी मुंबईहून कर्जतला यावे.पुणेकरांनी स्वारगेटवरून एस.टी. अथवा ट्रेनने कर्जत गाठावे. कर्जतहून खांडस या गावी यावे.खांडस ते कर्जत सुमारे ३४ कि.मी. चे अंतर आहे. कर्जतहून खांडसला बसने अथवा रिक्षेने येण्याची सोय होते. खांडस गावातून शिडी घाट आणि गणेश घाट या दोन्ही वाटांनी भीमाशंकर गाठता येते
१.
गणेश घाट : खांडस गावातून दोन कि.मी अंतरावर एक पूल लागतो. या पुलापासून उजवीकडे जाणारी कच्च्या रस्त्याची वाट गणेश

घाटाची आहे. ही वाट अत्यंत सोपी आहे. या वाटेने तासभराच्या अंतरावर एक गणेशाचे मंदिर लागते. या वाटेने वर जाण्यास ६ ते ७ तास लागतात.

२.
शिडी घाट : पुलाच्या डावीकडे जाणारा रस्ता आपणास गावात घेऊन जातो. गावातून विहिरीच्या डाव्या बाजूने जाणारी वाट ही शिडी घाटाची आहे. ही वाट सर्व वाटांमध्ये अवघड आहे. पावसाळ्यात ही वाट फारच निसरडी होत जाते. या वाटेने दीड तासांत ३ शिडा लागतात. तीस-या शिडी नंतर अर्ध्या तासात एक वाडी लागते. या वाडी मध्ये 'पुंडलिक हंडे' यांचे घर आहे. वाडी पासून वर चढत गेल्यावर एक झाप लागते. या ठिकाणी गणेश आणि शिडी घाटातील वाटा एकत्र येतात. येथे चहा-पाण्याची चांगली सोय होते. इथून पुढे दीड तासांत आपण एका तळ्यापाशी पोहचतो. या तळ्यापासून डावीकडे जाणारी वाट आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते. वाहनांची वाट : भीमाशंकरला जाण्यासाठी वर गावापर्यंत डांबरी सडक बांधलेली आहे. या साठी पुणे-तळेगाव-चाकण मार्गेभीमाशंकरला पोहचावे


राहण्याची सोय : भीमाशंकर गावा बाहेर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे हॉटेल आहेत. गावात घरगुती पण महागडी अशी रहाण्याची सोय होते. पावसाळ्यात मात्र रहाण्याची गैरसोय होते.जेवणाची सोय : भीमाशंकरला जेवणासाठी हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय : विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : गणेश घाट - ६ ते ७ तास. शिडी घाट - ४ ताससूचना : गणेश घाट सोपा. शिडी घाट कठीण.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६