अहिवंत





किल्ल्याची उंची : ४०००
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः -सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम

अहिवंत किल्ला अजंठा सातमाळ विभागात येतो.त्यामुळे नाशिकमार्गेअथवा मनमाडमार्गेया किल्ल्यावर जाता येते.गुजरातहून सापूतारा मार्गेदेखील जाता येते. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
अहिवंत गडाचा माथा फार मोठा आहे.संपूर्ण माथा फिरण्यास १ दिवस लागतो.किल्ल्याच्या सोंडा पूर्व, पश्चिम ,वायव्य आणि ईशान्य कडे मोठा प्रमाणात पसरलेल्या आहेत.किल्ल्याच्या इशान्य बाजूस एक गुहा आहे.पण ती राहण्यास अयोग्य आहे.दक्षिण बाजूला असणा-या कडामध्ये एक गुहा आहे.ती राहण्यास योग्य आहे.गुहेपासून १० मिनिटावरच पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.दरेगावच्या बाजूने किल्ल्यावर पोहचल्यावर आपल्याला दोन पडक्या दरवाजांचे अवशेष दिसतात.आजुबाजुला अनेक मोठया पडक्या वाडांचे अवशेष पडलेले आहेत.यावरून किल्ला एक मोठे लष्करीय ठाणे असावे असे वाटते.अनेक ठिकाणी महादेवाच्या पिंडीपण आढळतात.याबाजूच्या वाटेने किल्ल्यावर येतांना अनेक गुहा कोरलेल्या आढळतात.सस्थितिला यांचा उपयोग मात्र गोठासाठी होतो.किल्ल्यावर फिरतांना दोन ते तीन पाण्याची तळी आढळात.एका मोठातळ्यापाशी देवीची एक मोठी मूर्ती आहे.ही मूर्ती सप्तश्रुंगी देवीच्या मूर्तीशी साम्य असल्यासारखी दिसते.
गडावर जाण्याच्या वाटा :
१. नाशिकमार्गे
नाशिकमार्गेवणी गाठावे.वणीहून नांदुरी रस्त्यावरुनच किल्ल्याचे दर्शन होते.वणी नांदुरी रस्त्याच्या अलिकडे १ कि.मी अंतरावर एक ठळक वाट डावीकडे असणा-या डोंगरसोंडे पर्यंत जाते.डांबरी रस्त्यापासून येथपर्यंत येण्यास १ तास पुरतो.डोंगरसोंडेवर चढून गेल्यावर आपण एका खिंडीत पोहचतो. खिंडीतून पलिकडे जाणारी वाट दरेगावात जाते तर समोर जंगलात शिरणारी वाट थेट गडाच्या पाय-यांपाशीघेऊन जाते.खिंडीपासून गडावर जाण्यास १ तास पुरतो.
२. पिंपरीअचला मार्गे
दुसरी वाट जरा लांबची आहे.वणीहून पिंपरीअचला मार्गेपिंपरीपाडात पोहचावे.पिंपरीपाडातून समोरच्या डोंगरसोंडेवरील मंदिरापर्यंत जावे.येथून डावीकडे जाणारी वाट अचला किल्ल्याकडे तर उजवीकडे जाणारी वाट बेलवाडीत उतरते.येथून बेलवाडी गाठण्यास अर्धा तास लागतो.बेलवाडीतून गडावर जाण्यास ठळक वाट आहे.या वाटेने किल्ल्यावर पोहचण्यास २ तास लागतात.
जाण्यासाठी लागणारा वेळ : दरेगावमार्गेअडीच तास,बेलवाडीमार्गे२ तास.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६