किल्ले बिरवाडीबिरवाडीकिल्ल्याची उंची : १२००फूट.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः रोहा
जिल्हा : रायगड
श्रेणी : सोपी

रोह्याच्या अवचितगडा पासून सुरू झालेल्या डोंगररांगेत घोसाळगड,तळगड,मानगड कुर्डुगड,बीरवाडी असे अनेक छोटेछाटे किल्ले आहेत.इतिहासात फारसा कुठे उल्लेख नसलेला बीरवाडीचा किल्ला रोह्यापासून १८ कि.मी अंतरावर आहे.स्वतचे वाहन असेलतर १ ते २ तासात किल्ला सहज पाहून होते.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गावातून किल्ल्यावर जातांना वाटेतच भवानी मातेचे प्रशस्त मंदिरलागते.मंदिरापर्यंत जाण्यास सुमारे १०० बांधलेल्या पाय-या आहेत.सध्या देवळाच्याजीर्णोध्दाराचे काम चालू आहे.देवळाच्या प्रांगणात तोफ ठेवलेली आहे.मंदीराच्यामागील बाजूस शिवरायांचा ६ फुटी पुतळा उभा आहे.येथून थोडे वर चढल्यावरआपण एका सुटावलेला बुरूजापाशी येऊन पोहचतो.बुरुजापासून एक वाटउजवीकडे वळते.ही वाट संपूर्ण किल्ल्याला वळून गडावर पोहचते.वाटेत एकाठिकणी खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे त्याला
'घोडाचे टाके'म्हणतात.किल्ल्याचे वैशिष्ट असे की किल्ल्याच्या चहुबाजूस तटबंदी विरहीत बुरुजआहेत.गडाच्या या मागील बाजूस गडाचे सुबक असे प्रवेशद्वार आहे.आजही हेब-यापैकी शाबूत आहे.येथून थोडेवर गेल्यावर आपण थेट किल्ल्यातच प्रवेश करतो.गडमाथ्यावर पडक्या वाडाचे अनेक अवशेष आहेत.किल्ल्यावर अनेकपाण्याची टाकी आढळतात.गडमाथा फारच निमुळता असल्याने तो फिरण्यास अर्धातासपुरतो.

गडावर जाण्याच्या वाटा : किल्ल्यावर जाण्याचा एकच मार्ग आहे.तो बिरवाडी गावातून जातो.
रोहा मुरुड मार्गावर चणेरा नावाचे गाव आहे.रोह्यापासून १८ कि.मी वर तर मुरुड
पासून ५ कि.मी वर चणेरा गाव आहे.चणेरा गावापासून बिरवाडी गाव ५ किमी वर
आहे.बिरवाडी हे पायथ्याचे गाव आहे.गावातून किल्ल्यावर जाण्यास पायवाट
आहे.बिरवाडी गावातून किल्ला गाठण्यास अर्धा तास लागतो.

राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही मात्र बिरवाडी गावात असणा-या मंदिरात २० लोकांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय : जेवण आपण स्वतः घेवून जावे. पाण्याची सोय : गडावर बारमही पिण्याच्या पाण्याचे तळे आहे. जाण्यासाठी लागणारा वेळ : बिरवाडी गावातून अर्धातास .

No comments:

Post a Comment