विजयदुर्ग


विजयदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे.या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात.याच्या तीन बाजु पाण्याने घेरलेल्या आहेत.या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत.एक पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.एकेकाळी या किल्ल्याचे किल्लेदार कान्होजी आंग्रे व तुळोजी आंग्रे होते.

मुंबईहून अंदाजे ४३० कि.मी. दूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग वसला आहे.आम्हाला मालवणहून येथे पोहचण्यास एक तास पंचेचाळीस मिनीटे लागली. १७ एकर परीसर विजयदुर्गने व्यापला आहे. या किल्ल्याची भिंत समुद्रापासून ३६ मी. उंच आहे. विजयदुर्गच्या पूर्ण बांधकामात जांभ्या दगडाचा वापर केला आहे.



Video चालू होण्यास थोडा वेळ लागतो.

इतिहास

विजयदुर्गची बांधणी शिलाहार राजा भोज याने केली. १२०८ च्या दरम्यान या किल्ल्याची बांधणी झाली असावी. त्यानंतर इ.स. १४३१ पर्यंत विजयदुर्ग, यादव राजे आणि विजयनगरच्या ताब्यात राहीला. इ.स. १४३१ मध्ये हा किल्ला बहमनी साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर १६५३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहा कडून जिंकून घेतला. १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे या शूर मराठी सरदाराने विजयदुर्गला पहिले नाविक तळ उभारले.



किल्ल्या वरील प्रेक्षणिय स्थळे

>महादरवाजा
>तोफखाना
>दारुभंडार
>भुयारी मार्ग
>सदाशिव बुरुज
>खलबतखाना
>अश्वशाळा
>सदर
>गोविंद बुरुज
>चोरदरवाजा

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब