किल्ले चांभारगड



चांभारगड



किल्ल्याची उंची : १२०० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः रायगड
जिल्हा : रायगड
श्रेणी : मध्यम

रायगडाच्या आजूबाजूला असणा-या डोंगररांगावर अनेक किल्ले आहेत. यांत प्रामुख्याने लिंगाणा,काळदुर्ग,सोनगड व चांभारगड यांचा समावेश होतो.यांचा उपयोग केवळ घाटमथ्यावर नजर ठेवण्यासाठी व टेहेळणीसाठी होत असावा. चांभारगड हा महाडपासून हाकेच्या अंतरावर आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे ूगडमाथा म्हणजे एक छोटेसे पठारच आहे. पठारावर थोडेफार घरांचे
अवशेष आहेत तर पठाराच्या खालच्या डोंगराच्या पट्टीवर पाण्याची एक दोन टाकी आहेत.या टाक्यांच्या बांधणीवरुन हा गड फार पुरातन असावा असा अंदाज बांधता येतो. याखेरीज गडावर पाहण्याजोगे काहीच नाही.अर्ध्या तासात संपूर्ण गडफेरी आटपते गडावर जाण्याच्या वाटा : गडावर जाण्यासाठी महाड गाठावे.महाड-पोलादपूर हायवे ओलांडून पायथ्याच्या चांभारखेड गावात पोहोचावे.महाड एस.टी. स्थानकापासून येथे जाण्यास २० मिनिटे लागतात. या खिंडीतून पाऊण तासाच्या चालीनंतर आपण माथ्याच्या
कातळकडापाशी पोहोचतो.कातळकडा डावीकडे ठेवून थोडे पुढे जावे.नंतर वर जाणारी वाट पकडून १५ मिनितांत गडमाथा गाठता येतो.राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.जाण्यासाठी लागणारा वेळ : महाड गावातून एक तास

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६