कण्हेरगड
किल्ल्याची उंची : ३५८२ फूट.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम

अजंठा सातमाळ रांग म्हणजे नाशिक आणि गुजराथच्या सीमेवरील तटबंदीच होय.याच रांगेत आडवाटेवर एक किल्ला आहे त्याचे नावं कण्हेरगड.इतिहास प्रसिध्द असा हा कण्हेरगड आजमितिस बराच दुर्लक्षित आहे. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडावर पोहचल्यावर खडकात खोदलेला बुरुज दिसतो.येथून थोडे पुढे गेल्यावर एक नेढं दिसते.नेढाच्या समोरून जाणारी वाट थेट गडमाथ्यावर घेऊन जाते.गडमाथा बराच प्रशस्त आहे.संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो. गडमाथ्यावर पाण्याची ६ ते ७ टाकी आहेत महादेवाची पिंड आहे.धोडप किल्ल्याच्या समोर तोंड येईल अशी गुहा एका कडात खोदलेली आहे.गडावर वाडांचे काही अवशेष आढळतात.गडाचे दुसरे टोक हे धोडपच्या माची सारखेच आहे.गडावरून पश्चिमेला सप्तश्रुंगी,मार्कंडा ,रवळ्या जवळ्या , धोडप कंचना ,हंडा अशी संपूर्ण सातमाळ रांग दिसते.
कण्हेरगडाचा इतिहास

गडावर जाण्याच्या वाटा : कण्हेरगडावर जाण्याचे दोन मार्ग आहेत.हे दोनही मार्ग कण्हेरगड आणि समोरचा डोंगर यांच्या खिंडीत एकत्र येऊन तिथूनच वर जातात.
१. नाशिक - नांदुरी मार्गे
नाशिकवरून नांदुरी गाव गाठावे.नांदुरीतून कळवणला जाणा-या रस्त्यावरच नांदुरी गाव आहे.नांदुरी पासून ६ कि.मी अंतरावर आठंबा गाव आहे.या गावातून २ कि.मी अंतरावर असणा-या 'सादडविहीर' या गावात यावे. सादडविहीर गावातून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट आहे.या गावातून खिंड गाठण्यास अर्धा तास लागतो.
२. नाशिक कळवण मार्गे
नाशिक कळवण मार्गेओतूर गाठावे.ओतूर मधून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणारे कण्हेरवाडी गावात यावे.कण्हेरवाडी गावातून वर सांगतिलेली खिंड गाठण्यास १ तास लागतो.या दोन्ही वाटा वर सांगितलेल्या खिंडीत येऊन मिळतात. गडावरून येणारी एक सोंड सुध्दा याच खिंडीत उतरते.ती सोंड पकडून एक तासाच्या खडा चढणी नंतर आपण गडमाथ्यावर पोहचतो.वाट निसरडी आहे त्यामुळे जरा जपूनच चढावे लागते.
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे यात ५ लोकांची राहण्याची सोय होते.जेवणाची सोय : आपण करावी.पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : सादडविहीर गावातून दीड तास.कण्हेरवाडीतून २ तासजाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतुंमध्ये

No comments:

Post a Comment