कोरीगड - कोराईगड


कोरीगड - कोराईगड
किल्ल्याची उंची : फूट किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांगः लोणावळा जिल्हा : पुणे श्रेणी : सोपी
मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे त्याचे नावं आहे कोरबारस मावळ.याच मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले
येतात.लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणा-या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे.हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या
सःस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे. या भागातील किल्ले पहावयाचे असल्यास तीन ते चार दिवसांची सवड हवी. कोरीगड,
घनगड, सुधागड आणि सरसगड या सारखा सुंदर ट्रेकही या भागात आपल्याला करता येतो.

इतिहास : या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही. १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग-तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला .गडावर मोठा प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली . या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही ही इंग्रजांना
मिळाला. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पेठ-शहापूर गावातून कोराईगड एका भिंतीसारखा भासतो. गडमाथा म्हणजे एक भलेमोठे पठारच आहे.गडाची तटबंदी साधारणतः दीड किलोमीटर लांबीची आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरा घालता येतो. पेठशहापूरच्या वाटेने वर येतांना मार्गात अनेक गुहा व पाण्याची टाके आणि श्री गणेशाची मूर्ती लागते. गणेशदरवाज्याने अर्थात पेठ शहापूरच्या वाटेने वर आल्यावर समोरच वाडांचे अवशेष आढळतात. समोरच पठारावर दूरवर कोराईदेवीचे मंदिर आहे .मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे. कोराईदेवीच्या मूर्तीची उंची साधारणतः चार फूट आहे. गडावर दक्षिणेकडच्या बाजूस अनेक बुरूज आहेत. गडावर आजही सहा तोफा आहेत. त्यापैकी सर्वात मोठी 'लक्ष्मी ' तोफ कोराईदेवीच्या मंदिराजवळ आहे.याचप्रमाणे गडावर आणखी दोन मंदिरे आहेत. गडावर दोन विस्तीर्ण तळी आहेत. तळ्यांच्या पुढे आणखी दोन गुहा आहेत. येथेच
शंख-चक्र -गदा-पद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे. गडावरून समोरच नागफणीचे टोक, तुंग, तिकोना, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा आणि माणिकगड असा सर्व परिसर दिसतो.गडावर जाण्याच्या वाटा : सःस्थितीला गडावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत.
१.
पेठ-शहापूर : कोरीगडला जाण्यासाठी लोणावळ्याला यावे. येथून आय.एन.एस. शिवाजीमार्गेआंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी बस पकडावी, किंवा सहारा प्रकल्पाकडे जाणारी बस पकडावी आणि भुशी धरणाच्या पुढे, आय.एन.एस. शिवाजीच्या पुढे २२ कि.मी. वरील पेठ-शहापूर गावात उतरावे. या गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला पाय-यांपाशी घेऊन जाते. पाय-यांच्या सहाय्याने वीस मिनिटांत गडावर पोहचता येते.

२.
आंबवणे गाव : कोरीगडला जाण्यासाठी आंबवणे गावातूनही जाता येते. ही वाट मात्र जरा अवघड आहे. या वाटेने जाण्यासाठी लोणावळ्याहून भांबुर्डेकडे अथवा थेट आंबवणेकडे जाणारी बस पकडावी. गावातून अर्ध्या तासात गडावर जाता येते. राहण्याची सोय : गडावरील मंदिरात राहण्याची सोय होते.


जेवणाची सोय : किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वतःच करावी.पाण्याची सोय : गडावर नाही, गडावर दोन तळी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पेठशहापूर मार्गेगडावर येणार्‍या वाटेवर दरवाजाच्या अलीकडे एक टाके आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हे वापरावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : पेठशहापूर मार्गेअर्धा तास.

No comments:

Post a Comment