किल्ले कुर्डुगड -विश्रामगड



कुर्डुगड -विश्रामगड


किल्ल्याची उंची : २०२० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः रायगड
जिल्हा : रायगड
श्रेणी : सोपी

पुण्यापासून ९० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला पाहण्यासाठी उत्तम कालावधी म्हणजे आक्टोंबर ते फेब्रुवारी. आक्टोंबर मध्ये पावसाळा नुकताच ओसरलेला असतो सर्वीकडे हिरवेगार झालेले असते.अशा वातावरणात कोकणातील किल्ले पाहण्याची मजा काही औरच असते.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे किल्ल्याच्या पायथ्याशी कुर्डाई देवीचे मंदिर आहे.किल्ल्यावर जातांना वाटेतच एक भग्रावशेष झोलेला दरवाजा आढळतो.किल्ल्याचा सर्वोध माथा म्हणजे एक सुळकाच होय.दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच १ मी उंचीची हनुमान मूर्ती आपल्या नजरेस पडते.मूर्तीच्या मागच्या बाजूस एक निसर्गनिर्मीत घळ आहे.यात १०० ते १५० माणसे सहज बसू शकतील.किल्ल्यातच दोन भलेमोठे सुळके आहेत आणि हा भलामोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय.सुळक्याला पूर्ण फेरी मारता येते पण काही ठिकाणी वाट पूर्णपणे ढासळलेली आहे.किल्ल्यावर पाण्याची एक दोन टाकी आहेत.किल्ल्यावरुन संपूर्ण कोकण परिसर न्याहळता येतो.कुर्डुगडाचे स्थान हे फार
मोक्याच्या ठिकाणी आहे.पूण्याहून कोकणात येणा-या ताम्हणी घाटाच्या वेशीवरच हा किल्ला आहे.किल्ल्याच्या मागच्या बाजूस रायगड,कोकणदीवा हे किल्ले आहेत.संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो.गडावर जाण्याच्या वाटा : किल्ल्यावर जाण्याचे मुंबईकडून आणि पुण्याकडून दोन्ही बाजूने मार्ग
आहेत.

Comments

Popular posts from this blog

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक