अचला




किल्ल्याची उंची : ४०४० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः -सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम

अचला किल्ला हा अजंठा सातमाळ विभागात येतो.त्यामुळे नाशिकमार्गेअथवा मनमाडमार्गेही या किल्ल्यावर जाता येते.गुजरातहून सापूतारा मार्गेदेखील जाता येते. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गडमाथा अत्यंत अरुंद आहे त्यामुळे गडावर फारसे पाहण्यासारखेही काही अवशेष नाहीत.गडावर पाण्याची एक दोन पाण्याची टाकी आहेत.याशिवाय भग्रावस्थेत असणारे छोटेसे मंदिर आहे. गडमाथा फिरण्यास साधारण २० मिनिटे पुरतात. गडावर जाण्याच्या वाटा :
१. नाशिकमार्गे
नाशिकमार्गेवणी गाठावे.वणीहून एस.टी ने पिंपरी-अचलाकडे जायचं.हे अंतर साधारण १२ कि.मी चे आहे.अचला गावात उतरून पिंपरीपाडा गावाकडे सरळ चालत निघावे.हे अंतर अर्धा तासाचे आहे.पिंपरीपाडा हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गावं आहे.गावातून समोरच्या डोंगरसोंडेवरील खिंडीत एक छोटेसे देऊळ दिसते त्याच्या दिशेने वर चढत जावे.देवळापासून डाव्याबाजूला दिसणारा किल्ला अचला तर उजवीकडे धावत जाणारी सोंड थेट अहिंवतला जाऊन मिळते.डाव्या बाजूने किल्ल्याच्या नाकाडावरून अंगावर येणारी वाट पकडावी.पुढे ही वाट कडा डावीकडे ठेवून त्याला चिटकून वर जाते.पुढे कातळात खोदलेल्या पाय-या लागतात.खिंडीतून माथा गाठण्यास दीड तास पुरतो.
२. बेलवाडी
दुसरी वाट बेलवाडी गावातून किल्ल्यावर येते.बेलवाडी हे अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे गाव आहे.ही वाट पिंपरीअचला गावामधून येणा-या वाटेला देवळापाशी येऊन मिळते. राहण्याची सोय :
किल्ल्यावर नाही. जेवणाची सोय : आपण स्वतः करावी. पाण्याची सोय : फेब्रुवारीपर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ : पिंपरी अचलामार्गेअडीच तास.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६