पेडगाव लुटले


रायगडावर महाराजांचा अतिविराट राज्याभिषेक सोहळा पार पडला. एखाद्या पातशाहीलाही लाजवेल असा भव्य दिव्य सोहळा पार पडला
जे जे सत्पुरुष, संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, जोगी, तापोधिनी यांना चार महिने रुचकर भोजन झाले, जेव्हा त्यांना निरोप देण्याची वेल
आली तेव्हा उचित सत्कार करून द्रव्य, अलंकार, भूषणे, वस्त्रे दान केली. अष्ट प्रधानांस लक्ष लक्ष होण् बक्षीस देऊन त्याखेरीज एक एके हत्ती घोडा ,वस्त्रे अलंकार असे देणे केले संपूर्ण खर्चाची संख्या १ कोट ४२ लक्ष होन झाली

स्वराज्याच्या तिजोरी थोडीशी रिती झाली होती या खर्चाची भरपाई करणे गरजेचेच होते कारण आपल्या मालकीचे काहीच नाही जे काही आहें ते स्वराज्याचे हि आमच्या राज्याची नियत होती म्हणून डाव मांडणे सुरु झाले स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक बातमी घेऊन आले होते

" राजं पक्की खबर हाय जी पेडगावच्या गढी मध्ये अफाट खजाना हाय , त्या औरंगजेबास खंडणी चालली आहें पण डोळे फिरत्याल असा खजाना हाय अन त्यो बहादूरखान कोकलताश त्यो घीउन निघालाय सा "

बेत ठरला पेडगाव लुटण्याचा

काही हजाराचे सैन्य पेडगावच्या त्या गढीवर चालून गेले बहादूर खान जागा झाला त्याने आपल्या गढीतील सर्व सैनिकांना गढी बाहेर पाठवून मराठ्यांशी
दोन हात करावयास सांगितले दिन दिन दिन चा उसना आव आणत ते मोघल सैन्य मराठ्यांच्या दिशेने चालून गेले

पण काय चमत्कार

दुश्मनाचा वार कधी पाठी न घेणारे म्हणून ख्याती मिळवलेले हे मरहट्टे चक्क रणांगण सोडून पळत होते वाघांनी कधी माघारच घेतली नव्हती पण हि वेळ पहिल्यांदा ओडवली हे पाहून मोघली सैन्याला जास्तीच चेव आला त्यांनी मराठ्यांचा पाठलाग सुरु केला हि स्पर्धा १-२ मैलांवर हि पळापळी गेली
थकले भागलेले मुघल सैन्याने एकवार मागे वळून बघितले तर गढीतून धुराचे प्रचंड लोट आस्मान घाटत होते त्यांना काही कळेना नक्की झाले तरी काय
आणी मागून येणाऱ्या वादळाचा वादळाचा आवाज त्यांना येऊ लागला हर हर महादेवची दुदंभी कान फाडू लागली चवताळलेल्या वाघाचे रूप जसे अगदी तसेच मराठे पुन्हा या मुघल फौजेवर चालून येत होते

इकडे गढीच्या मागच्या अरण्यात लपून बसलेल्या मराठ्यांनी गढी लुटली होती प्रतिकार मुळात झालाच नव्हता कारण सगळे शिपाई गढीच्या पुढच्या तोंडावर आलेल्या मराठ्यांवर चालून गेले होते चालून कसले गेले त्यांना मुर्ख बनविले होते सबंध द्रव्य, घोडे , हिरे ,जव्हार , उंची वस्त्र हत्यारे सर्व सर्व लुटण्यात आले होते आणी गढीला आग लावून दिली

इकडे मराठ्यांनी मुर्ख बनविलेल्या या मोघली तुकडीचा नि:पात केला

सगळे द्रव्य रायगडावर महाराजांपुढे पेश केले गेले लुटीची गिणती केली असता लुटेची एकूण रक्कम एक कोटी एवढी आढळली या लुटीमुळे राज्याभिषेकाच्या वेळी केल्या गेलेल्या प्रचंड खर्चाची जणू परतफेडच झाली होती

या वरून सर्व पातशाहिंनी एक सबब घेतला
ये मरहट्टे कभी मैदान छोड के भागते नही बल्की भगाभगाकर मारते है

Comments

  1. उत्तम लेख आहे...

    ReplyDelete
  2. लेख वाचून समर्थांचे श्लोक आठवले छान लिहिले आहे.
    (निखिल भि.सहाने)

    यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
    पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

    आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
    सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी!!
    -समर्थ रामदास

    ReplyDelete
  3. kharacha khup chan, apratim lekh aahe.

    ReplyDelete
  4. sir
    very nice blog...
    can u hlep me.....
    pl give your mobile number
    m crate to mohatadevi.blogspot.com
    pl see and reply me......

    ReplyDelete
  5. Anonymous04:14

    ati sundar mitra

    ReplyDelete
  6. mast lekh aahe ha tumcha . hi link mee majhya mitran patvu shakto ka???

    ReplyDelete
  7. Santosh22:13

    Apratim....Apratim....!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब