मोरागड


मोरागड




किल्ल्याची उंची : ४४५०
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः सेलबारी-डोलबारी
जिल्हा : नाशिक
श्रेणी : सोपी
भौगोलिक दृष्टया पाहिले तर मोरागड हा मुल्हेर किल्ल्याचाच एक भाग आहे. मोरागड म्हणजे मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच
होय.

इतिहास : इतिहासात या गडाचा स्वतंत्र असा उल्लेख करणरे एकही कागदपत्र उपलब्ध नाही.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडमाथ्यावर जाताना दुसर्‍या दरवाजाच्याजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय.माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत.एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाडांचे अवशेष आपले
अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून मुल्हेरचे पठार व माची,हरगड,मांगी-तुंगी,न्हावीगड,तांबोळ्या,हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसतेगडावर जाण्याच्या वाटा : मोरागडावर जाणारी एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावरून जाते.मुल्हेरमाचीवर
असणार्‍या सोमेश्र्वर मंदिरापासून वर जाणारी वाटसुद्धा मोरागडावर जाते.पुढे या दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात. मुल्हेरगडाच्या
बालेकिल्ल्यावर भडंगनाथाच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर
गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून मोरागडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. गडावर जातांना तीन
दरवाजे लागतात.

राहण्याची सोय : मोरागडावर राहण्याची सोय नाही मात्र मुल्हेर किल्ल्यावर आपण राहू शकतो.
जेवणाची सोय : आपणं स्वतः करावी.पाण्याची सोय : पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत,मात्र गडावर उन्ह्याळ्यात पाणी नाही.जाण्यासाठी लागणारा वेळ :४५ मिनिटे मुल्हेर पासून.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६