शिवजन्माची घटका


शास्त्रीबुवांनी बोटे मोजली घटकापाळांचे गणित मोजले .कुंडलीची घरे ग्रह धरू लागली. कुंडली मांडून होताच शास्त्रीबुवांनी जिजाबाईंकडे पाहिले.

जिजाऊ म्हणाल्या - "शास्त्रीबुवा संकोच न करता स्पष्टपणे सांगा या पोराच्या वेळी दिवस गेले आणी घरादाराचा थारा उडाला कुणाचा कुणाला मेळ लागेना. रक्ताच्या नात्याने वैर पत्करलं, जहागिरीवर सोन्याचे नांगर फिरले, आजोबांचे छत्र हरले (लखुजी जाधव ज्यांचा विजापुरी दरबारात खून करण्यात आला), या मितीला या पोराचे वडील शत्रूमागे धावत आहेत. याचा थोरला भाऊ लहान त्याची ही या वणवणीतून सुटका नाही. सा-या मुलखाची अन्नान दशा झाली आहे. परमुलखात परठिकाणी ना माहेरी ना सासरी मी या मुलाला जन्म देत आहे. पोटात असता ही त-हा आता त्याच्या पायगुणाने आणखी काय धिंडवडे निघणार आहेत. तेवढे सांगून टाका"

हे ऐकून सा-यांचे चेहेरे व्यथित झाले. शास्त्रीबुवा मात्र शांतच होते त्यांच्या चेह-यावरील लवलेश बदलला नाही
त्यांनी भविष्य सांगण्यास सुरवात केली, राणीसाहेब असे अभद्र मनात आणू नये , अशुभाचा मनाला स्पर्श ही होऊ देऊ नका. दुर्भाग्य संपल भाग्य उजाडलं प्रत्यक्ष सूर्य पोटी आला आहे. जिजाऊ खिन्न पणे हसल्या.
"मुलाची कुंडली सांगताना प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो "

शास्त्री गंभीर झाले ते निश्चल आणि खणखणीत आवाजात बोलू लागले.

"राणीसाहेब असा अविश्वास धरू नका. या शास्त्र्याचं भाकीत कधीही खोटे ठरले नाही. द्रव्य लोभाने नव्हे तर ज्ञानाच्या अनुभवानं, आत्मविश्वासाने मी हे भाकीत केले आहे ते कालत्रयी चुकणार नाही हे मूल जन्मजन्मांतरीचे पांग फेडेल. राणीसाहेब पापाचा घडा भरला आहे.धरित्री त्रस्त झाली आहे देवकी वसुदेव बंदीशाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला. हे कृपा करून विसरू नका"

आपल्या तोंडात साखर पडो. जीजाबाई समाधानाने म्हणाल्या त्यांची नजर कुशीतल्या बाळाकडे गेली. मुठी चोखीत ते शांतपणे झोपी गेले होते. सर्वांच्या चेह-यावर एक प्रकारचे समाधान झळकत होते. जणू शास्त्रीबुवांनी भविष्य सांगत असतानाच या तेजस्वी पुत्राने शिवनेरी जिंकला होता।

लेखनआधार - श्रीमानयोगी

शास्त्रीजींचे भाकीत ऐकून सगळ्यांच्या चेहेऱ्यावर समाधान उमटले ,या तेजस्वी पुत्राने
देखील शास्त्रीजींचे भाकीत खरे ठरवले इतके खरे की
ज्यांना मराठ्यंनी सळो की पळो करून सोडले त्या विजापूर दरबाराचा कवी असतो की फिरंग्यांचा एखादा लेखक. मराठ्यांचा इतिहास अतिशय समर्पक वाक्यात वर्णन करतात. स्वतः औरंगजेब आपल्या राजाचे गुणगान गातो मग हे तर ...........




विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."



दक्षिणदिग्विजय मोहिमेदरम्यान फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये अशी नोंद घेतो

असा हा माझा राजा पण विसरत चाललोय आपण हा ऐतिहासिक वारसा शिवजयंती शिवाय कधीच आठवत नाही महाराज आपणास
जागा हो मराठी माणसा जागा हो





शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Comments

  1. जणू शास्त्रीबुवांनी भविष्य सांगत असतानाच या तेजस्वी पुत्राने शिवनेरी जिंकला होता...........vachatanach angavar kaata Yeto re Keep It Up ........Nice Blog

    ReplyDelete
  2. khup khup chan kam kartoy mitra........jay bhavani jay shivaji.........jay jijau.....jay shambhuraje.!

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Anonymous00:18

    mitra tu 1 ch number aahes tuzya karasathi mazya kadun shubhechya

    ReplyDelete
  5. वा खुपच छान............
    या अश्या काळामुळेच महाराज घडले व जाणता राजा झाले.

    ReplyDelete
  6. afalatun.. punha ekda far chhan watla.. keep it up dosta..!

    ReplyDelete
  7. Anonymous22:29

    मित्रा ब्लॉग एकदम मस्त आहे अगदी डोळ्यासमोर चित्र उभं केलस
    .
    सिद्धार्थ मंडलिक

    ReplyDelete
  8. मित्र तुझ्या ह्या ब्लॉग ला तू जी माहिती लोकांपर्यंत पाठवतो त्या कामाला मानाचा मुजरा.....

    ReplyDelete
  9. मित्रा ब्लॉग एकदम मस्त आहे

    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. vishal said.......
    mi maharashtracha maharashtra maza

    ReplyDelete
  12. मित्र हा लेख लिहिताना एक छोटीशी चूक झालीय.... ती निदर्शनास आणावी म्हणून लिहितोय....
    तुम्ही नमूद केलेय...
    या पोराच्या वेळी दिवस गेले आणी घरादाराचा थारा उडाला कुणाचा कुणाला मेळ लागेना. रक्ताच्या नात्याने वैर पत्करलं, जहागिरीवर सोन्याचे नांगर फिरले, आजोबांचे छत्र हरले...

    चुकीची दुरुस्ती : जहागिरीवर गाढवाचे नांगर फिरले....

    त्याच भूमीवर नंतर दादोजीनी सोन्याचा नांगर महाराजांच्या हातानी फिरवला... आणि भूमी सुजलाम सुफलाम केली...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब