आज झाले महाराज हातावर तुरी देवून पसार १७ ऑगस्ट १६६६


अल्याड जेजुरी
पल्याड सोनोरी
मध्ये वाहते कर्‍हा
पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा

याच पुरंदरला २९ मार्च ला पुरंदरला वेढा पडला दिलेरखानच्या तोफा आग ओकीत होत्या पण रक्तातील गुण निपजत मराठ्यांनी कडवी झुंज दीली मुरारबाजींनी जीवाची बाजी लावून किल्ला लढविला पण किल्लेदार पडला तसा किल्ला ही पडला शिवाय किल्ले वज्रगड जिंकल्यामुळे पुरंदर घेणे मोघलांना शक्य झाले. पुरंदर पडला सर्वत्र सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन राजांनी मुघलांशी तह करायचे ठरवले. पुरंदरचा तह घडला. १६ वर्षात जे कमावले ते सर्व या तहात राजांनी गमावले.

तहानंतर शिवाजीराजे कुतुबशहा आणि आदिलशहाच्या साह्याने मुघलांविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करतील अशी भीती मिर्झा राज्याला होती
म्हणून त्याने बादशाहाला कळविले की शिवाजीला कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. त्यासाठी मी शिवाजीला आपल्या दरबारी पाठवीत आहे. तसे मिर्झाने राजांना तयार केले त्याप्रमाणे ५ मार्च १६६६ रोजी राजे आग्रा येथे जाण्यास निघाले. स्वतःच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त खुद्द औरंगजेबाने त्यांना पत्र पाठवून आमंत्रित केले होते. 'मनात कुठलीही चिंता किंवा शंका न ठेवता मला भेटायला या. आपला येथे सत्कार केला जाईल आणि तुम्हाला पुन्हा दख्खनेत जाण्याची मुभा असेल.' मजल-दरमजल करत शिवाजीराजे १२ मे रोजी तेथे पोचले.
दरबारात महाराजांसोबत हे झाले





परिणाम ठरलेला होता जणू हा दिल्ली दरबारचा रिवाजच होता दगा, आणि राजांना नजरकैदेत ठेवले.
पलायानासाठी महाराजांनी अनेक युक्त्या केल्या ९ वर्षाच्या संभाजी राजांचा हाच राजकारणातील खराखुरा प्रवेश आणि त्यांच्याच मुळे महाराज दिल्लीतून बाहेर पडू शकले
ह्याचे सभासद बखरीतील वर्णन

मागें दिल्लीमध्ये हिरोजी फरजंद पलंगावरी निजला होता. तो चार प्रहर रात्र तीन प्रहर दिवस तैसाच निजला.चौकीचे पोलादखानाचे लोक कोठडीत येऊन पाहतात {तो} राजे शेला पांघरूननिजले.पोर पाय रगडित होता. पोरास लोक पुसतात की राजे आज फार वेळ निजले? पोर म्हणतो की 'शीरदुखते'ऐसे पाहोन लोक जातात. तैसाच तीन प्रहर रोज हिरोजी निजला होता. तों प्रहर दिवस असतां हिरोजी उठोन ,आपलीं पांघरुणे, चोळणा, मुंडासे घालून पोर बरोबरी घेऊन, बाहेर आला चौकीदारांनी पुसिले त्यांस हिरोजीनेसांगितले की शीर दुखते, कोणी कोठडीत जाऊ लागेल त्यास मन करणे. आपण औषध घेऊन येतो " म्हणूनचौकीदारास सांगून दोघे बाहेर गेले. रामसिंगाचे गोटास जाऊन त्यास एकांती वर्तमान सांगोन आपण तेथून निघोनदेशाचा मार्ग धरीला

दहा दिशांनी एक मुखानी एक घोष केला
मरणपाश तोडूनी रानाचा सिंह मुक्त झाला
पंखामधले जागे झाले उड्डाणाचे भान
गरुड भरारीसाठी झाले पुनः खुले आसमान

Comments

  1. Anonymous22:29

    Ek Number........!

    ReplyDelete
  2. Anonymous23:54

    राजा कुठला ह्यो तर आपला महादेवं ईस्वर !

    ReplyDelete
  3. Jai bhavani Jai shivaji

    ReplyDelete
  4. santosh chavhan00:31

    एकदम मस्त माहिती मित्रा धन्यवाद

    ReplyDelete
  5. pratik01:35

    jai bhavani

    ReplyDelete
  6. Maharajana manacha mujara..............

    har har mahadev jai bhawani jai shivaji

    ReplyDelete
  7. Anonymous05:16

    khup chan aahe marajansarkh kaam konich karu shakat nahi. aani maharajanchi jaga konich gheu shakat nahi aani jar ghetalich tar ti fakt Raj Thakrey gheu shaktil.

    ReplyDelete
  8. Anonymous05:17

    Jay Maharashtra

    Jay Bhavani

    Jay Shivaji

    ReplyDelete
  9. अप्रतिम..!
    .
    .
    .
    जय महाराष्ट्र..!!

    ReplyDelete
  10. जय महाराष्ट्र..!!

    ReplyDelete
  11. ViCkY00:54

    Dhanyawad hya apratim blog sathi...
    ani 1 vinanti ki Shivaji Maharaj pramane Sambhaji Maharaj yanchi suddha mahiti uplabdha karavi...

    ReplyDelete
  12. Maharajana Manacha Mujara......!!!!



    jai Bhavani jai shivaji...........

    ReplyDelete
  13. कृपया या पोस्ट चे नाव बदला........आज झाले महाराज हातावर मिठाई देऊन पसार......
    कारण हातावर तुरी देऊन पसार होणारे भरपूर...पण शत्रूच्या हातावर मिठाई देऊन पसार होणारा वीर फ़क़्त एकच राजा शिव छत्रपती.....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब