किल्ले प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासातील एक सुवर्णपानच !
इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले.निरा आणि कोयना नद्यांचे संरक्षण हा यामागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युध्द झाले. अफझलखान वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला.इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.

वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरूजाखालून सरळ जाणार्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येवून पोहोचतो वैशिष्ट म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो.महादरवाज्यातून आत गेल कि उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो,हा बुरूज पाहून परत पायर्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे कूच करायचं.मंदिरात प्रवेश करताच आपणास भवानीमातेची सालंक्रुत प्रसन्न मूर्ती दिसते. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली.या मूर्ती शेजारीच महराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.
हा मंदिर परिसर पाहून बालेकिल्ल्याकडे चालू लागायचं,मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे जात असताना उजव्या हातालाच आपणास समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते,पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येवून पोहोचतो,मंदिरात भव्य शिवलिंग आहे.या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर असून कित्येक महत्वाचे निर्णय ,न्यायनिवाडे,मसलती या सदरेतच झाल्या.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाऊंच्या वाड्याचे अवशेष आहेत.येथे उजवीकडेच बगीचाच्या मधोमध छ.शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता.या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जायचं.या तट्बम्दीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्याचे विहंगम द्रुष्य दिसते.पहिल्यांदा लागतो घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्याचा दिंदी दरवाजा नंतर लागतो रेडका बुरूज पुढे यशवंत बुरूज तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज.
No comments:
Post a Comment