आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत .......



महिने उलटत होते. जीजाबाई पहाटे उठत. स्नान, पूजा अर्चा करत हे आटोपायला सूर्योदय होई. त्यानंतर स्वयंपाक घरात शिधा काढण्यात वेळ जात असे.
जिजाबाईंना गडावर येवून चार महिने झाले होते. दुपारच्यावेळी जीजाबाई आपल्या. महालात झोपल्या होत्या. खाली जमखान्यावर लक्ष्मीबाई काहीतरी शिवीत बसल्या होत्या. दासी जिजाउंचे पाय रगडित होते सहज लक्ष्मीबाईंनी विचारले.
तुम्हाला अपृवाईन काहीस खवस वाटत का ? मी पहाते तुम्ही सांगत नाही जीजाबाई हसल्या. खरं सांगू लक्ष्मीबाई मला खाण्यापिण्याचे काही डोहाळे नाही. वाटायचं घोड्यावरून दौड करावी, तलवार कमरेला लटकवावी. गडाचा गार वारा खूप प्यावा कड्यावर उभे राहून खालची माळवद डोळे भरून पहावीत.
नशिबाने हे सारे डोहाळे माझे पुरविले लक्ष्मीबाई हसल्या त्या उठू लागल्या जिजाबाई म्हणाल्या उठता का ?
आपण विश्रांती घ्या थोडं झोपा बरे वाटेल

खरं सांगू जीजाबाई म्हणल्या, आताशा मला दोन प्रहरी झोपच येत नाही '
ते का

जीजाबाई लाजल्या पोटाशी हात दाखवीत त्या म्हणल्या "हा खेळतो आहे ना """
लक्ष्मीबाई गडबडीने उठल्या त्यांना राहवले नाही गर्भार जिजाऊंचा तेजदार चेहरा कुरवाळून, कान्शिलांवर बोटे मोडून त्या म्हणाल्या

कुठ तरी दृष्ट लागायची बाई तुला असं काही सांगत जाऊ नको झोप जरा. म्हणत लक्ष्मीबाई उठून गेल्या

लेखक - रणजीत देसाई (श्रीमानयोगी)

Comments

  1. very nice . You are providing informative information. Keep it up

    kane

    ReplyDelete
  2. Anonymous02:20

    ya lekhas mazya kadun ''MANACHA MUJARA''

    jai maharashtra...........

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६