शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा अधीर मनाच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला देव देश आणि धर्म रक्षणासाठी खर्ची पडलेले असंख्य ज्ञात अज्ञात मावळे. कित्येक माता भगिनींचे रिते कपाळ या सगळ्यांच्या जखमा आज रायगडावर बुजणार होत्या रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून पिकवलेल्या शेतीचे आज सोने होणार होते आज शिवाजी राजे छत्रपती होणार होते, रायगडावर धामधुमिचे काळ चालू होता. मावळे, नोकरचाकर, राणीवसा, सगळ्यांची धावपळ चालू होती, लोकं आनंदान दमत होते. रायगडावरती राज्याभिषेकाची पूर्व तयारी पूर्ण झाली. धार्मिक विधीला प्रारंभ झाले.ऐशानयाग विधी,मुंज,ग्रह-यज्ञ,प्रतीमादान, सोयराबाई साहेबांसोबत पुनश्च लग्न, सुवर्ण तुला, पुण्यहवाचन असें सर्व धार्मिक विधी यथासांग पार पडले.रायगड दुमदुमत होता हा आनंद होता सार्वभौमत्वाचा हां आनंद होता स्वातंत्र्याचा. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट झाली, राजवाड्यामध्ये तीन पाट ठेवण्यात आले मधोमध महाराज बसले होते डाव्या बाजूला राणी सोयराबाई बसल्या होत्या आणि उजवीकडे संभाजी महाराज बसले होत...
!!अरे मातीत मरनारे तर कैक असतात पण मतिसाठी मरनारे केवल मराठे असतात !!
ReplyDeleteखुपच छान............!
ReplyDelete