पाटलांची मोगलाई उतरवली

राजे १५ वर्षांचे झाले होते. फर्जंद महाराज साहेबांनी दिलेल्या विश्वासू, कर्तबगार, हरहुन्नरी लोकांच्या सानिध्यात आणि आईसाहेब जिजाऊ यांच्या कडक शिस्तीच्या आणि तितक्याच मायेच्या सानिध्यात शिवाबराजे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे वाढत होते. हळू हळू मुलुख बदलत होता, पण माणसांची मानसिकता अजून बदलत नव्हती मुलखातील मोघलाई संपता संपत नव्हती. काही लोक अजून जुन्याच वळणाचे होते. गावचे पुढारी पाटील म्हणजेच रयतेचे मायबाप असे नसून मालकी हक्कच गाजवत होते.

शिवशाहीच्या सूर्याने आसमंतात उगविण्यापूर्वीची जणू लाली धरली होती परंतु.पाटलांच्या,वतनदारांच्या मनात खोलवर चिखलात रुतून पडलेल्या जनावराप्रमाणे घर करून बसलेली मोगलाई मात्र उतरायचे नावच घेत नव्हती. उगवत्या सूर्याकडे आशेने पहाताना रयत राजरोज हुंदक्या मागून हुंदके देत होती. कुंपणानेच शेत खाल्लं तर न्याय मागायचा कुणाला आणि आपलं दुःख सांगायचे कुणाला.

आणि एके दिवशी असाच एक प्रकार मासाहेबांच्या कानी आला

पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या रांझे या गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने बदअमल केला.

रांझे,रांझे गावचा पाटील, सगळ्यांना प्रकरण फारच गंभीर वाटू लागले काही तरी मोठा प्रसंग घडणार हे मात्र नक्की होते पण नक्की काय होणार त्याच्या सोबत हेच फक्त जाणून घ्यायचे होते

ह्याच्या आधी देखील पाटलाने असेच शेण खाल्ले होते परंतु निवडा करणारेच कोणी नव्हते. पण जनेतेचे गाऱ्हाणे ऐकणारी आई आता लालमहाली बसली होती. जणू पोटाच्या पोराच्या मायेनेच ती त्यांचे सांत्वन करी न्यान निवडा करी.

आणि त्यात रांझे हे गाव आऊसाहेबांच्या मालकीचे त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी ह्या गावची मालकी आऊसाहेबांकडे आणि त्यांच्याच गावात हा गुन्हा म्हणजे घोर पाप कारण रयतेवर प्रेम करणारी आई रयत नासवना-यांच्या विरुद्ध जणू चंडीचे रूपच धारण करी , हा निवडा मात्र राजांनी केला कारण राजे जाणते देखील झाले होतेच।



राजांना हि वार्ता कळली त्यांनी बाबाजीस् ताबडतोब सदरेस बोलावून घेतले. त्याची चौकशी केली, चौकशीत गुन्हा सिद्ध झाला. त्याचवेळी महाराजांनी त्वरित त्याची पाटीलकी जप्त केली. इतकेच नव्हे तर त्याचे हात पाय कलम करून त्याला कामावरून दूर केले. हिंदवी स्वराज्य हे मोगलाई पेक्षा कसे वेगळे आहे ते स्वराज्यातील जनतेच्या लक्षात आले. ! गुन्हेगारास शिक्षा ठोठावणारे महाराज कठोर वाटले तरी मनाने मृदू होते. बाबाजी निपुत्रिक होता. त्यामळे अपंगावस्थेत त्याचा संभाळ कारांयःची तयारी गुजर कुळीच्याच सोनजी बिन बनाजी गुजराने दर्शविली तेव्हा महाराजांनी मेहेरबान होऊन मौजे रांझेची पाटीलकी सोनाजिच्या नावे करून दिली बाबाजीसही पालनपोषणार्थ त्याच्या स्वाधीन केले ( शककर्ते शिवराय )

ह्याच संदर्भाचे २८ जाने। १६४६ चे शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र सापडले आहे



Comments

  1. छान keep it up .....

    ReplyDelete
  2. मुजरा राजे

    ReplyDelete
  3. हे असेच प्रकार त्यावेळी चालू होते. मुसे खो~यातल्या रंगों कुलकर्णी ने एका विधवा बाई वर बलात्कार केला. अन महाराजांना हे समजले. आता आपल्याला शिवाजी राजा मारील या भयाने रंगोबा भेदरला अन जावलित जावून लपला. महाराजांना त्याला शिक्षा करायची होती पण त्यापुर्विच तो कुलकर्णी मेला.

    ReplyDelete
  4. Anonymous21:27

    waha khup chan malahi shivaji maharajanche charitra wachnyas khup aavadte.
    krup karun torana kkilhachi mahiti aslyas krupakarun pathvavi. hi namra vinati.

    ReplyDelete
  5. JAI SHIVAJI JAI BHAVANI.

    thanks for sharing this nice & improtant information.

    ReplyDelete
  6. कडक पण दयाळू राजा.. चुकीसाठी शिक्षा केली आणि नंतर त्याची काळजी घेण्यास माणूस नेमला.. ऐसा राजा होणे नाही. !!

    ReplyDelete
  7. हा बानाजी गुज्जर पाटील रांझे गावचा आदिलशाहीतील ब्राम्हन पाटिल होता, ब्राम्हनाला ईतकी भयानक सजा देनारे शिवाजी महाराज गो-ब्राम्हन प्रतिपालक असतील का...विचार करा...
    शिवाजी महाराज कुळवाडी(कुणबी)भुषन आणि बहुजन प्रतिपालकच होते....तसे नसते तर ब्राम्हनाला म्रुत्यूदंड दिला नसता....
    जय जिजाऊ,जय शिवराय !!!!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब