अखेर सिंहाचा छावा अडकलाच १ फेब. १६८९


दीड हजार हशमांचे हत्यारबंद घोडदळ कोल्हापूरकडून निघाले आघाडीला मुकर्रबखान व इखलासखान हे दौडत होते. पन्हाळ्याच्या कोकण दरवाज्यावर पहारा देणाऱ्या मेटक-याने पालोत्यांची ती रांग दौडताना बघून बालेकिल्ल्याकडे धाव घेतली. सरनोबत महलोजी घोरपड्यांना तो धपापतच म्हणाला घात झाला घोरपडे, कोल्हापूर नजीकचा तळ संगमेश्वरच्या रोखाने दौडतोय घोडा कितसा हाय मग न्हाय घावता.पन्हाळ्यावरून हुकुम सुटले महलोजी आपले चिरंजीव संताजी आणि बहिर्जी यांसह निघाले हां हां म्हणता पाचशे घोडा विशाळगडाच्या रोखाने निघाला.
आडवाट धरून घोडी संगमेश्वर घाटू लागली, मराठ्यांचा धनी संगमेश्वर मुक्कामी होता त्याच्या रक्षणार्थ सगळेच दौडत होते। संग्मेश्वरी शंभू राजास पकडण्याचा घाट मुकर्रबखानाने घातला होता

झाल्या उम्रीचे घोरपडे आपल्या मुलांच्यासह दौडत होते. "आबा घाटू आम्हीं संगमेश्वर येळेवर ? थोरल्या संताजीने शकाने विचारले "आरं,निस्त पोचून काय कामाचं ? येळ पडला तर शीर कापून ठीवाया लागलं शिवाजीर्‍हाजाचा अंकुर जपायचाय; काळरात्र पळापळाने चढत होती, संगमेश्वर गाढ सुखरूप झाले होते, राजे अर्धवट झोपेतच होते. मध्यरात्र टळली, उत्तररात्र धरून वाड्याची शांतता भेदत दोन घोडाईत वाड्याच्या चौकात उतरले. तीरासारखे वाड्यात घुसले. सुखदालनाच्या शेजारच्याच कोठडीत झोपलेल्या कवी कुलेशांना उठवायला सांगितले.कविजींनी भयंशंकेने त्यांच्याकडे विचारपूस केली खबर समजली मुकर्रबखान आडवाटेने घाट-पांदीतून...संगमेश्वर जवळ करतोय महाराजांना उठवा,राजांना उठवलं गेल,ताबडतोब चढ्याघोड्यानिशी संगमेश्वर सोडण्याची खबर दिली.

"शिर्क्यांची माणसं होते ती कोल्हापूर नजीक तळ न्हाई गनिमाच अन् बिशादपण नाही एवढ्या गचपानात शिरायची"
. आणि महाराज पुन्हा मंचकावर जाऊन लोटले. इकडे संगमेश्वरीच्या वेशीत घुसलेले महलोजी संगमेश्वर राखायला खडे ठाकले. पाठीशी मुकर्रबखान इखलासखान धूळ फेकीत संगमेश्वरात दाखल झाले. हर हर महादेव ,धीsन धीsन च्या आरोळ्या उठल्या कालवाच कालवा झाला. राया अंताने वाड्यात येऊन कोणताही मुलाहिजा न बाळगता राजांच्या खांद्याला गदागदा हालवून शंभू राजास उठविले "राज इळभर सुद्धा थांबू नगासा घात झालाय हत्यार घ्या आणि भाईर पडा निघा, निघा "महाराज, राया, अंता, अर्जोजी, कवी कुलेश वाड्याबाहेर आले.चंद्रवतावर मांड टाकून महारज लढत लढत निसटण्याचा प्रयत्न करत होते.

इकडे महालोजींनी फळी धरली गनिमास वाड्यात शिरून देत नव्हते. सत्तरीचं म्हतारं पण जिवाच्या बाजीने लढत होता. जणू खिंडीतला बाजी , पुरंदरचे मुरारबाजी , कोंडाण्याचा तान्हाजी आणि शेलारमामा त्यात संचारले होते. मुकर्रबखान त्या म्हाताऱ्याचं शौर्य पाहून थक्क झाला वैतागला आणि त्याच्या रोडून आज्ञा सुटली "घेर डालो बुढ्ढे कों "अखेर एक जमदाड म्हाताऱ्याच्या छातीत रुतली अन् म्हातारं कोसळलं पण मारताना कोसळतोय म्हणून काय पालथ पडलं व्हय म्हातार होतं शिवबाच्या राज्याचं

तोपर्यंत लढत लढत महाराजांनी नावडी नदीचा काठ घाटला होता, नजर जाईल तिकडे मुकर्रबखानाच सैन्य
इकडे कवी कुलेश देखील जिवाच्या बाजीने लढत होते. अचानक आलेल्या एका बाणाने काविजींचा दंड अचूक वेधला आणी कवीजी घोड्यावरून कोसळले " मै गीर रहा हुं " अशी आरोळी त्यांनी ठोकली संभाजीची नजर त्यांच्याकडे गेली शंभू महाराज देखील चंद्रावत सोडून म्होर झालं सोबत राया अंता सावलीसारखंचं व्हतचं
राजा भोवती गर्दी झाली हत्यार फिरवणे हि अशक्य झालं ...

संभाजींची नजर फिरली पाहतात तर काय आत्ता पर्यंत ऐकले होते नद्या समुद्राला येउन मिळतात पण इथे उलटे त्या नावडी नदीला मुकर्रब खानाचा सेना सागर भेटायला आला होता काठावर होते शिवपुत्र संभाजी चारी बाजूने संभाजी रेटले गेले गर्दी गर्दी दाटली धरले मध्ये संभाजी आणि कवी कलश आणि कडाडला मुकरब खिचलो तलवार उसकी पण तलवार घ्यायचे कुणाचे धाडस व्हायना कुणीतरी एक पाउल उचलून पुढे व्हायचा संभाजीची फक्त नजर वर उठायची.... चार पावले मागे सरकायचा तो. नाही जिगर झाली छाव्या ला हात लावण्याची अखेर दोरखंड फेकले गेले आणि संभाजी जेरबंद झाले. पण मस्तक ताठच होते. आणि मानही झुकली नव्हती

संभाजी राजेंना ज्या दिवशी कैद झाली तो दिवस म्हणजे १ फेब्रुवारी १६८९

Comments

  1. Khupch sundar ahe ...ase praytna kharch kautukaspad ahet , ya etihassaatun nakkich tarunnani shikave ani punha ekda SWARAJYA sthapave ..he prarthana!!!

    ReplyDelete
  2. Anonymous23:04

    apratim

    ReplyDelete
  3. aare mitra shabdh nahit mitra dolyatl pani dolyatch sampaly aapla shamhuraja jayband zala mahloji kami aale are shivrya konya matiche banvli hi manse.!!!!! Shrikant Patil

    ReplyDelete
  4. manapasun khup awadla

    ReplyDelete
  5. AAJCHYA HAVEMADHE WAHATOI GARWA
    AAJCHYA HAVEMANDE WAHATOI GARWA
    KHARACH RAJE TUMHI NASTA TAR ,
    AAJ GULAL HI DISLA ASTA HIRWA

    ReplyDelete
  6. अंधार फार झाला,
    आता दिवा पाहिजे,
    महाराष्ट्राला पुन्हा एकदा,
    जिजाऊचा शिवा पाहिजे...

    ReplyDelete
  7. अभिषेक धन्यवाद!
    वरील प्रस्तूत लेखा बद्दल...
    शंभू राजांचा (खरा) इतिहास युवापिढीच्या फक्त समोर नव्हे तर
    त्याच्या काळजात रुतविणे आज काळाची गरज आहे,
    त्यांच्या पदरी जन्मभर यातना होत्या त्या अखेरपर्यंत राहिल्याच...
    त्यांच्या दैदिप्यमान शौर्याच्या, बहूविध व्यक्तिमत्वाच्या, धर्म-बलिदानाच्या गाथा
    इतिहासाच्या जुनाट आणि खोट्या अस्तित्वाच्या भोवऱ्यात हरवू लागल्यात...
    त्या आचंद्र-सूर्य निनादात ठेवणे आपले आद्य आणि धर्म-कर्तव्य आहे जे तू जपतो आहेस...
    या कार्यास सदैव कोटी कोटी शुभेच्छा...
    आणि एक विनंती...
    सद्या 'धर्मवीरांचा' बलिदान मास सुरु आहे या मासात महाराजांच्या बालपणा पासून,
    राज्यकारभार वृद्धिंगत केल्या पासून, आप्तस्वकीय फितूर झाल्या पासून,
    मोजक्या शिलेदारांच्या साथी पासून, सिंह फाडल्या पासून ते अगदी मृत्युंजय होईपर्यंतच्या
    सर्व ऐतिहासिक छटा विविध लेखातून सदर करावयास...

    !! जय श्रीराम !!
    !! जय भवानी !! !! जय शिवाजी !!
    !! जय जिजाऊ !! !! जय संभाजी !!

    __विक्रम धर्माधिकारी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब