जिजाऊसाहेब जयंती (Mothers Day) १२ जानेवारी

जिवंतपणा, जागेपणा, बाणेदारपणा, ईश्वरार्पणवृत्ती
याच गुणसमुच्चयाचं सगुणरूप असलेल्या जिजाबाईसाहेबांचे पोटी जन्म घेऊन असं एक हिंदवी- स्वराज्य आपण आम्हाला दिलत की,
बैराग्याची छाटी हाच जिथला झेंडा होता ! हर हर महादेव हाच जिथला महामंत्र होता ! सह्याद्रीच्या कुशीतील गोरगरीब मावळे हेच जिथलं बळ होतं ! हे राज्य श्रींचे हाच जिथला अढळ विश्वास होता ! - आणि, महाराष्ट्रधर्म वाढविण हाच जिथला कर्मयोग होता !
जगदंबकृपेने झाली मुलगी म्हाळसाराणीला !
तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वाला.
फसली सन १००७ ला, पौष पौर्णिमा सूर्योदयाला !
राणी म्हाळसा महालाला चौकाचे नैऋत्य कोनाला !
तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वाला.
फसली सन १००७ ला, पौष पौर्णिमा सूर्योदयाला !
राणी म्हाळसा महालाला चौकाचे नैऋत्य कोनाला !

.संदर्भ (पिल्लेजंत्री)शककर्ते शिवराय
सिंदखेडकर राजे लखुजी जाधवराव यांचे कुळात महाळसा राणी साहेब यांच्या पोटी
जन्मलेले हे कन्यारत्न म्हणजे जिजाऊ साहेब,
सन १६०५ मध्ये फर्जंद शहाजी राजे आणि जिजाऊ यांचा विवाह झाला. जो पर्यंत जिजाऊ सिंदखेडला होत्या तोपर्यंत उंबरठ्याच्या आतच त्यांचे जग लग्न झाल्यावर त्या दौलताबादला आल्या तेव्हा त्यांना चौफेर माजलेली बादशाही मनमानी समजली , सुलतानशाही चा हैदोस त्यांना समजला.
कत्तली, आगीचे प्रलय, देवळांचे पतन ह्या गोष्टी पाहून त्यांचे मन भरून आले त्यातच फर्जंद शहाजी राजांनी आदिलशाही विरुद्ध बंड करून स्वराज्याचा मार्ग धरला आणि जिजाऊंच्या मनात स्वराज्यच बहरू लागले. त्यावेळी शिवबा राजे आऊसाहेबांच्या पोटात होते आणि जणू स्वराज्याचेच गर्भ संस्कार त्यांवर झाले.
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
घोड्यावरून दौड करावी, तलवार कमरेला लटकवावी. गडाचा गार वारा खूप प्यावा कड्यावर उभे राहून खालची माळवद डोळे भरून पहावीत.असे डोहाळे आई साहेबांना होते आणि ते नियतीने पुरविले देखील.

हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती ह्याच मातेने घडविले
ह्या मातेस कोटी कोटी प्रणाम
तुम्ही नसता तर,नसती दिसली अंगणात तुळस,
तुम्ही नसता तर,नसते दिसले मंदिरांचे कळस.
तुम्ही नसता तर,सुवासिनींच्या नसते कुंकू भाळी,
पतीव्रतांच्या किंकाळ्या मग,विरल्या असत्या रानी....
तुम्ही नसता तर,नसते दिसले मंदिरांचे कळस.
तुम्ही नसता तर,सुवासिनींच्या नसते कुंकू भाळी,
पतीव्रतांच्या किंकाळ्या मग,विरल्या असत्या रानी....
जिवंतपणा, जागेपणा, बाणेदारपणा, ईश्वरार्पणवृत्ती
ReplyDeleteयाच खरे रूप दाखवून दिल अन् हे स्वराज्य उभे झाले अश्या जिजाऊ मातेस मजा मनाचा मुजरा
This comment has been removed by the author.
ReplyDelete!! जिजाऊ मातेस मनाचा मुजरा !!
ReplyDeleteजिजाऊसाहेबांना आमचा मानाचा मुजरा....................!
ReplyDeleteAai Jijus Triwar wandan
ReplyDeletemujara karto rani sarkar
ReplyDeleteधन्य ती जिजाऊ ........................!!!!!!!
ReplyDeleteराष्ट्रमाता जिजाऊसाहेबांना मानाचा मुजरा..........!!
ReplyDelete